Makar Sankranti Tilgul: संक्रातीचा गोडवा वाढवणारे तिळगूळ बाजारात दाखल; लाडू व चिक्कीला वाढती मागणी

पिंपरीत संक्रांतीपूर्वी बाजारपेठांमध्ये तिळगुळाच्या पदार्थांची रेलचेल, आरोग्यदायी तिळाला पसंती
Tilgul
TilgulPudhari
Published on
Updated on

पिंपरी: संक्रातीचा गोडवा वाढविण्यासाठी दरवर्षीप्रमाणे बाजारात रेडिमेड तिळगूळ उपलब्ध झाले आहेत. यामध्ये काटेरी हलवा आणि तिळाची वडी, लाडूंना मागणी वाढू लागली आहे. संक्रातीच्या सणाला तीळगुळाचे लाडू किंवा वड्या आवर्जून खाल्ल्या जातात.

Tilgul
Pimpri Chinchwad Municipal Election: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक; पाच आमदारांची प्रतिष्ठा पणाला

तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात. जे थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता देतात. जानेवारी महिन्यातील पहिला सण म्हणजे मकर संक्रात यादिवशी तिळगूळ घ्या गोड गोड बोला असे म्हणून तिळगूळ देण्याची प्रथा आहे. बाजारात रंगीबेरंगी काटेरी हलव्याची लहान व मोठ्या आकारातील पाकिटे उपलब्ध आहेत. तसेच तिळ आणि शेंगदाण्यांपासून तयार केलेली चिक्की, लाडू, तिळाची वडी, लाडू आदी उपलब्ध झाले आहेत.

Tilgul
Pimpri Municipal Election Devendra Fadanvis: पिंपरी महापालिका निवडणूक; भ्रष्टाचाराच्या आरोपांवर फडणवीस काय बोलणार?

संक्रातीसाठी लागणारे विविध साहित्य, खाद्यपदार्थ तिळगुळ, सुगड बाजारात दाखल झाले आहेत. बाजारपेठांमध्ये ठिकठिकाणी तिळगुळाचे स्टॉल लागले असून 10 रूपये, 20 रूपये अशा दराने तिळगुळाची पाकिटे उपलब्ध आहेत.

Tilgul
Pimpri Chinchwad Election Counting: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक; 16 जानेवारीला आठ ठिकाणी मतमोजणी

संक्रातीला गूळपोळी, तिळपोळी केली जाते. तसेच भोगीच्या दिवशी बाजरीच्या भाकरीला तीळ लावले जातात. यासाठी दुकानामध्ये शेंगदाणे, गुळ, तीळ यांना मागणी वाढली आहे. तिळाचे फायदे अनेक आहेत, त्यामुळे हिवाळ्यात तिळाचा आहारात समावेश केला जातो आणि विशेषतः तीळ आणि गूळ यापासून केलेल्या वड्या किंवा लाडू आरोग्यासाठी पोषक आहेत. सणासुदीच्या निमित्ताने हे पदार्थ खाल्ले जातात.

Tilgul
Pimpri Chinchwad Voting ID Proof: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक: मतदानासाठी ओळखपत्र अनिवार्य

तिळगूळ लाडू, चिक्कीला मागणी

काटेरी हलव्यापेक्षा तिळाच्या चिक्कीला, वड्यांना मागणी आहे. चवीला उत्तम असणारे तीळलाडू किंवा तिळाच्या वड्या रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात तिळगुळाच्या लाडू व चिक्कीला अधिक मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news