Sangvi Ganesh Visarjan: सांगवी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासन सज्ज; रात्री १२ पूर्वी मिरवणूक आटोपणार

१६० गणेश मंडळांपैकी ९२ मंडळांचे सातव्या दिवशी विसर्जन; कृत्रिम हौदांची व्यवस्था, डीजेच्या आवाजावर मर्यादा आणि लेझरला बंदी
Sangvi Police
Sangvi PolicePudhari
Published on
Updated on

सांगवी: पिंपरी-चिंचवड महापालिका ह क्षेत्रीय कार्यालय, महावितरण आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने आगामी गणेश विसर्जन मिरवणूक अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेत पार पाडण्यासाठी नुकतीच एक महत्त्वाची समन्वय बैठक पार पडली. या उच्चस्तरीय बैठकीनंतर पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी थेट प्रत्यक्ष विसर्जन मार्गाची पाहणी करत सुरक्षेचा आणि तयारीचा आढावा घेतला.

Sangvi Police
Pimpri Chinchwad Stray Dogs: पिंपरी-चिंचवडमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; नागरिक, विद्यार्थी दहशतीत

सांगवी पोलिस स्टेशन हद्दीत एकूण १६० गणेश मंडळे असून, त्यापैकी ९२ मंडळे सातव्या दिवशी विसर्जन करतात. मागील वर्षी ही मिरवणूक रात्री उशिरापर्यंत चालली होती, मात्र यंदा पोलिस आणि प्रशासनाच्या वतीने रात्री १२ वाजेच्या आत मिरवणूक पूर्णपणे संपवण्याचे कडक नियम आणि नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत स्थानिक लोकप्रतिनिधींचेही पूर्ण सहकार्य लाभणार असून, यंदाची मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध पार पडणार आहे.

Sangvi Police
Maval Crime: चिमुकलीवरील अत्याचाराने मावळ हादरले; टाकवे बुद्रुकमध्ये मूक मोर्चा, बाजारपेठ कडकडीत बंद

​या संयुक्त समन्वय बैठकीस पोलिस उपायुक्त (डीसीपी) संदीप आटोळे, सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) मनीषा कदम, सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी, वाहतूक पोलिस निरीक्षक चंद्रकांत वाबळे, प्रशासन अधिकारी रामचंद्र येवले, महावितरणचे कनिष्ठ अभियंता अभय भंडारी तसेच उद्यान विभागाचे कनिष्ठ अभियंता उपस्थित होते. अधिकारी आणि प्रशासनाच्या या संयुक्त बैठकीमुळे यंदाची सांगवीची विसर्जन मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Sangvi Police
Shravan Sari 2026: पिंपरीत रंगणार ‘श्रावण सरी’; मंगळागौर, कलाकारांशी गप्पा अन् ‘श्रावण क्वीन’ची रंगत

विसर्जन मिरवणुकीचा मार्ग असा

​विसर्जन मिरवणूक कृष्णा चौकातून सुरू होऊन शिवनेरी चौक मार्गे महालक्ष्मी मंदिर रस्त्याने फेमस चौकात पोहोचेल. तेथून पुढे साई चौक, माहेश्वरी चौक मार्गे अहिल्यादेवी होळकर विसर्जन घाटावर मूर्तींचे विसर्जन केले जाईल. मिरवणुकीदरम्यान कोणताही गोंधळ उडू नये म्हणून महापालिकेच्या गाड्या वेळेत उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मागील वर्षी गाड्या उशिरा आल्यामुळे मोठ्या मूर्ती उचलण्यात आणि विसर्जनासाठी काहीसा तांत्रिक वेळ वाढला होता, तो अनुभव लक्षात घेता यंदा मोठ्या मूर्ती तात्काळ शिफ्ट करण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

Sangvi Police
Sangvi Dahi Handi: सांगवीतील दुर्घटनेनंतर दहीहंडीवर पोलिसांची करडी नजर; डीजेचा दणदणाट कमी, नियमभंगावर थेट कारवाई

मूर्ती विसर्जनासाठी येथे असेल व्यवस्‍था

नदीत थेट विसर्जन करण्यास पूर्ण बंदी असून, नागरिकांच्या सोयीसाठी काटेपुरम चौक (बॅडमिंटन हॉलच्या बाजूला), वेताळ बाबा गार्डन आणि अहिल्याबाई होळकर दशक्रिया घाटाजवळ कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून मिरवणूक मार्गावरील धोकादायक केबलच्या वायरी आणि झाडांच्या फांद्या वेळेतच छाटण्याचे निर्देश महावितरण व उद्यान विभागाला देण्यात आले आहेत. संपूर्ण मिरवणुकीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी कृष्णा चौक, क्रांतीनगर चौक आणि ढोरे चौक या तीन महत्त्वाच्या ठिकाणी विशेष ‘’सुरक्षा छावण्या’’ उभारण्यात येणार आहेत.

आवाजाची मर्यादा पाळा

​मिरवणुकीत डीजे लावण्यास बंदी नाही, परंतु हा परिसर रेसिडेन्शिअल असल्याने नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. दिवसभर डीजेचा आवाज ५५ डेसिबल, तर रात्रीच्या वेळी ४५ ते ५० डेसिबल एवढाच मर्यादित ठेवावा लागेल. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, लेझर लाईटवर पूर्णपणे बंदी असून कुणीही याचा वापर करू नये. लेझर लाईट वापरणाऱ्यांवर १ हजार रुपयांचा दंड तर केला जाईलच, शिवाय अशा गुन्ह्यांची नोंद पासपोर्ट पडताळणीमध्ये अडचण ठरू शकते; त्यामुळे कोणीही हा धोका पत्करू नये, असे आवाहन सांगवी पोलिसांतर्फे करण्यात आले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news