Pimpri Vegetable Price: पिंपरीत मटारच्या दरात उसळी; लिंबूही महाग

कमी आवकेमुळे मटार 100 रुपये किलो; उन्हामुळे लिंबू 120 रुपये, इतर दर स्थिर
Lemon
LemonPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. 22) बाजारात मटारची आवक कमी झाल्यामुळे दर वाढले होते. मटार 40 रुपयांवरून 100 रुपये किलो दर झाले आहेत. फळभाज्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते. कैरी शंभर रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. उन्हामुळे लिंबाचे दर वाढले आहेत, तर पालेभाज्यांचे दरही स्थिर आहेत.

Lemon
Pimpri Chinchwad Green Society: पिंपरी-चिंचवडमध्ये ग्रीन सोसायटींना करसवलत; ‘माझी वसुंधरा’ला गती

कैरी बाजरात शंभर रुपये किलो होती. तर लिंबू 120 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. वांगी 60 रुपये किलो दराने विक्री केली जात आहेत. शेवग्याची आवक वाढली असून, दर देखील कमी झाले आहेत. पालेभाज्यांचे दर कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक यांचे दर 20 रुपये प्रतिजुडी होते. कांदे 100 रुपयांना पाच किलो विक्री केली जात आहे. लसूण 100-150 रुपये तर आले 60-80 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

बाजारात गवार 120 रुपये किलो, शेवगा 120, मटार 80, टोमॅटो 25, भेंडी 60, फ्लॉवर 30, कोबी 30, मिरची 80 - 100, गाजर 30, शिमला 70, लसूण 100 - 150, आले 60, वांगी 60, काकडी 40, कारले 70, कांदे 20 - 25 किलो, बटाटा 25- 30 रुपये किलो, बिन्स 70, पावटा 70, लाल भोपळा 30, घोसाळी 60, दोडका 70, तोंडली 70, बीट 40, दुधी 50, घेवडा 60 रुपये किलो.

Lemon
Pimpri Chinchwad HPV Vaccination: पिंपरी-चिंचवडमध्ये HPV लसीकरण मोहीम सुरू; 119 मुलींना लस

पिंपरी बाजारातील दर

पाले भाज्यांचे दर (रु.) प्रति जुडी कोथिंबीर 20, मेथी 20, पालक 20, शेपू 20, राजगिरा 20, पुदिना 10, मुळा 20,चवळई 20, लाल माठ 15, कांदापात 20, करडई 20, आळू पाने 10 रूपये जुडी, चुका 20,

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)

शेवगा 140, गवार 150, पावटा 80, तोंडली 80, वाटाणा 100, बीट 50, दोडका 80, कारली 70, भरताची वांगी 50, भेंडी 80, मिरची 80 - 100, फ्लॉवर 30 - 40, कोबी 30, वांगी 70, घोसाळे 70, पडवळ 90, दुधी भोपळा 60, पापडी 70, सुरण 80, मद्रास काकडी 40, सिमला 80, राजमा 50, बिन्स 80, गाजर 50, रताळी 100, टोमॅटो 30, बिन्स 60, काकडी 50 रुपये किलो.

Lemon
Pimpri Chinchwad Road Trip Accidents: रोड ट्रिपचा वाढता ट्रेंड जीवघेणा; पिंपरी-चिंचवडमध्ये अपघातांचे प्रमाण वाढले

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी 5664, पालेभाजी 62000 (गड्डी), फळे आवक 1711, कांदा 932, बटाटा 1605, आले 94, लसूण 31, भेंडी 156, गवार 8, टोमॅटो 568, वाटाणा 83, घेवडा 59, दोडका 61, हिरवी मिरची 236, दुधी भोपळा 89, काकडी 335, कारली 33, डांगर 48, गाजर 149, फ्लॉवर 349, कोबी 230, वांगी 205, ढोबळी 66, बीट 28, शेवगा 73, कैरी 65, लिंबू 44, मका कणीस 50, तोंडली 7 क्विंटल इतकी आवक झाली.

Lemon
Pimple Gurav Garbage Issue: पिंपळे गुरवमध्ये कचऱ्याचा डोंगर; मोरया पार्क परिसर डम्पिंग ग्राउंडमध्ये रूपांतर

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)

कांदा 8, बटाटा 9, लसूण 80, आले 30, भेंडी 40, गवार 80, टोमॅटो 10, वाटाणा 80, घेवडा 50, दोडका 40, हिरवी मिरची 50, दुधी भोपळा 30, काकडी 25, कारली 40, गाजर 30, फ्लॉवर 10, कोबी 10, वांगी 40, बीट 30, शेवगा 70, घोसाळी 40, लिंबू 100, शिमला 40, परवल 0, मका कणीस 20 रु. प्रतिकिलो दर होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news