

पिंपरी: या प्रभागात भाजपामध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे. तर, प्रभागातील जागेत बदल झाल्याने भाजपाच्या पॅनेलसमोर पेच निर्माण झाला आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने पक्षाला बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो. तर, भाजपाविरोधात राष्ट्रवादी काँग््रेासने कंबर कसली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाचे संपूर्ण पॅनेल निवडून आले होते. भाजपाचे माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी नगरसेविका माधुरी कुलकर्णी, करुणा चिंचवडे असे भाजपाचे चार नगरसेवक होते.
या निवडणुकीत नामदेव ढाके यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे पॅनेल विजयासाठी प्रयत्न करीत आहे. माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी नगरसेविका करुणा चिंचवडे, माजी नगरसेवक शेखर चिंचवडे तसेच कविता दळवी, पल्लवी वाल्हेकर, राष्ट्रवादी काँग््रेासकडून भाजपात गेलेल्या आशा सूर्यवंशी यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत. माजी नगरसेविका माधुरी कुलकर्णी या प्रकृतीच्या कारणामुळे रिंगणाबाहेर आहेत. ज्येष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग््रेासचे पॅनेल रिंगणात आहे. त्यांच्यासोबत ज्योती भालके, मनीषा राजेश आरसुळ, शुभम वाल्हेकर हे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माधव पाटील, शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे) ज्ञानेश्वर जगताप इच्छुक आहेत. एका जागेवर एससी महिला आरक्षण पडल्याने प्रभागातील राजकीय गणिते बदलली आहेत.भाजपाकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने बंडखोरी होण्याची शक्यता आहे. तर, राष्ट्रवादी काँग््रेासने प्रभागावर ताब्या मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.
प्रभागातील परिसर
दळवीनगर, प्रेमलोक पार्क, भोईरनगर, गिरीराज सोसायटी, रेलविहार सोसायटी भाग, शिवनगरी, नागसेननगर, आहेरनगर, वाल्हेकरवाडी गावठाण, चिंचवडेनगर, बळवंत नगर, बिजलीनगर आदी.
दाट लोकवस्तीमुळे नागरी सुविधांचा ताण
हाऊसिंग सोसायट्या आणि अधिकृत बांधकामे असा हा संमिश्र भाग आहे. कामानिमित्त शहरात वास्तव्यात असलेल्या रहिवाशांची संख्या अधिक आहे. दाट लोकवस्तीमुळे नागरी सुविधांचा ताण वाढला आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी रस्त्यावर साचल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. बिलजीनगर येथील दवाखान्यातील सुविधा अपुऱ्या आहेत. या प्रभागात मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त क्रीडांगण नाही. चांगले उद्यान नाही. डीपीतील रस्ते विकसित करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्राधिकरण हद्दीतील घरांना प्रापर्टी कार्ड दिले जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. नियमितपणे स्वच्छता केली जात नसल्याने परिसरात कचऱ्याचे ढीग दिसतात. पवना नदी प्रदूषण वाढले आहे.
प्रभागातील जागांचे आरक्षण
अ-एससी महिला
ब-ओबीसी
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
बिजलीनगरातील भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडीतून सुटका
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बिजलीनगरहून आकुर्डीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर भुयारी मार्ग विकसित करण्यात आला आहे. तसेच, बिजलीनगर ते वाल्हेकरवाडी असा काँक्रीट रस्ता केला आहे. तसेच, डांबरीकरणातून रस्ते करण्यात आले आहेत. अमृतय योजनेत जुन्या ड्रेनेजलाईन बदलण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी चौक व वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. वीज खंडित होऊ नये म्हणून जागोजागी डीपी बॉक्स उभारण्यात आले असून, भूमिगत वीज वाहिनी टाकण्यात आली आहे. नागसेननगरमध्ये 100 सीटचे शौचालय उभारले आहे. वाल्हेकरवाडीत शाळेची नवी इमारत बांधली आहे. पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनी टाकण्यात आली आहे. अर्बन स्ट्रीट डिजाईन अंतर्गत पदपथ व सायकल ट्रॅकची निर्मिती व चौकांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. जागोजागी ओपन जीम उभारण्यात आले आहेत. उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. डीपीतील रस्ते विकसित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.