Pimpri Ward Politics: पिंपरी प्रभागात भाजपाची पॅनेल पकड कायम ठेवण्याची तयारी

राष्ट्रवादीसह इतर पक्षांची मोर्चेबांधणी, इच्छुकांची गर्दी आणि प्रलंबित प्रश्नांमुळे लढत रंगणार
Pimpri Ward 19 Politics
Pimpri Ward 19 PoliticsPudhari
Published on
Updated on

पिंपरी: गेल्या निवडणुकीत या प्रभागात भाजपाने संपूर्ण पॅनेल निवडून आले होते. यंदाही भाजपा संपूर्ण पॅनेल आपल्या ताब्यात ठेवण्याच्या तयारीने मैदानात उतरला आहे. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेास आणि इतर पक्षांकडून विजयासाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहेत. गेल्या निवडणुकीत शीतल शिंदे, शैलेश मोरे, जयश्री गावडे, कोमल मेवानी हे भाजपाचे चार नगरसेवक निवडून आले होते. यंदा भाजपाकडून त्या माजी नगरसेवकांसह आमदार उमा खापरे यांचा मुलगा जयदीप खापरे तसेच, मंदार देसाई, जितू पेहलानी, दीपक मेवानी, प्राजक्ता गावडे, अमृता नवले, मधुरा शिंदे, महापालिकेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या पत्नी मनीषा जगताप, पिंकी बोथ यासह अनेक जण इच्छुक आहेत.

Pimpri Ward 19 Politics
Pimpri Chinchwad Municipal Election: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक; आज ‘सुपरसंडे’

राष्ट्रवादी काँग््रेासकडून माजी नगरसेवक काळूराम पवार, जगन्नाथ साबळे, धनराज आसवानी, शमीम पठाण तसेच, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कल्पना तानाजी घाडगे, काँग््रेासकडून रोहीत भाट, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात ज्योती शिंदे, आकाश चर्तुेवेदी आणि इतर पक्षांकडून विजया भोईर, गुरूबक्ष पहलानी, चेतन गावडे, प्राजक्ता गावडे, मनोरमा काळे, सुनील काळे आदींसह अनेक जण इच्छुक आहेत. भाजपाकडून इच्छुकांची संख्या अधिक असल्याने बंडखोरीचा धोका आहेत. तर, राष्ट्रवादी आक्रमक भूमिकेत असून, पक्षाकडून विजयासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Pimpri Ward 19 Politics
Charholi Road Potholes: चऱ्होली दत्तनगरमधील रस्त्यांवरील खड्डे जैसे थे; नागरिकांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

प्रभागातील परिसर

विजयनगर, न्यू एसकेएफ कॉलनी, उद्योगनगर, क्वीनस टाऊन, सुदर्शननगर, श्रीधरनगर, आनंदनगर झोपडपट्टी, भोईल कॉलनी, गावडे पार्क, एम्पायर इस्टेट, विस्डम पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनीचा भाग, तसेच, भिमनगर, समाट अशोकनगर, माता रमाबाई आंबेडकर नगर, बौध्दनगर, वाल्मिकीनगर, भाटनगर, भाजी मंडई, पिंपरी कॅम्प.

सेंट मदर टेरेसा उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण

अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार रस्ते विकसित करून पदपथ व सायकल ट्रॅक बनविण्यात आले आहेत. चौकांत सुशोभिकरण करण्यात आले आहे. श्रीधरनगर, देवधर सोसायटी, धोका कॉलनी काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात आली आहे. जुनी ड्रेनेजलाईन काढून नव्याने टाकण्यात आली आहे. जलवाहिनीचे काम करण्यात आले आहे. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचे नूतनीकरण करण्यात आले. सेंट मदर टेरेसा (एम्पायर इस्टेट)उड्डाण पुलाखालील अतिक्रमण हटवून, आकर्षक सुशोभिकरण करुन करण्यात आले आहे.

Pimpri Ward 19 Politics
Vadgaon Maval Leopard Sighting: वडगाव मावळच्या केशवनगर भागात पुन्हा बिबट्याचे दर्शन; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

तसेच, पुलावर ये-जा करण्यासाठी रॅम्प उभारण्यात आल्याने वाहनचालकांना जवळचा मार्ग उपलब्ध झाला आहे. लोकमान्य रुग्णालयात परिसरात पावसाळ्यात पाणी घरात शिरू नये म्हणून तेथे ड्रेनेजलाईन मुख्य वाहिनीला जोडण्यात आली आहे. अहिंसा चौक वाहतूक कोंडीमुक्त करण्यात आला आहे. प्रभागातील उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. ओपन जीम उभारण्यात आले आहे. स्मशानभूमीत विद्युत दाहिनी बसवून आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. मिलिंदनगर येथे जेएनएनयुआरएमअंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात आला आहे.

प्रभागातील जागांचे आरक्षण

  • अ-एससी महिला

  • ब-ओबीसी

  • क-सर्वसाधारण महिला

  • ड-सर्वसाधारण

Pimpri Ward 19 Politics
Kamshet Property Tax Relief: कामशेत ग्रामपंचायतीत निवासी मालमत्ता करावर 50% सवलत; नागरिकांना थकीत रक्कम भरण्याचा आवाहन

‌‘एसआरए‌’ योजना राबविण्याकडे दुर्लक्ष

प्रभागात 50 टक्केहून अधिक झोपडपट्टीचा भाग आहे. तसेच, हाऊसिंग सोसायटी, बंगलो असा हा चिंचवड व पिंपरी व पिंपरी कॅम्प असा संमिश्र लोकवस्तीचा प्रभाग आहे. त्यामुळे झोपडपट्टी भागात अस्वच्छता, कमी दाबाने पाणीपुरवठा, ड्रेनेजलाईन, वारंवार वीज जाते. अंतर्गत रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होते. पदपथ व रस्त्यांवर दुकानदार, व्यावसायिक व विक्रेत्यांती अतिक्रमण केल्याने वाहतूक कोंडी होते. पावसाळ्यात नाल्याचे पाणी घरात शिरते.तसेच, रस्त्यावर साचते. आनंदनगर झोपडपट्टी एसआरए प्रकल्पातून केवळ रेल्वे बाधित झोपडीधारकांची नावे वगळली आहेत. प्रकल्पाचे काम झाल्याने आजूबाजूच्या रहिवाशांना कर्कश आवाज आणि धुळीचा त्रास होतो. रेल्वेच्या बाजूने नाल्यात लोकांच्या घरात पाणी जाते. प्रभागातील झोपडपट्टी भागात एसआरए प्रकल्प राबवून त्यांना पक्की घरी देण्याची मागणी प्रलंबित आहे. भाटनगरमधील इमारती धोकादायक झाल्या असून, परिसरात घाणीचे सामाज्य पसरले आहे. पिंपरी भाजी मंडईत कचऱ्याचे ढीग व मोकाट जनावरांचा त्रास आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news