Pimpri Chinchwad Anti Drug SOP: पिंपरी-चिंचवडमध्ये अँटी ड्रग मोहीम कडक; शाळा-कॉलेजमध्ये SOP लागू

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरप्राईज तपासणी, अँटी ड्रग कमिटी अनिवार्य
Anti Drug SOP
Anti Drug SOPPudhari
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी: शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने सर्वसमावेशक आणि कडक ‌‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर‌’ (SOP) लागू केली आहे. अमली पदार्थ टास्क फोर्स, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनांनुसार प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि वसतिगृह स्तरावर अँटी ड्रग कमिटी स्थापन करण्याबरोबरच सरप्राईज चेकिंग स्क्वॉड कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि भविष्य अबाधित ठेवणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Anti Drug SOP
PCMC 60 Crore Scam: पीसीएमसी 60 कोटी घोटाळा: ‘विभागप्रमुख जबाबदार’; प्रवीण जैन यांचा दावा

विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेचा वाढता धोका लक्षात घेऊन पोलिस ठाणे स्तरावर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. पथनाट्य, व्याख्याने, चर्चा सत्रे, निबंध, वक्तृत्व, पोस्टर व चित्रकला स्पर्धांच्या माध्यमातून अंमली पदार्थांचे दुष्परिणाम प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. यासाठी अंमली पदार्थ टास्क फोर्सने तयार केलेली मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पीपीटी सादरीकरण वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाचे छायाचित्र, व्हिडिओ संकलन करून सविस्तर अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहतूक शाखेच्या ‌‘एक दिवस शाळेसाठी‌’ या उपक्रमालाही या मोहिमेशी जोडण्यात आले असून, विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या धोक्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमाद्वारे विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.

Anti Drug SOP
Pimpri RTE Admission Verification: पिंपरीत RTE प्रवेशप्रक्रियेत गोंधळ; कागदपत्रांमुळे प्रवेश रखडण्याची भीती

गोपनीय माहिती देण्यास प्रोत्साहन

शाळा, महाविद्यालय व वसतिगृह परिसरात अंमली पदार्थांचा वापर अथवा पुरवठ्याबाबत गोपनीय माहिती देण्यासाठी तक्रार पेटी बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही पेटी संस्थेच्या दर्शनी भागात बसवून आठवड्यातून एकदा अँटी ड्रग कमिटीसमोर उघडली जाणार आहे. प्राप्त तक्रारींची प्राचार्यांकडून नोंद व पडताळणी करून संबंधित पोलिस ठाण्यास कळविण्यात येईल आणि त्यानुसार तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

शाळेच्या 100 मीटर परिसरात विशेष लक्ष

शाळा, महाविद्यालयांच्या 100 मीटर परिसरात अंमली पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, सेवन किंवा पुरवठा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी पोलिस ठाणेकडील बीट मार्शल, गस्त अधिकारी आणि गुन्हे शाखेच्या माध्यमातून पानटपऱ्या, कॅफे, हॉटेल, स्टेशनरी व इतर आस्थापनांची नियमित तपासणी केली जाणार आहे.

Anti Drug SOP
Pimpri Heatwave Temperature: पिंपरीत तापमान 41 अंशांवर; एप्रिलमध्ये उष्णतेचा विक्रम

अँटी ड्रग कमिटीची सविस्तर रचना

प्रत्येक शाळा व महाविद्यालयात प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली अँटी ड्रग कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत दोन शिक्षक, एक पालक प्रतिनिधी, दोन विद्यार्थी प्रतिनिधी आणि एक सुरक्षा रक्षक/वॉर्डन यांचा समावेश असेल. विशेष सदस्य म्हणून आरोग्य विभागाचे प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभागाचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते (किमान एक महिला) मानसोपचार तज्ञ आणि स्थानिक पोलिस यांचा समावेश करण्यात येणार आहे. ही समिती दर महिन्याला बैठक घेऊन जनजागृती कार्यक्रम राबविणे, संशयास्पद बाबींची माहिती मिळवणे आणि परिसरात अंमली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी उपाययोजना करणार आहे.

मासिक अहवाल अनिवार्य

अंमली पदार्थ विरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हास्तरीय बैठकीत नियमित पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच सर्व पोलीस ठाणे व शाखांना दर महिन्याच्या 1 तारखेला केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल पीसीबी गुन्हे शाखेकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

व्यसनाधीन विद्यार्थ्यांचे समुपदेशन

शाळा व महाविद्यालय प्रशासनाने व्यसनाधीन विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांच्या पालकांच्या सहकार्याने मानसोपचार तज्ञ व सामाजिक संस्थांच्या मदतीने समुपदेशन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या किंवा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या इसमांबाबत शाळा प्रमुख, सुरक्षा रक्षक व गोपनीय पथकांकडून माहिती संकलित केली जाणार आहे.

Anti Drug SOP
Pavana Dam Water Level: पवना धरणात 39% पाणी; पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्यावर ताण

सरप्राईज चेकिंग स्क्वॉडची अंमलबजावणी

प्राचार्य आणि दोन शिक्षकांच्या नेतृत्वाखाली सरप्राईज चेकिंग स्क्वॉड स्थापन करून विद्यार्थ्यांच्या बॅगा, वॉशरूम परिसर व इतर ठिकाणांची अचानक तपासणी केली जाणार आहे. संशयित विद्यार्थ्यांची समुपदेशनाद्वारे चौकशी करून योग्य मार्गदर्शन केले जाईल.

संशयित ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर

शाळा व महाविद्यालय परिसरातील निर्जन स्थळे, मोकळी मैदाने, अर्धवट बांधकामे, पडकी इमारती, बसस्टॉप, रेल्वे स्थानके, स्टेडियम तसेच बंद पडलेल्या कंपन्या व कारखान्यांवर पोलिसांकडून नियमित तपासणी केली जाणार आहे.

वसतिगृहांमध्ये कडक डिलिव्हरी तपासणी

वसतिगृहांमध्ये अमली पदार्थांची गुप्त वाहतूक रोखण्यासाठी प्रत्येक पार्सलची तपासणी, डिलिव्हरी बॉयचे ओळखपत्र पडताळणी, एकच पार्सल घेण्यासाठी एकच पॉईंट निश्चित करणे, सीसीटीव्ही समोर पार्सल उघडणे आणि सविस्तर नोंदवही ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. संशयास्पद पार्सल आढळल्यास ते होल्ड करून पुढील चौकशी केली जाणार आहे. पोलिस अधिकारी दर 15 दिवसांनी वसतिगृहांची पाहणी करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news