Fugewadi Toxic Liquor Case Compensation: फुगेवाडी विषारी दारूकांडातील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख मदत

मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा
Fugewadi Toxic Liquor Case Compensation
Fugewadi Toxic Liquor Case CompensationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: फुगेवाडी येथील विषारी दारू पिऊन मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची मदत केली जाणार आहे, असे राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी (दि. 30) सांगितले. या प्रकरणात अतिउच्च अधिकारी दोषी असल्यास त्यांनाही सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Fugewadi Toxic Liquor Case Compensation
Tobacco Free Schools: पुणे जिल्ह्यात 2,322 संस्था तंबाखूमुक्त; राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाला मोठे यश

मंत्री गिरीश महाजन यांनी आज फुगेवाडी भागास भेट दिली. मृतांच्या कुटुंबीय, नातेवाईकांनाची भेट घेऊन त्यांचे सात्वंन केले. त्यांना धीर दिला. या वेळी आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, महापौर रवी लांडगे, सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, माजी खासदार अमर साबळे आदी उपस्थित होते.

Fugewadi Toxic Liquor Case Compensation
Maval Illegal Liquor Trade: मावळात गावठी दारूचा सुळसुळाट; फुगेवाडी घटनेनंतरही अवैध विक्री सुरूच

माध्यमाशी बोलताना मंत्री महाजन म्हणाले, मिथेनॉलचे मिश्रण करून विषारी दारूची विक्री केली जात होती. ती दारू पिल्याने 19 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची मदत केली जाणार आहे.

Fugewadi Toxic Liquor Case Compensation
PCMC Employee Retirement: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 88 अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त; आयुक्तांच्या हस्ते सत्कार

रोजीरोटीसाठी त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत कंत्राटी पद्धतीने सामावून घेतले जाणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने 13 जणांना निलंबित केले आहे. दारू विक्रीकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे.

Fugewadi Toxic Liquor Case Compensation
Pimpri Mula River Pollution: मुळा नदीची दयनीय अवस्था; कोट्यवधी खर्चानंतरही फेसाळ पाणी, कचऱ्याचे साम्राज्य कायम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कडक शब्दात सूचना दिल्या आहेत. यापुढे एक थेंबही दारूची विक्री होणार नाही. यातील एकही दोषी सुटणार नाही, असे महाजन यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news