Anup More Worker Meeting: गुन्हा दाखल असतानाही अनुप मोरेंचा कार्यकर्ता मेळावा; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

पोलिस दबावाखाली असल्याच्या चर्चेला ऊत; मेळावा घेण्याच्या निर्णयावर विरोधकांचा प्रश्नचिन्ह
गुन्हा दाखल असतानाही अनुप मोरेंचा कार्यकर्ता मेळावा
गुन्हा दाखल असतानाही अनुप मोरेंचा कार्यकर्ता मेळावाPudhari
Published on
Updated on

पिंपरी : भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या अनुप मोरे यांनी शनिवारी (दि. 1) आपल्या प्रभागात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत असून, गुन्हा दाखल होऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची चर्चा रंगली आहे.(Latest Pimpri chinchwad News)

गुन्हा दाखल असतानाही अनुप मोरेंचा कार्यकर्ता मेळावा
Pradeep Jambhale Transfer: महापालिका आयुक्तांनंतर अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांची बदली

याबाबत सविस्तर वृत्त असे, की चिंचवड ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी अनुप मोरे यांनी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता हा मेळावा होणार असून, निमंत्रणपत्रात त्यांची उपस्थिती नमूद करण्यात आली आहे. या मेळाव्याला बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, पदाधिकारी आणि नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

गुन्हा दाखल असतानाही अनुप मोरेंचा कार्यकर्ता मेळावा
Chinchwad Woman Death | तीन दिवसांवर मुलाचे लग्न, पाण्याच्या टाकीत बुडून 'वरमाई'चा मृत्यू, गवळी कुटुंबावर शोककळा

विनयभंग, धमकीचा गुन्हा

भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, 26 ऑक्टोबर रोजी चिंचवड येथे काही व्यक्तींनी आमचा दादा अनुप मोरेने तुला मारायला सांगितले आहे, अशा धमक्या देत तिच्यावर हल्ला केला होता. या प्रकरणात सुरुवातीला सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. मात्र, नंतर अनावधानाने राहिलेले नाव म्हणून अनुप मोरे यांचे नाव आरोपींमध्ये समाविष्ट करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणातील तीन जणांना अटक करण्यात आली. मात्र, अनुप मोरे पोलिसांच्या लेखी अद्याप फरार म्हणूनच नोंद आहे.

गुन्हा दाखल असतानाही अनुप मोरेंचा कार्यकर्ता मेळावा
Pimpri Chinchwad Women Reservation: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत ११ नोव्हेंबरला महिला आरक्षणाची सोडत

कायद्याचा अवमान ?

गुन्हा दाखल झाल्यानंतर राजीनामा दिलेल्या अनुप मोरे यांचा मेळावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गुन्ह्यात सहभाग असताना, त्यांच्याकडून सार्वजनिक मेळाव्याचे आयोजन हा कायद्याचा अवमान असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. पोलिसांकडून मात्र अद्याप या कार्यक्रमाबाबत कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

कार्यकर्ता मेळावा हा पूर्वनियोजित होता. मी गुरुवारी (दि. 30) राजीनामा दिला आहे. प्राधिकरण परिसरातील सर्व इच्छुक उमेदवारांना एका व्यासपीठावर आणण्याचा हा प्रयत्न असून, महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग आहे.

अनुप मोरे, माजी प्रदेशाध्यक्ष, भाजयुमो

गुन्हा दाखल असतानाही अनुप मोरेंचा कार्यकर्ता मेळावा
Chinchwad Woman Death | तीन दिवसांवर मुलाचे लग्न, पाण्याच्या टाकीत बुडून 'वरमाई'चा मृत्यू, गवळी कुटुंबावर शोककळा

या प्रकरणात अनुप मोरे यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींपैकी काहींना अटक करण्यात आली असून, गुन्ह्याचा तपास सुरू आहे. कायद्यापुढे सर्व समान आहेत. या प्रकरणाचा तपास कायदेशीर चौकटीत पूर्ण होईल.

अंकुश बांगर, वरिष्ठ निरीक्षक, चिंचवड पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news