Pimpri RTO NH Series Fancy Number: पिंपरी आरटीओत दुचाकींसाठी ‘एनएच’ नवी मालिका; आकर्षक क्रमांकासाठी अर्जाची संधी

तीनपट शुल्क भरून पसंतीचे क्रमांक मिळणार; 22 एप्रिल रोजी अर्ज करण्याचे आवाहन
RTO NH Series
RTO NH SeriesPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी एनएच ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. नव्याने सुरू होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक हवे असल्यास तीनपट शुल्क भरून चारचाकी वाहनधारकांनी बुधवार (दि. 22) सकाळी 11 ते दुपारी अडीच वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RTO NH Series
Pimpri Auto Rickshaw Permit Issue: पिंपरीत परमिटपेक्षा जास्त रिक्षांची नोंदणी; वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर

अर्ज कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी ‌‘डी.वाय.आर.टी.ओ.‌’, पिंपरी चिंचवड यांच्या नावे राष्ट्रीयीकृत, अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा. अर्जदाराने ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत फोटो ओळखपत्र तसेच पत्त्याच्या पुराव्यासाठी आधारकार्ड, दूरध्वनी देयक आदींची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.

RTO NH Series
Pimpri Heavy Vehicle Traffic Fine: पिंपरीत अवजड वाहनांवर कारवाई; नियमभंगासाठी 3 कोटींचा दंड वसूल

चारचाकी वाहनांसाठी क्रमांकांची यादी 23 एप्रिल रोजी सकाळी कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येईल. यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असल्यास 23 एप्रिल रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा.

RTO NH Series
Pimpri RTE Admission: पिंपरीत आरटीई प्रवेश कागदपत्र पडताळणीस मुदतवाढ; पालकांना दिलासा

त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधीत अर्जदारांसमोर लिफाफे उघडून विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्या अर्जदारास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही.

RTO NH Series
Mulshi Firing Incident: मुळशीतील माण गावच्या यात्रेत गोळीबार; दहशत निर्माण, एकाला अटक

नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 180 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर, राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकार जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही. आकर्षक क्रमांकाचे शुल्कामध्ये बदल झाल्यास त्याप्रमाणे विहीत केलेले शुल्क लागू करण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news