

कामशेत: कामशेत ग््रुाप ग््राामपंचायतने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत निवासी मालमत्ता व अन्य थकबाकी करावर 50 टक्के सवलत देण्याचा ठराव मंजूर केला आहे. यामुळे थकीत कराची रक्कम जमा करण्यासाठी नागरिकांची गर्दी होवू लागली आहे.
शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व ग््राामपंचायतींना थकित निवासी मालमत्ता करधारकांना थकित रकमेत 50 टक्के सवलत द्यायची की नाही याचे सर्वस्वी अधिकार ग््राामपंचायतीस देण्यात आले आहेत. त्यानुसार ग््राामपंचायतने विषेश ग््राामसभा घेवून 50 टक्के सवलत ठराव मंजूर केला आहे.
ही सवलत केवळ निवासी मालमत्ताधारक यांनाच मिळणार असून, औदयोगिक, वाणिज्यिक व इतर मालमत्ता करीता नाही. ही सवलत 31 डिसेंबरपर्यंत लागू असून 1 एप्रिल 2025 च्या पूर्वीच्या थकबाकीदारांना या सवलतीचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी सन 2025-26 चा मालमत्ता कर हा एकरकमी भरावा लागणार आहे.
तरी कामशेतच्या थकबाकीधारकांनी या योजनेचा लाभ घेवून आपला थकीत मालमत्ता कर त्वरीत जमा करावा, असे आवाहन कामशेतचे सरपंच रुपेश गायकवाड यांनी केले आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार विषेश ग्रामसभेचे आयोजन करून ठराव बहुमताने मंजूर केला आहे. स्थानिक मालमत्ता कर, पाणीपट्टी व दिवाबत्ती कर या थकित असलेल्या करावर 50 टक्के सवलत देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तरी निवासी मालमत्ताधारकांनी याचा लाभ घेऊन त्वरीत आपल्या थकीत कर जमा करावा.
धनंजय देशमुख, ग्रामसेवक, कामशेत
कामशेत ग्रामपंचायतीने थकबाकी जमा करणार्यास सहलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ग्रामपंचायत कार्यालय हे सुटीच्या दिवशीदेखील सुरू ठेवण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.
रुपेश गायकवाड, सरपंच, कामशेत