Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी भाजी मंडईत लसूण-आल्याचे दर कडाडले; चायना लसूण २८० रुपये किलो

आवक घटल्याने लिंबू २०० रुपयांवर; श्रावणामुळे रताळ्याला मागणी वाढली, पालेभाज्यांचे दर मात्र स्थिर
Garlic
GarlicPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. ६) लसूण आणि आल्याचे दर तेजीत होते. बाजारात मोठ्या पाकळीचा चायना लसूण आला असून, २८० रुपये किलो दराने त्याची विक्री झाली. आवक कमी झाल्याने लिंबाचे दर २०० रुपये किलो होते. तर, आले १०० ते १५० रुपये किलो होते. इतर पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर स्थिर होते.

Garlic
Chinchwad Power Outage: चिंचवड सबस्टेशनमध्ये स्फोट; पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील ३.१० लाख ग्राहक अंधारात

कांदा ६० रुपये किलो दराने होता. श्रावण महिन्यामुळे रताळ्याला मागणी वाढल्याने याचा १०० रुपये किलो दर होता. लसूण, आले यांची आवक मंदावल्याने दर वाढले आहेत. तर, कांद्याची निर्यात वाढल्याने याचे दर वाढले होते. टोमॅटोचा किलोचा दर २० रुपये होता. पावसाच्या उघडीपमुळे पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत. मेथी, कोथिंबीर १०-१५ रुपये जुडी होती. इतर फळभाज्यांचे दर स्थिर होते. गाजर ६० रुपये, बीट ५०, वाटाणा १००-१२०, बीन्स ७०, राजमा ८०, वांगी ५०, गवार ७०, शेवगा ८०, दोडका ८०, फ्लॉवर ६०, कोबी ४०, काकडी ४०, टोमॅटो ३०, शिमला ६०, मिरची ६०, लसूण २००-२८०, आले १००-१५०, तोंडली ७०-८०, बटाटा २५-३० रुपये किलोचा दर होता.

Garlic
PCMC Live Streaming: पिंपरी-चिंचवड महापालिका सभेचे लाईव्ह प्रक्षेपण पुन्हा सुरू; पारदर्शक कारभाराला मिळणार बळ

किरकोळ बाजारातील फळभाज्यांचे किलोचे दर (रुपयात) रविवारी बाजारात गवार ७० रुपये, शेवगा ८०, टोमॅटो ३०, भेंडी ६०, फ्लॉवर ५०, कोबी ४०, मिरची ६०, गाजर ४०, शिमला ६०, लसूण २५०-२८०, आले १५०, वांगी ६०, काकडी ४०, कारले ६०, कांदे ५०-६०, बटाटा २५-३०, बिन्स ७०, पावटा ८०, लाल भोपळा ५०, घोसाळी ४०, दोडका ६०, तोंडली ७०, बीट ५०,दुधी ५०, घेवडा ५०.

Garlic
Hinjewadi Traffic Master Plan: हिंजवडीची वाहतूक कोंडी सुटणार? पीएमआरडीएचा २,१८२ कोटींचा मास्टर प्लान

पिंपरी बाजारातील पालेभाज्यांचे दर (रुपयात) प्रति जुडी कोथिंबीर १०-१५ रुपये, मेथी १५-३०, पालक १५-२०, शेपू १५-२०, राजगिरा २०, पुदिना १५, मुळा २०, चवळई १५, लाल माठ १५, हिरवा माठ १५, करडई २०, कांदापात २०, करडई १५, आळू पाने १०, आंबट चुका १५, गवती चहा १०.

पिंपरी बाजारातील फळभाज्यांचे किलोचे भाव (रुपयात) शेवगा ९० रुपये, गवार ८०, पावटा ७०, तोंडली ७०, बीट ५०, दोडका ७०, कारली ७०, भरताची वांगी ५०, भेंडी ७०, मिरची ७०, फ्लॉवर ६०, कोबी ५०, वांगी ७०, घोसाळे ५०, पडवळ ५०, दुधी भोपळा ५०, पापडी ९०, पावटा ८०, सुरण ९०, मद्रास काकडी ३०, आरबी 80, सिमला ७०, राजमा ८०, बिन्स ८०, गाजर ६०, आरवी ८०, रताळी १००, टोमॅटो ३०.

Garlic
Sangvi Ganesh Visarjan: सांगवी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासन सज्ज; रात्री १२ पूर्वी मिरवणूक आटोपणार

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रुपयात)

कांदा ३५, बटाटा १५, लसूण १००, आले ९०, भेंडी ३५, गवार ६०, टोमॅटो १५, वाटाणा ९०, घेवडा ४५, दोडका ४५, हिरवी मिरची ३५, दुधी भोपळा २५, काकडी १५, कारली ३५, गाजर २५, फ्लॉवर २५, कोबी २०, ढोबळी ३५, वांगी ३५, शेवगा ५०, घोसाळी ३०, लिंबू ६०, मका कणीस १००.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी : ४६५९, पालेभाजी : ६२००० (गड्डी), फळे : ६२०, कांदा ३५०, बटाटा १२१२, लसूण ६०, आले ४५, भेंडी १६१, गवार ३४, टोमॅटो ७०७, वाटाणा ४४, घेवडा ५९, दोडका ६७, हिरवी मिरची १९२, दुधी भोपळा १०८, काकडी १४४, कारली ७०, डांगर ९९, गाजर १०१, फ्लॉवर २६३, कोबी १९९, वांगी १७१, ढोबळी ७८, बीट ३०, शेवगा ५७, लिंबू ५७, मका कणीस ११७, तोंडली १४, रताळी ५.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news