Hinjewadi Traffic Master Plan: हिंजवडीची वाहतूक कोंडी सुटणार? पीएमआरडीएचा २,१८२ कोटींचा मास्टर प्लान

४५.३४ किलोमीटर रस्त्यांचे जाळे उभारणार; सहा जोडरस्त्यांसह मेट्रोची ‘गेट टू गेट’ कनेक्टिव्हिटी, भूसंपादनासाठी १,२६४ कोटी
Traffic Congestion
Traffic CongestionPudhari
Published on
Updated on

पिंपरी: भुजबळ चौक, भूमकर चौक, लक्ष्मी चौक, विप्रो सर्कल आणि राधा चौकातील वाहतूक कोंडी हिंजवडीच्या आयटी हबची मोठी डोकेदुखी ठरली आहे. आता या कोंडीवर केवळ एका रस्त्याचा उपाय न करता रस्त्यांचे पर्यायी जाळे उभारण्याचा तब्बल २,१८२.७९ कोटींचा मास्टर प्लान पीएमआरडीएने पुढे आणला आहे.

Traffic Congestion
Sangvi Ganesh Visarjan: सांगवी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासन सज्ज; रात्री १२ पूर्वी मिरवणूक आटोपणार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत पीएमआरडीएने या आराखड्याचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे, या आराखड्याचा केंद्रबिंदू केवळ नवीन रस्ते बांधणे नसून एका चौकावरील वाहतुकीचा भार दुसऱ्या पर्यायी मार्गावर वळवणे आणि मेट्रो स्थानकापासून आयटी कंपनीच्या गेटपर्यंतचा शेवटचा टप्पा सुकर करणे, हा आहे.

Traffic Congestion
Pimpri Chinchwad Stray Dogs: पिंपरी-चिंचवडमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; नागरिक, विद्यार्थी दहशतीत

भूसंपादनासाठी सर्वाधिक खर्च

भुजबळ आणि भूमकर चौकावर सध्या एकवटणारी वाहतूक विभागण्यासाठी १७.७४ किलोमीटरचे सहा जोडरस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. या सहा मार्गांसाठी तब्बल १,७५६.७९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यातील सर्वाधिक १,२६४.५३ कोटी रुपये भूसंपादनासाठी खर्च होणार आहेत. यातील मेझा-९ ते लक्ष्मी चौक आणि नांदे–माण हे ३६ मीटर रुंदीचे मार्ग भविष्यातील वाढता वाहतूक भार हाताळण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

मेट्रो आली; आता 'गेट टू गेट' कनेक्टिव्हिटी

हिंजवडीतील वाहतूक प्रश्नाचा दुसरा भाग म्हणजे मेट्रो स्थानकावर उतरलेल्या प्रवाशाचा पुढचा प्रवास. मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचणे आणि तेथून आयटी कंपनीपर्यंत जाणे सोपे झाले नाही, तर सार्वजनिक वाहतुकीचा अपेक्षित फायदा मिळणार नाही. याच पार्श्वभूमीवर मेट्रो कॉरिडॉर आणि स्थानकांभोवती २७.६ किलोमीटर रस्त्यांसाठी ४२६ कोटी रुपयांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. माण डेपो ते हिंजवडी स्टेशनदरम्यानच्या सुमारे १० किलोमीटरच्या कॉरिडॉरमध्ये पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, पथदिवे, अर्बन लाउंज, बस स्टॉप, ऑटो स्टँड आणि भूमिगत युटिलिटी डक्ट उभारण्याचे नियोजन आहे. यातील ८.५ किलोमीटर रस्त्याचा विकास एमआयडीसीमार्फत केला जाणार असून, त्यासाठी २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Traffic Congestion
Maval Crime: चिमुकलीवरील अत्याचाराने मावळ हादरले; टाकवे बुद्रुकमध्ये मूक मोर्चा, बाजारपेठ कडकडीत बंद

स्टेशनभोवती ५०० मीटर ते १.५ कि.मी. चा 'कनेक्टिव्हिटी झोन'

मेट्रो स्टेशनवर उतरून पुढे कंपनीपर्यंत जाण्यासाठी स्टेशनभोवतीच्या रस्त्यांची स्थिती महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकांच्या ५०० मीटर ते १.५ किलोमीटर परिसरातील २० रस्ते सुधारण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी २२६.५४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये पीएमआरडीएच्या अखत्यारीतील ७.२२ किलोमीटर आणि एमआयडीसीच्या अखत्यारीतील ११.९७ किलोमीटर रस्त्यांचा समावेश आहे.

४५.३४ किलोमीटरचे रस्ते

एकूण ४५.३४ किलोमीटरच्या रस्ते विकासातून हिंजवडीतील वाहतुकीचे चित्र बदलण्याचा दावा करण्यात आला आहे. भुजबळ चौक, भूमकर चौक, लक्ष्मी चौक, शिवाजी चौक आणि विप्रो सर्कलवरील वाहतूक विभागण्यासोबतच मेगापॉलिस सर्कल, क्वाड्रॉन सर्कल, डोहलर, इन्फोसिस फेज-२, विप्रो टेक्नॉलॉजीज, पॉल इंडिया, शिवाजी चौक आणि हिंजवडी स्टेशनला जोडणी मिळणार आहे. म्हणजेच, हिंजवडीची वाहतूक एका मुख्य रस्त्यावर अडकवण्याऐवजी पर्यायी रस्ते, मेट्रो आणि 'लास्ट माईल' कनेक्टिव्हिटी यांना एकाच आराखड्यात जोडण्याचा प्रयत्न आहे.

Traffic Congestion
Shravan Sari 2026: पिंपरीत रंगणार ‘श्रावण सरी’; मंगळागौर, कलाकारांशी गप्पा अन् ‘श्रावण क्वीन’ची रंगत

खरी कसोटी अंमलबजावणीची

हिंजवडीच्या वाहतूक कोंडीवर कोट्यवधींचा आराखडा तयार झाला असला तरी त्याची खरी परीक्षा भूसंपादन, विविध विभागांमधील समन्वय आणि प्रत्यक्ष कामाला लागणारा कालावधी यावर होणार आहे. त्यामुळे आराखड्यापेक्षा त्याची अंमलबजावणी किती वेगाने होते, याकडे आयटी कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि उद्योजकांचे लक्ष लागले आहे.

आकडे सांगतात हिंजवडीचा 'मास्टर प्लान'

  • २,१८२.७९ कोटी - एकूण प्रस्तावित खर्च

  • ४५.३४ किमी – एकूण रस्ते विकास

  • १७.७४ किमी – सहा प्रमुख जोडरस्ते

  • १,७५६.७९ कोटी – सहा जोडरस्त्यांचा खर्च

  • २७.६ किमी – मेट्रो व लास्टमाईल कनेक्टिव्हिटी

  • २० रस्ते – मेट्रो स्टेशन परिसरातील सुधारणा

  • १,२६४.५३ कोटी – प्रस्तावित भूसंपादन खर्च

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news