Pimpri Ganesh Decoration: गणरायाच्या सजावटीला ‘पुन्हा वापरा’चा ट्रेंड; कापडी, प्लास्टिकच्या फुले-पानांना पसंती

पिंपरी बाजारात सजावटीच्या वस्तूंची रेलचेल; हुबेहूब दिसणारी कृत्रिम फुले-पाने ठरताहेत भक्तांसाठी सोयीचा पर्याय
Ganesh Decoration
Ganesh DecorationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: लाडक्या बाप्पाच्या उत्सवासाठी अवघ्या आठवडाभराचा कालावधी शिल्लक राहिला असून, भक्तांना आगमनाचे वेध लागले आहेत. त्यामुळे बाप्पाच्या सजावटीसाठी वेगळा पर्याय शोधणार्‍या भक्तांसाठी आता कापडी अन् प्लास्टिकच्या सजावटीच्या वस्तू उपलब्ध झाल्या आहेत.

Ganesh Decoration
Pimpri Chinchwad Dahi Handi: दहीहंडीच्या उत्सवात डॉल्बीचा दणदणाट भोवला; पिंपरी-चिंचवडमध्ये १६ मंडळांवर गुन्हे

गणपती आले की मूर्तीसाठी सजावट आलीच. पूजेसाठी सामानाची जुळवाजुळव करावी लागते. यामध्ये फुले, आंब्यांची पाने, जास्वंदीची फुले, विड्याची पाने तर हमखास हवीतच; तसेच दररोज कामामुळे ताजी फुले आणण्यास जमत नाही.

Ganesh Decoration
Pimpri Chinchwad Reserved Land: पिंपरी-चिंचवडमध्ये कोट्यवधींच्या आरक्षित जागा धूळ खात; अतिक्रमणासह खासगी उद्योगांचा सुळसुळाट

यावर पर्याय म्हणून बाजारात आणि ऑनलाईनदेखील कापडापासून बनविलेल्या केळीची पाने, विड्याची पाने, जास्वंदीची फुले, आंब्याची पाने उपलब्ध आहेत. सणासुणदीच्या काळात निर्माल्य कुठे टाकायचे, हा प्रश्न असतो. या वस्तूंमुळे निर्माल्याचा प्रश्न निर्माण होत नाही. कारण या वस्तू धुता येऊ शकतात. तसेच दिसायलाही हुबेहूब खर्‍याखुर्‍या फुलांपानांसारखी दिसतात.

Ganesh Decoration
Hinjewadi IT Employees Protest: हिंजवडी आयटी कर्मचाऱ्यांचा मूक मोर्चा; रस्ते, पाणी, वाहतूककोंडी अन् मेट्रोच्या प्रश्नांवर संताप

एकदा वापरल्यानंतर या धुवून पुन्हा वर्षभरातील इतर सणावारांसाठी वापरता येतात. तसेच दुकानामध्ये प्लॅस्टिकच्या माळादेखील उपलब्ध आहेत. यांचा इतरही काळात वापर करता येतो. त्यामुळे ग्राहकांचा या गोष्टी घेण्याकडे कल दिसून येत आहे.

Ganesh Decoration
Pimpri Chinchwad Water Supply: बिजलीनगर सबस्टेशनच्या स्फोटाचा पाणीपुरवठ्यालाही फटका; पिंपरी-चिंचवडकरांची दुहेरी कोंडी

कापडी, प्लास्टिकची फुले

गणपती सजावटीसाठी विविधरंगी फुले बाजारात उपलब्ध झाली आहेत. तसेच विविध प्रकारची तोरणेदेखील पहायला मिळत आहे. कागदी, कापडी व प्लॅस्टिकची फुले ही पुन्हा वापरता येण्यासारखी असल्याने ग्राहकांची पसंती आहे. सण म्हटला की तोरण लावले जाते. यासाठी तोरणेदेखील विक्रीस आली आहेत. पिंपरी बाजारात रस्त्याच्याकडेला मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news