

पिंपरी: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोपींच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यातच दोन्ही राष्ट्रवादीकडून महापालिकेच्या विकासकामांवरून भष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. कोट्यवधींच्या कामाबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे.
यावर स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून खंडन केले आहे; मात्र आता याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरात शनिवार (दि. 10) दुपारी अडीच वाजता ही सभा होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विकासकामांचा आढावा, तसेच, शहराच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप या वेळी मांडण्यात येणार आहे. त्यातच शहरातील प्रमुख विरोधक व राज्यात महायुतीत एकत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग््रेासच्या विरोधात नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील भाजपावर भष्ट्राचाराचा आरोप केला आहे.
दोन्ही राष्ट्रवादीकडून शहर भाजपाला खिंडित पकडले असून, गुन्हेगारी, कोट्यवधीचा भष्ट्राचार, रिंग, ठेकेदारी असे अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यामुळे या विषयावर मुख्यमंत्री फडणवीस नेमके कोणत्या भाषेत उत्तर देणार याबाबत उत्सुकता लागली आहे.