Pimpri Vegetable Market Prices: पिंपरी-मोशी भाजी बाजारात दर स्थिर; काही भाज्या महाग, काही स्वस्त

कांदापात आणि बिन्सचे भाव तेजीत; मोशी उपबाजारात मोठी आवक नोंद
Vegetable
VegetablePudhari
Published on
Updated on

पिंपरी: लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. 31) गेल्या आठवड्याप्रमाणे फळभाज्यांचे दर स्थिर होते. कांदापातची आवक कमी झाल्यामुळे प्रति जुडीची 50 ते 60 रुपयांना विक्री झाली. तसेच, बिन्स, पावटा आणि घेवड्याचे दर तेजीत होते. तर गवार, शेवग्याचे दर कमी झाले होते.

Vegetable
Pimpri Chinchwad EV Vehicle Cost: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इलेक्ट्रिक वाहनांवर वाढता खर्च; उधळपट्टीचा आरोप

भाजी मंडईत पालेभाज्यांच्या दरात किंचित वाढ झाली होती. कोथिंबीर व मेथीची जुडी 25 रूपये दराने होती. तर, गवार आणि शेवगा 50- 60 रूपये किलोने मिळत होता. वांगी, फ्लॉवरचा किलोचा दर 40-50 रूपये होता. मिरची 50 रूपये, कांदे 100 रूपयांना 5 किलो, लसूण 100-150 रूपये आणि आल्याची 80-90 रूपये किलो दराने विक्री झाली.

Vegetable
Fugewadi Toxic Liquor Case Compensation: फुगेवाडी विषारी दारूकांडातील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख मदत

फळभाज्यांचे किलोचे दर पुढील प्रमाणे (रुपयांत)

रविवारी पिंपरी भाजी मंडईत गवार 50, शेवगा 40, टोमॅटो 25, भेंडी 50, फ्लॉवर 30, कोबी 25, मिरची 50, गाजर 25, शिमला 40, लसूण 100-120, आले 70, वांगी 40, काकडी 30, कारले 40, कांदे 20-25, बटाटा 25-30, बिन्स 70, पावटा 70, लाल भोपळा 30, घोसाळी 50, दोडका 30, तोंडली 50, बीट 30, दुधी 30, घेवडा 80.

Vegetable
Tobacco Free Schools: पुणे जिल्ह्यात 2,322 संस्था तंबाखूमुक्त; राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाला मोठे यश

पिंपरी भाजी मंडईतील पाले भाज्यांचे दर (रुपयांत) प्रति जुडी

कोथिंबीर 20, मेथी 25, पालक 20, शेपू 25, राजगिरा 25, पुदिना 10, मुळा 30, चवळई 15, लाल माठ 15, कांदापात 50-60, करडई 15, आळू पाने 15, आंबट चुका 20, गवती चहा 10.

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ)

शेवगा 50-60 रूपये, गवार 60-70, वाटाणा 70-80, पावटा 90, तोंडली 50-60, बीट 50-60, दोडका 60-70, कारली 50-60, भरताची वांगी 40, भेंडी 50-60, मिरची 80, फ्लॉवर 40-50, कोबी 25-30, वांगी 40, घोसाळे 60, पडवळ 100, दुधी भोपळा 40, पापडी 90-100, पावटा 90-100, परवल 80, सुरण 80, मद्रास काकडी 40, आरबी 50, सिमला 50-60, राजमा 80, बिन्स 70-80, राजमा 80-90, गाजर 40, आरवी 60-70, रताळी 50-60, टोमॅटो 30-40, काकडी 40, बीट 30-40.

Vegetable
Maval Illegal Liquor Trade: मावळात गावठी दारूचा सुळसुळाट; फुगेवाडी घटनेनंतरही अवैध विक्री सुरूच

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रुपयांत)

कांदा 9, बटाटा 12, लसूण 65, आले 35, भेंडी 25, गवार 50, टोमॅटो 25, वाटाणा 90, घेवडा 90, दोडका 35, हिरवी मिरची 75, दुधी भोपळा 25, काकडी 25, कारली 35, गाजर 25, फ्लॉवर 15, कोबी 9, वांगी 25, बीट 30, शेवगा 45, घोसाळी 30, लिंबू 100, मका कणीस 50.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी : 3881, पालेभाजी : 49000 (गड्डी), फळे आवक : 821 कांदा 668, बटाटा 645, आले 105, लसूण 17, भेंडी 112, गवार 43, टोमॅटो 531, वाटाणा 2, घेवडा 20, दोडका 11, हिरवी मिरची 127, दुधी भोपळा 86, काकडी 147, कारली 36, डांगर 78, गाजर 117, फ्लॉवर 270, कोबी 300, वांगी 193, ढोबळी 57, बीट 23, शेवगा 88, लिंबू 39, मका कणीस 45, तोंडली 20, रताळी 4.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news