PMPML Bus Issues: पीएमपी बसची दयनीय अवस्था; आगीच्या घटना व बिघाडांमुळे प्रवाशांमध्ये भीती

वारंवार बस बंद पडणे, धावत्या बसला आग; देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
PMPML Bus
PMPML BusPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी व पुणेकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएमपीएमएल बसबाबत सर्वसामान्य प्रवाशांकडून अनेक अपेक्षा आहेत. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेल्या काही दिवसांत पीएमपीच्या गाड्यांना कधी आग लागण्याच्या घटना घडतात, तर कधी गाडीला धक्का देण्याची वेळ येते. गेल्या काही महिन्यात पीएमपीच्या दहापेक्षा आधिक गाड्यांना भररस्त्यात आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाकडून बसगाड्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पीएमपी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

PMPML Bus
Ekveera Devi Yatra: लोणावळ्यात आई एकवीरा देवीच्या चैत्र यात्रेला उत्साहात सुरुवात

पीएमपीच्या तापक्यात खिळखिळ्या झालेल्या बस गाड्यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. अनेक बसगाडया रस्त्यावर धावताना मधूनच बंद पडतात. त्यामुळे खिळखिळया बसमधून प्रवास करणे टाळतात. विशेषत: या गाडया जुन्या असून या गाडयांची देखभाल , दुरुस्ती होत नसल्याचे अशा घटनांवरून दिसून येते.

घटना: चाकण औद्याोगिक वसाहतीत निघोजे हद्दीत सकाळी महिंद्रा कंपनीसमोर पीएमपीएमएलच्या धावत्या इलेक्ट्रीक बसने अचानक पेट घेतला.

PMPML Bus
Pimpri Crime News: पिंपरीत अल्पवयीनावर हल्ला; सांगवीत 18 लाखांची ऑनलाईन फसवणूक

चिंचवड स्टेशन येथे रस्त्यावर पीएमपी बस सकाळी बंद पडली, त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी प्रवाशांनी धक्का मारुनही बस चालू न झाल्याने ती क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आले. तसेच बसचा टायर फुटल्याने परिसरात धुर पसरला होता. अशा घटना घडल्याने पीएमपीएच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रसंगावधान राखून प्रवाशांना खाली उतरवल्यामुळे दुदैंवाने अघडीत घटना घडली असती तर याला जवाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला आहे.

भंगार बस किती वर्ष सेवा देणार साहेब:

पीएमपीच्या तापक्यात वर्षानुवर्षे जुन्या झालेल्या बसगाडया आहेत. या बस मार्गांवर सोडल्यानतंर रस्त्यातच बंद पडण्याचे प्रमाण सार्वधिक आहे. तसेच बसमध्ये वारंवार बिघाड होणे, अशा समस्या या गाडयांना आहेत. यासंदर्भात पीएमपीच्या वाहक आणि चालकांकडे विचारपूस केल्यानतंर अधिकाऱ्यांना दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच सकाळच्या वेळेत बस मार्गांवर बंद पडल्यानतंर नियोजीत ठिकाणी अथवा रात्रीच्या वेळेत बस बंद पडल्यानतंर प्रवाशांची नुसती धांदल उडते.

PMPML Bus
PM VIBRAY Yojana: पहिल्या नोकरीसाठी 15 हजारांचा लाभ; पीएम-वीबीआरवाय योजनेला तरुणांचा प्रतिसाद

प्रवाशांचे म्हणणे काय:

  • इलेक्ट्रीक बसच्या प्रत्येक फेरीनतंर वायरिंगची तपासणी करण्याच यावी.

  • प्रत्येक बसमध्ये अग्निशमक उपकरणे सुस्थितीत असावेत.

  • धूर निघताच अलार्म वाजणारी यंत्रणा असावेत.

  • बसमार्गावर सोडण्यापूर्वी बसची तपासणी करावी मग मार्गावर सोडावी.

आगीच्या घटना:

  • 13 फेब्रुवारी 2026 - चाकण

  • 16 नोव्हेंबर 2025 - काळेवाडी

  • 16 नोव्हेंबर 2025- पिंपरी

  • 8 ऑगस्ट 2025- शिवाजीनगर

  • 19 मार्च 2025- हिंजवडी

  • 18 मार्च- 2025 खडकवासला धरण

  • 12 सप्टेंबर 2024 - हडपसर

  • 10 सप्टेंबर - 2024 निगडी

  • 9 मे 2024- भारती विद्यापीठ

PMPML Bus
Pimpri Chinchwad Budget 2026: पिंपरी-चिंचवडचा अर्थसंकल्प मंजूर; 414 कोटींची वाढ, पवना प्रकल्पाला चालना

पीएमपीच्या भाडेतत्त्वावरील चालविऱ्यात येणाऱ्या ई-बस व इतर सर्व बसगाड्याची देखभाल दुरुस्ती नियमित केली जावी.

लहू जाधव, प्रवासी

आमच्याकडून गाड्यांची वेळोवेळी तपासणी केली जाते. नियमित दुरुस्ती केली जाते; तसेच सर्व गाड्यांची तपासणी करूनच बस मार्गांवर सोडल्या जातात.

राजेश कुदळे, मुख्य अभियंता, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news