Pimpri RTE Admission: पिंपरीत आरटीई प्रवेश कागदपत्र पडताळणीस मुदतवाढ; पालकांना दिलासा

20 एप्रिलची अंतिम मुदत अपुरी ठरली; गर्दीमुळे पडताळणी अपूर्ण, आता 30 एप्रिलपर्यंत संधी
RTE admission
RTE Admission Pudhari
Published on
Updated on

पिंपरी: आरटीई प्रवेशासाठी कागदपत्र तपासणीसाठी सोमवार (दि. 20) अंतिम मुदत होती; मात्र दिलेल्या मुदतीमध्ये बहुतांश पालकांची कागदपत्र पडताळणी अपूर्ण राहिल्याने, प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

RTE admission
Mulshi Firing Incident: मुळशीतील माण गावच्या यात्रेत गोळीबार; दहशत निर्माण, एकाला अटक

सोमवार (दि. 20) कागदपत्र पडताळणीची अंतिम मुदत म्हणून आकुर्डीतील कै. वसंतदादा पाटील विद्यामंदिर याठिकाणी पालकांची गर्दी झाली होती. आरटीई प्रवेशाची लॉटरी 10 एप्रिल रोजी काढण्यात आली. त्यानंतर कागदपत्र तपासणीला सुरुवात झाली. दहा दिवसांत पालकांची कागदपत्र पडताळणीसाठी दमछाक झाली. पालकांना देण्यात आलेल्या टोकनप्रमाणे पालकांनी येवून कागदपत्र तपासणी करायची होती.

RTE admission
Pimpri School Uniform Book Purchase Compulsion: पिंपरीत शाळांकडून गणवेश व पुस्तके ठराविक दुकानांतूनच खरेदीची सक्ती; पालक संतप्त

कागदपत्र पडताळणीसाठी दहा दिवस हा खूपच कमी कालावधी असल्याने पालकांची पडताळणीसाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी होती. पडताळणी केंद्रावर झालेली गर्दी पाहता बहुतांश पालकांची कागदपत्रं पडताळणी करण्याचे काम अपूर्ण राहिले होते. कागदपत्रं तपासणीशिवाय शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाहीत. कागदपत्र पडताळणीसाठी पालकांना टोकन देण्यात आले आहे. वेळेत कागदपत्र तपासणी होते की नाही, यामुळे पालकवर्गात चिंता होती. कामगदपत्र पडताळणीसाठी मुदतवाढ मिळाल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news