Vallabhnagar Shiv Bhojan Centre: वल्लभनगर आगारातील शिवभोजन केंद्राला टाळे; एफडीएचे पथक तपासणीविना परतले

भाडे थकल्याने एसटी प्रशासनाची कारवाई; गाळे बंद असल्याने खाद्यपदार्थांचे नमुने घेता आले नाहीत
Vallabhnagar Bus Depot FDA Inspection
Vallabhnagar Bus Depot FDA Inspection Pudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: वल्लभनगर एसटी आगारातील शिवभोजन केंद्र व इतर गाळ्यांचे भाडे थकल्याने एस.टी. प्रशासनाने चार दिवसांपूर्वीच बंद केले आहेत. दरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) पथक या केंद्राची तपासणी करण्यासाठी आगारात दाखल झाले; मात्र त्यांना गाळ्यास टाळे असल्याचे दिसले. त्यामुळे पथकाला प्रत्यक्ष तपासणीअभावी परतावे लागले.

Vallabhnagar Bus Depot FDA Inspection
Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी बाजारात भाजीपाल्याचे दर तेजीत; लिंबू २०० रुपये किलो, गावरान गवार २०० वर

कॅन्टीन व खाद्यपदार्थ विक्री केद्रांची तपासणी मोहिमेंतर्गत एफडीएचे पथक काही दिवसांपूर्वी वल्लभनगर आगारात दाखल झाले. तेथील शिवभोजन केंद्राची तसेच इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील पदार्थांची तपासणी करण्यात येणार होती; मात्र प्रत्यषात तेथील काही गाळ्यांना टाळे लावण्यात आले होते.

Vallabhnagar Bus Depot FDA Inspection
Pimpri Ajmera PWD Colony: पिंपरी अजमेरा कॉलनीतील सरकारी वसाहतीची दुरवस्था; बाहेर रंगरंगोटी, आत समस्या कायम

या संदर्भात आगारप्रमुखांकडे माहिती घेण्यात आली असता, संबंधित गाळेधारकाकडे भाडे थकीत असल्याने प्रशासनाने कारवाई करुन गाळे बंद केले आहे. गाळे आधीच बंद असल्याने एफडीएच्या पथकाला खाद्यपदार्थांची तपासणी किंवा नमुने घेता आले नाहीत. त्यामुळे पथकाला केवळ आगार प्रशासनाकडून माहिती घेऊन परतावे लागले.

Vallabhnagar Bus Depot FDA Inspection
Pimpri Chinchwad Dhol World Record: पिंपरी-चिंचवडमध्ये ४,११२ ढोलांचा विश्वविक्रम; शिव-शंभूंच्या जयघोषाने दुमदुमला परिसर

कॅन्टीनची एफडीएकडून तपासणी : अन्न औषध प्रशासनाने (एफडीए) पथकाने संबंधित शिवभोजन केंद्र व स्नॅक्स सेंटरची पाहणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित गाळे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थ, स्वच्छता, साठवणूक, तसेच इतर बाबींची प्रत्यक्ष तापसणी करण्यास पथकाला संधी मिळाली नाही. तसेच राज्याभरातील एस.टी. आगारातील कॅन्टिनची पाहणी एफडीएकडून सुरु आहे. त्यातंर्गत पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे.

Vallabhnagar Bus Depot FDA Inspection
Moshi Waste To Energy Project: मोशीचा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प चार महिन्यांपासून बंद; ठेकेदाराला दररोज ५० हजारांचा दंड

एफडीए आगारात तपासणीसाठी आले होते. परंतू सदर गाळ्याची भाडे थकबाकी असल्याने शिवभोजन केंद्राचा गाळा बंद करण्यात आला आहे. तसेच ३० तारीख शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसापर्यंत पैसे न भरल्याने आस्थापना बंद करण्यासाठी तीनदा नोटीसा लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे एफडीएला कोणत्याही प्रकारची तपासणी करण्यात आली नाही.

वैशाली कांबळे स्थानक प्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news