Pimpri Heavy Vehicle Parking: पिंपरीत जड वाहनांचा मनमानी पार्किंग; चौक, गल्लीबोळांत ट्रक-टेम्पो, वाहतुकीला अडथळा

प्रवेशबंदी असतानाही प्रमुख मार्गांवर जड वाहनांचा वावर; रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनांच्या मार्गाबाबत नागरिकांची चिंता
Heavy Vehicle Parking
Heavy Vehicle ParkingPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसा जड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही ट्रक, लॉरी सर्रासपणे रस्त्याच्या कडेला, चौकात आणि अगदी गल्लीबोळांत उभे राहत असल्याचे चित्र दिसत आहे. पिंपरीतील डॉ. आंबेडकर चौकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी भररस्त्यात मोठी लॉरी उभी असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे रविवारीसारख्या सुट्टीच्या दिवशीही जड वाहनांचा शहरातील प्रमुख मार्गांवर मुक्त वावर सुरू असल्याने वाहतूक नियंत्रण आणि कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Heavy Vehicle Parking
Pimple Gurav Footpath Encroachment: पिंपळे गुरवमध्ये पदपथावर अतिक्रमण; पार्किंग, कचरापेट्या अन् तरुणांच्या ठिय्यामुळे पादचारी त्रस्त

गल्लीही झाली जड वाहनांसाठी ‘पार्किंग झोन’

केवळ प्रमुख रस्तेच नव्हे, तर शहरातील अंतर्गत रस्ते आणि गल्लीबोळांमध्येही मोठे टेम्पो उभे केले जात असल्याचे दिसून येते. सकाळच्या वर्दळीच्या वेळी गल्लीमध्ये जड वाहन उभे राहिल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी वाहनांना एकमेकांना मार्ग देतानाही कसरत करावी लागत आहे.

Heavy Vehicle Parking
Pimpri Building Permission: पिंपरीत बांधकाम परवानगी प्रक्रियेला ‘सिंगल विंडो’ची मागणी; सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास आंदोलन

रुग्णवाहिकेने जायचे तरी कसे?

जड वाहन चुकीच्या ठिकाणी उभे राहिल्यास त्याचा परिणाम केवळ वाहतूक कोंडीपुरता मर्यादित राहत नाही. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने किंवा अन्य आपत्कालीन सेवांची वाहने अडकल्यास काही मिनिटांचा विलंबही गंभीर ठरू शकतो. त्यामुळे अशा वाहनांवर केवळ दंडात्मक कारवाई नव्हे, तर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.

Heavy Vehicle Parking
Vallabhnagar Shiv Bhojan Centre: वल्लभनगर आगारातील शिवभोजन केंद्राला टाळे; एफडीएचे पथक तपासणीविना परतले

रविवारीही नियमांची अंमलबजावणी कुठे?

सुट्टीच्या दिवशी वाहतूक तुलनेने कमी असली तरी जड वाहनांना शहरातील प्रमुख चौकांमध्ये उभे करण्याची मुभा मिळाल्यास भविष्यात हीच समस्या अधिक गंभीर होऊ शकते. प्रवेशबंदीच्या वेळेत जड वाहनांचा वावर, नो-पार्किंग क्षेत्रातील पार्किंग आणि रस्त्यावर माल उतरविण्याच्या प्रकारांकडे वाहतूक पोलिसांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

Heavy Vehicle Parking
Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी बाजारात भाजीपाल्याचे दर तेजीत; लिंबू २०० रुपये किलो, गावरान गवार २०० वर

जड वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यास संबंधित वाहनांवर नियमानुसार कारवाई केली जाते. नागरिकांनी अशा वाहनांची माहिती वाहतूक पोलिसांना द्यावी. प्रतिबंधित वेळेत जड वाहनांचा प्रवेश आणि चुकीच्या पद्धतीने पार्किंग याबाबत तपासणी वाढविण्यात येईल.

अमित डोळस, वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक.

चौक आणि अंतर्गत रस्त्यावर मोठे ट्रक-टेम्पो उभे राहिल्यामुळे रोजच्या प्रवासाला अडथळा होतो. रुग्णवाहिका किंवा अग्निशमन वाहनाला अशा वेळी मार्ग मिळाला नाही तर जबाबदार कोण? नियम फक्त कागदावर न राहता प्रत्यक्ष रस्त्यावर दिसायला हवेत.

श्रीकांत सातपुते, स्थानिक नागरिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news