Pimpri Chinchwad Green Society: पिंपरी-चिंचवडमध्ये ग्रीन सोसायटींना करसवलत; ‘माझी वसुंधरा’ला गती

कचरा व्यवस्थापन, पाणी पुनर्वापर आणि सौर ऊर्जेसाठी 10-15% सवलत; पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छ, हरित आणि शाश्वत बनविण्याच्या दिशेने महापालिका प्रभावीपणे काम करत असून, आरोग्य विभागाच्या माझी वसुंधरा 6.0 अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ग्रीन सोसायटी उपक्रम राबविण्यात येत आहे. हे उपक्रम प्रभावीपणे राबविणाऱ्या सोसायट्यांना 10 ते 15 टक्क्‌‍यांपर्यंत करसवलतीचा लाभ मिळणार आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad HPV Vaccination: पिंपरी-चिंचवडमध्ये HPV लसीकरण मोहीम सुरू; 119 मुलींना लस

पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल तसेच उप आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम शहरभर प्रभावीपणे राबविला जात आहे. रॉयल कॅसल सोसायटीमध्ये वसुंधरा संवर्धनाला केंद्रस्थानी ठेवून विविध प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Road Trip Accidents: रोड ट्रिपचा वाढता ट्रेंड जीवघेणा; पिंपरी-चिंचवडमध्ये अपघातांचे प्रमाण वाढले

कचरा व्यवस्थापन व कंपोस्टिंग प्रकल्पाद्वारे ओल्या कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर केले जात आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पामुळे पावसाच्या पाण्याचे संकलन करून त्याचा पुनर्वापर केला जातो. ग्रे वॉटर प्रकल्पामुळे वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करून पाणी बचतीस हातभार लागतो. तसेच, सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर करण्यात येत आहे. ‌‘महापालिकेकडून 5-स्टार सोसायटी‌’ म्हणून विशेष मानांकन दिले जाते.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimple Gurav Garbage Issue: पिंपळे गुरवमध्ये कचऱ्याचा डोंगर; मोरया पार्क परिसर डम्पिंग ग्राउंडमध्ये रूपांतर

तसेच, एकापेक्षा अधिक प्रकल्प प्रभावीपणे राबविणाऱ्या सोसायट्यांना 10 ते 15 टक्क्‌‍यांपर्यंत करसवलतीचा लाभ मिळतो. ‌‘ग‌’ क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांच्या अधिपत्याखाली आरोग्य निरीक्षक स्नेहल सुकटे, आरोग्य सहाय्यक प्रशांत गोठे, प्रदीप सोनवणे यांच्या प्रयत्नांतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Fertilizer Price Hike: खतांच्या दरवाढीने बळीराजा संकटात; शेतीचे आर्थिक गणित बिघडले

कचरा व्यवस्थापन, पाणी पुनर्वापर आणि अक्षय ऊर्जेचा वापर या बाबींची अंमलबजावणी ही काळाची गरज आहे. महापालिकेच्या पुढाकारामुळे शहरात वसुंधरापूरक बदल घडत असून, भविष्यातील पिढ्यांसाठी हे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news