Pimpri Women Bike Rally: पिंपरीत रामनवमीनिमित्त महिला भव्य बाईक रॅली; नारीशक्तीचा जल्लोष

कस्तुरी क्लबचा उपक्रम; शेकडो महिलांचा सहभाग, मोफत आरोग्य तपासणीची सुविधा
Women Bike Rally
Women Bike RallyPudhari
Published on
Updated on

पिंपरी: रॅली महिला सक्षमीकरणाची, आत्मविश्वासाची, सन्मानाची अन्‌‍ आत्मनिर्भरतेची... असा महिला सक्षमीकरणाचा नारा बुलंद करणाऱ्या आणि महिला शक्तीला सलाम करणाऱ्या क्रस्ना डायग्नोस्टिक प्रायोजित दै. ‌‘पुढारी‌’ आणि ‌‘पुढारी कस्तुरी क्लब‌’च्या वतीने महिला भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. खास रामनवमीनिमित्त ही बाईक रॅली शनिवार (दि. 28 मार्च) आयोजित करण्यात आली आहे आणि विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शनिवारी सकाळी सात वाजता चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिरपासून रॅली निघणार आहे.

Women Bike Rally
Pimpri Chinchwad Budget Controversy: पिंपरी-चिंचवड अर्थसंकल्पावरून खडाजंगी; प्रशासनावर गंभीर आरोप

‌‘दै. पुढारी कस्तुरी क्लब‌’च्या वतीने नेहमीच महिलांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजित केले जातात. महिलांना एक व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठीही कस्तुरी क्लब कार्यरत आहे. त्यापैकीच एक उपक्रम म्हणून दरवर्षी रामनवमीच्या पार्श्वभूमीवर महिला भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले जाते. या रॅलीत दरवर्षी मोठ्या संख्येने महिला सहभागी होतात आणि बाईक चालवून महिला सक्षमीकरणाचा संदेश देतात. यंदाही मोठ्या उत्साहात रॅलीचे आयोजन केले असून, शनिवार (दि. 28) होणाऱ्या या रॅलीत शेकडो महिला सहभागी होणार आहेत.

Women Bike Rally
Lonavala Nagar Parishad Dispute: लोणावळा नगर परिषदेत वाद; कार्यालयाला टाळे, नागरिकांची कामे ठप्प

‌‘रॅली महिलांच्या आत्मविश्वासाची, आत्मनिर्भरतेची आणि आत्मसन्मानाची‌’ अशी रॅलीची संकल्पना आहे. ढोल-ताशा पथकांचे सादरीकरण हे प्रमुख आकर्षण असणार आहे. क्रस्ना डायग्नोस्टिक हे रॅलीचे मुख्य प्रायोजक आहेत, तर डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद कॉलेज, सुवर्णकला जेम्स ॲण्ड ज्वेलरी, टायगर ब्रॅण्ड मसाले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या रॅलीत कस्तुरी सदस्यांसह इतर महिलांनाही सहभागी होता येणार आहे. या बाईक रॅलीसाठी ड्रेस कोड असून, कोणत्याही रंगाची नऊवारी किंवा पांढरा कुर्ता आणि निळ्या रंगाची जीन्स किंवा लेगिन्स घालावी. या रॅलीसाठी महिलांना प्रवेश विनामूल्य आहे. बाईक रॅलीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकीला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.

Women Bike Rally
Pimpri Gas Cylinder Delay: पिंपरीत गॅस सिलिंडरचा खोळंबा; 96 तासांचा आदेश ठरला कागदावरच

नारीशक्ती बाईक रॅलीमध्ये डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेदिक कॉलेजच्या वतीने महिलांची मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच नेत्रतपासणी, कान-नाक-घसा (ENT) तपासणी, आयुर्वेद सल्ला आणि पंचकर्म उपचारांचा समावेश आहे. यामध्ये सहभागी महिलांना ऊझण आयुर्वेद आरोग्य कार्ड मोफत देण्यात येणार आहे.

नारी शक्ती बाईक रॅलीमध्ये क्रस्ना डायग्नोस्टिक च्या वतीने महिलांची मोफत रँडम रक्त तपासणी करण्यात येणार आहे; तसेच विविध तपासण्यांसाठी 20 टक्के सवलत असलेले डिस्काउंट व्हाउचर सर्व महिलांना मोफत देण्यात येणार आहे

Women Bike Rally
PMPML Bus Issues: पीएमपी बसची दयनीय अवस्था; आगीच्या घटना व बिघाडांमुळे प्रवाशांमध्ये भीती

इथे करा संपर्क:

महिला भव्य बाईक रॅलीत सहभागी होण्यासाठी

नावनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी

8888808027/7040848572 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

रॅली कधी: शनिवार, दि. 28 मार्च 2026

वेळ: सकाळी सात वाजता

स्थळ: मोरया गोसावी मंदिर, चिंचवडगाव

...मग रॅलीत सहभागी व्हाच!

ड्रेस कोड : कोणत्याही रंगाची नऊवारी किंवा पांढरा कुर्ता आणि निळी जीन्स किंवा लेगिन्स.

प्रत्येकीला चहा-नाष्टा; आकर्षक भेटवस्तू; नावनोंदणी आवश्यक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news