अवकाळी पावसाचा फटका; पिंपरीत पालेभाज्यांचे दर वाढले
अवकाळी पावसाचा फटका; पिंपरीत पालेभाज्यांचे दर वाढलेPudhari

Pimpri Vegetable Market: अवकाळी पावसाचा फटका; पिंपरीत पालेभाज्यांचे दर वाढले

कोथिंबीर, मेथी, पालक 25 रुपयांवर; मिरचीचे भाव कमी, तर फळभाज्यांतही चढ-उतार
Published on

पिंपरी : अवकाळी पावसामुळे पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. 2) पालेभाज्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत 10 ते 15 रुपयांनी वाढले होते. तर, मिरचीचे दर कमी झाले आहेत. इतर फळभाज्यांच्या दरातदेखील वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.(Latest Pimpri chinchwad News)

अवकाळी पावसाचा फटका; पिंपरीत पालेभाज्यांचे दर वाढले
Pimpri Chinchwad Police Action: ट्रिपल सीटवर पोलिसांचा बडगा! पिंपरी-चिंचवडमध्ये नऊ महिन्यांत 55 हजार वाहनचालकांवर कारवाई

बाजारात गाजर आणि आवळा यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. भाजी मंडईत कोथिंबीर, मेथी, शेपू, पालकाच्या जुडीची 25 रुपयांना विक्री झाली. फळभाज्यांमध्ये शिमला, बीट, गाजर यांच्या दरात वाढ झाली असून, इतर भाज्यांचे दर 5 ते 10 रुपयांनी वाढले होते. बाजारात शेवग्याचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत 50 ते 60 रुपयांनी कमी झाले होते. शेवग्याचे दर 160 रुपये किलो होता. कोथिंबीरची जुडी 15 रुपये तर इतर पालेभाज्या 15 ते 20 रुपये जुडी होत्या. तर, फळ भाज्यांमध्ये कांदे, बटाटे, लसूण, आले, टोमॅटो यांचे दर स्थिर होते. पिंपरी मंडइतील फळभाज्यांचे किलोचे दर पुढील प्रमाणे : (रुपयात) गवार 100 रुपये किलो, शेवगा 100, वाटाणा 120, टोमॅटो 20, भेंडी 70, फ्लॉवर 50, कोबी 30, मिरची 30, गाजर 70, शिमला 50, लसूण 90-100, आले 80, वांगी 50, काकडी 30, कारले 60, कांदे 20, बटाटा 30, बिन्स 70, पावटा 60, लाल भोपळा 50, घोसाळी 50, दोडका 50, तोंडली 50, बीट 40, दुधी 40, घेवडा 60.

अवकाळी पावसाचा फटका; पिंपरीत पालेभाज्यांचे दर वाढले
Unauthorized Cable Network: रस्त्यातील अनधिकृत केबलमुळे अपघाताचा धोका; महापालिकेचे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त

पिंपरी मंडइतील फळभाज्यांचे किलोचे दर पुढील प्रमाणे : (रुपयात) गवार 100 रुपये किलो, शेवगा 100, वाटाणा 120, टोमॅटो 20, भेंडी 70, फ्लॉवर 50, कोबी 30, मिरची 30, गाजर 70, शिमला 50, लसूण 90-100, आले 80, वांगी 50, काकडी 30, कारले 60, कांदे 20, बटाटा 30, बिन्स 70, पावटा 60, लाल भोपळा 50, घोसाळी 50, दोडका 50, तोंडली 50, बीट 40, दुधी 40, घेवडा 60. पालेभाज्यांचे प्रति जुडी दर (रुपयात) कोथिंबीर 25, मेथी 25, पालक 25, शेपू 25, राजगिरा 25, पुदिना 10, मुळा 30, चवळई 20, लालमाठ 20, कांदापात 25, करडई 20, आळू पाने 25, आंबट चुका 25, गवती चहा 10.

अवकाळी पावसाचा फटका; पिंपरीत पालेभाज्यांचे दर वाढले
Anup More Worker Meeting: गुन्हा दाखल असतानाही अनुप मोरेंचा कार्यकर्ता मेळावा; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मोशी उपबाजारातील घाऊक किलो दर (रुपयात) कांदा 10, बटाटा 15, आले 45, लसूण 60, भेंडी 40, गवार 90, टोमॅटो 8, वाटाणा 130, घेवडा 60, दोडका 45, हिरवी मिरची 25, दुधी भोपळा 25, काकडी 25, कारली 25, गाजर 30, फ्लॉवर 35, कोबी 20, वांगी 35, ढोबळी 35, तोंडली 40, बीट 35, शेवगा 100, घोसाळी 30, मका कणीस 10.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटलमध्ये) फळभाजी 3132, पालेभाजी 42800 (गड्डी), फळे आवक 521, कांदा 591, बटाटा 841, आले 96, लसूण 12, भेंडी 102, गवार 19, टोमॅटो 737, वाटाणा 15, घेवडा 43, दोडका 33, हिरवी मिरची 207, दुधी भोपळा 73, काकडी 133, कारली 95, डांगर 86, गाजर 85, फ्लॉवर 358, कोबी 304, वांगी 160, ढोबळी 97, बीट 21, शेवगा 16, लिंबू 88, मका कणीस 59, तोंडली 7, रताळी 10.

अवकाळी पावसाचा फटका; पिंपरीत पालेभाज्यांचे दर वाढले
Pradeep Jambhale Transfer: महापालिका आयुक्तांनंतर अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांची बदली

चिंच, बोरांची आवक पिंपरी : फळ बाजारात तुळशी विवाहासाठी चिंच आणि बोरांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून, भावदेखील आवाक्यात आहेत. बाजारात चिंच आणि बोरे 50 ते 60 रुपये किलो दराने विक्रीस होते. तसेच, तुळशी लग्नासाठी आवश्यक ऊसदेखील उपलब्ध होता. ऊस 30 रुपये नग याप्रमाणे विक्रीस होता. केळी 50-60 रुपये डझन दराने उपलब्ध होते. सफरचंद 100-150 रुपये किलो दराने तर डाळींब 260 रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. ड्रॅगनफुट 100-150, पपई 60 रुपये किलो दराने विक्रीस होते. इतर फळांचे दर गेल्या आठवड्याप्रमाणे स्थिर होते. फळांचे दर प्रतिकिलो पुढीलप्रमाणे (रुपयात) चिकू 160, सफरचंद 140, मोसंबी 100-180, नागपूर संत्री 100, सीताफळ 100, डाळिंब 260, पेरू 50, पपई 60-70, केळी 50-60 रुपये डझन, पिअर 140, किवी 120, नाश्पती 120, आलुबुखार 150, अननस 100.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news