Pimpri Ward Politics: पिंपरी प्रभागात राष्ट्रवादीचे सर्व जागांवर लक्ष, भाजपाची नवी रणनीती

योगेश बहल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आक्रमक; भाजपाकडून वर्चस्वासाठी वेगवेगळे डाव
Pimpri Ward 20 Politics
Pimpri Ward 20 PoliticsPudhari
Published on
Updated on

पिंपरी: राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेलची ताकद कमी करून भाजपाचे वर्चस्व स्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा वापर करण्यात येत आहे. तर, शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभागातील चौथीही जागा ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला कितपत यश येते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Pimpri Ward 20 Politics
Pimpri Ward Politics: पिंपरी प्रभागात भाजपाची पॅनेल पकड कायम ठेवण्याची तयारी

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर योगेश बहल यांच्या नेतृत्वाखाली माजी नगसेवक शाम लांडे, सुलक्षणा धर हे निवडून आले होते. तसेच, भाजपाकडून सुजाता पालांडे या विजयी झाल्या होत्या. सुजाता पालांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. महिला जागा राखीव झाल्याने माजी नगरसेवक शाम लांडे यांच्या पत्नी मनीषा लांडे या इच्छुक आहेत. शिवसेनेत गेलेले माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे हे पुन्हा स्वगृही राष्ट्रवादीत आले आहेत. त्यांच्यासह सुरेखा लांडगे, अनुजा लांडगे, सुनीता रानवडे, वर्षा जगताप, माजी नगरसेविका सुखदेवी नाटेकर-घोटकुले, शीतल बेळगावकर व इतर इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे. तर, भाजपाकडून यशवंत भोसले, किरण सुवर्णा, खुशी सुवर्णा, कुणाल लांडगे, डॉ. संदीप बगाडे, सतीश नागरगोजे, राष्ट्रवादीतून शरदचंद्र पवार पक्षाकडून सुलक्षणा धर या इच्छुक आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नीलम म्हात्रे व संतोष म्हात्रे, अभिजित गोफणे, गौतम लहाने, नितीन घोलप, प्रतीक जुंदरे, रंजना यादव हे इच्छुक आहे. अनुभवी योगेश बहल हे प्रभागात राष्ट्रवादीचे वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तर, भाजपाकडून वेगवेगळ्या तंत्राचा वापर करीत प्रभागात कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या कोण यशस्वी होते, याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे.

Pimpri Ward 20 Politics
Pimpri Chinchwad Municipal Election: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक; आज ‘सुपरसंडे’

प्रभागातील परिसर

विशाल थिएटर परिसर, एचए कॉलनी, महेशनगर, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर, वल्लभनगर, लांडेवाडी झोपडपट्टी, सीआयआरटी, पार्श्वनाथ सोसायटी, कासारवाडीचा भाग, अग्रसेन नगर, कुंदननगरचा भाग

वायसीएम रुग्णालयात नवीन इमारत

निगडी ते चाकण नव्या मेट्रो मार्गात संत तुकारामनगर, वायसीएम रुग्णालयाजवळून मेट्रो जाणार आहे. मेट्रो स्टेशन व एसटी आगार जवळजवळ असल्याने नागरिकांची सोय झाली आहे. प्रभागातील चार उद्यानाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. वायसीएम रुग्णालयावर वाढता ताण लक्षात घेऊन नवीन इमारत बांधण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना अधिक चांगले उपचार मिळू शकतील. अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार पदपथ व सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात येत आहे. कासारवाडीत छत्रपती शाहू महाराज इंग्रजी माध्यम शाळा सुरू करण्यात आली आहे. राजाराम लांडे क्रीडा संकुल विकसित करण्यात आले आहे.

Pimpri Ward 20 Politics
Charholi Road Potholes: चऱ्होली दत्तनगरमधील रस्त्यांवरील खड्डे जैसे थे; नागरिकांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

कासारवाडीत नवीन दवाखाना उभारण्यात आला आहे. राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारण्यात आले आहे. वीस लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. जलतरण तलाव व उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. पालखी मार्गाचे आकर्षक पद्धतीने सुशोभिकरण करण्यात आले आहे. प्रभागात नव्याने जलवाहिनी टाकण्यात आली आहे. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. समाज मंदिर, विरुंगळा केंद्र व बॅडमिंटन हॉल तयार करण्यात आले आहे.

प्रभागातील जागांचे आरक्षण

  • अ-एससी,

  • ब-ओबीसी महिला,

  • क-सर्वसाधारण महिला,

  • ड-सर्वसाधारण

Pimpri Ward 20 Politics
Vadgaon Maval Leopard Sighting: वडगाव मावळच्या केशवनगर भागात पुन्हा बिबट्याचे दर्शन; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

वाहतूक कोंडीची मोठी समस्या

कुंदननगर ते पिंपरीच्या इंदिरा गांधी उड्डाणपुल भोसरीतील लांडेवाडी झोपडपट्टी असा मोठे क्षेत्रफळ असलेला हा प्रभाग आहे. प्रभागात संमिश्र लोकवस्ती आहे. वायसीएम रुग्णालय, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, डॉ. डी.वाय. पाटील महाविद्यालय, जैन संघटना शाळा, आचार्य अत्रे रंगमंदिर आदींमुळे संत तुकारामनगर भागात मोठी वाहतूक कोंडी होते. तसेच, हॉकर्स झोन नसल्याने टपऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पार्किग नसल्याने वाहने कोठेही लावली जातात. अतिक्रमण व अरुंद रस्त्यांमुळे रुग्णवाहिका व स्कूल बस अडकून पडतात. वारंवार वाहतूक कोंडी होते. जुनी ड्रेनेजलाईन असल्याने त्या तुंबण्याचे प्रकार वाढत आहेत. वल्लभनगर एसटी आगारामुळे एसटी बस रस्त्यावर थांबविल्या जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. येथील भुयारी मार्ग अपुरा पडत असून, ते बारा महिने सांडपाणी साचलेले असते. काही भागांत पाणी समस्या आहे. नाशिक फाटा येथे ट्रॅव्हर्ल्स बस थांबत असल्याने वाहतुकीस अडथळा होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news