Pimpri Chinchwad Women Counselling: वाकडमधील विवाहित महिलेच्या जीवन संपवल्याने सभागृहात संताप; पिंपरी-चिंचवडमध्ये १० समुपदेशन केंद्रे सुरू होणार

हुंडाबळी, मानसिक-शारीरिक छळ रोखण्यासाठी महापौरांचे निर्देश; महिलांसाठी स्वतंत्र समुपदेशन पोर्टलही सुरू करण्याचा निर्णय
Counselling
CounsellingPudhari
Published on
Updated on

पिंपरी: वाकड येथील एका विवाहित महिलेच्या आत्महत्येच्या घटनेवरून सभागृहात संताप व्यक्त करण्यात आला. हुंडाबळी, महिलांचा मानसिक व शारीरिक छळ, पैश्यासाठी छळ तसेच, उधळपट्टी हे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना सभागृहात नगरसेवकांनी केल्या. त्यानुसार, महापौरांनी शहरात पीडित महिला समुपदेशन केंद्र तसेच, पोर्टल सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

Counselling
Pimpri District Hospital: पिंपरीतील जिल्हा रुग्णालयाची दुरवस्था; स्वच्छतागृहे अस्वच्छ, लिफ्ट नादुरुस्त अन् फायर सेफ्टी ऑडिटही रखडले

सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवी लांडगे होते. सभेत महिलांच्या आत्महत्या आणि छळ प्रकरणावरून चर्चा करण्यात आली. त्या घटनेचा नगरसेवकांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. पोलिस आयुक्तांची भेट घेऊन हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा करण्याचा मागणी करण्यात आली. सत्तारूढ पक्षनेता प्रशांत शितोळे यांनी स्मार्ट सिटी, आयटी पार्क असलेल्या विकसित भागात अशा घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली.

Counselling
Pimpri Ganesh Decoration: गणरायाच्या सजावटीला ‘पुन्हा वापरा’चा ट्रेंड; कापडी, प्लास्टिकच्या फुले-पानांना पसंती

चर्चेत उपमहापौर शर्मिला बाबर, वर्षा जगताप, अपर्णा डोके, योगिता नागरगोजे, वैशाली घोडेकर, सुलभा उबाळे, अनुराधा गोरखे आदींनी सहभाग घेत आपले मत प्रदर्शन केले. चर्चेनंतर महापौर लांडगे यांनी महिलांचे समुपदेशन करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल सुरु करावे. शहरात दहा ठिकाणी समुपदेशन केंद्र सुरू करावे, असे निर्देश आयुक्तांना दिले. त्या प्रकरणी गुरूवारी (दि.3) पोलिस आयुक्तांची भेट घेतली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Counselling
Pimpri Chinchwad Dahi Handi: दहीहंडीच्या उत्सवात डॉल्बीचा दणदणाट भोवला; पिंपरी-चिंचवडमध्ये १६ मंडळांवर गुन्हे

'श्रीमंत असले की तो बुद्धिवंत असल्याचा गैरसमज'

समाजात श्रीमंत असले की तो बुद्धिवंत असल्याचा गैरसमज आहे. रात्री नऊनंतर घराबाहेर पडून तरुण मुले काय करतात. मध्यरात्री वाहन अपघातात ते का मरतात, हे तपासले जावे. निव्वळ बैलासारखे वागू नका. घरात 100 तोळे सोने असूनही सून का रडते, याचा गांभीर्याने विचार केला जावा, असे सांगत विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी समाजात महिलांचा सन्मान न करणार्‍यांचे कान टोचले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news