Moshi Building Collapse: वेस्ट टू एनर्जी प्रकल्प ठेकेदारावर अखेर गुन्हा दाखल

प्रशासकीय इमारत कोसळून ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू; कर्तव्यात हलगर्जीपणाचा ठपका, महापालिकेची कारवाई
Moshi Garbage Depot
Moshi Garbage DepotPudhari
Published on
Updated on

पिंपरी: मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे ठेकेदार ठाणे येथील अ‍ॅन्टोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि. या कंपनीस कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्या प्रकरणी अखेर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Moshi Garbage Depot
PCMC Land Dispute: पिंपरी-चिंचवडमध्ये जमीन वादाचा नवा फंडा; जुनी विक्री केलेल्या जमिनींवर वारसांचा दावा, तडजोडीच्या नावाखाली लाखोंची वसुली

वेस्ट टू एनर्जीचे प्रकल्प प्रमुख अशोक कुमार सियाराम शरण गुप्ता (वय 59, रा. रिव्हर रेसिडेन्सी, मोशी. मूळ रा. उत्तर प्रदेश ) आणि सेफ्टी अधिकारी विजय रामराव सपकाळ ( वय 38, रा. बिजलीनगर, चिंचवड ) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Moshi Garbage Depot
Moshi Gharkul STP Water Problem: मोशी घरकुल परिसरात एसटीपीच्या पाण्याचा कहर; घरांमध्ये १० फुटांपर्यंत पाणी, नागरिकांचे नुकसान

त्या दोघानी आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याने प्रशासकीय इमारत कोसळून 9 कर्मचाऱ्याचा नाहक बळी गेल्याची तक्रार महापालिकेचे कार्यकारी अभियंता सोहन निकम यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news