Pimpri District Hospital: पिंपरीतील जिल्हा रुग्णालयाची दुरवस्था; स्वच्छतागृहे अस्वच्छ, लिफ्ट नादुरुस्त अन् फायर सेफ्टी ऑडिटही रखडले

६२ वर्षे जुन्या इमारतीत सुविधांचा अभाव; दीड वर्षात तीन आगीच्या घटना, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Pimpri District Hospital
Pimpri District HospitalPudhari
Published on
Updated on

पिंपरी: जुनी सांगवी येथील जिल्हा रुग्णालयाची इमारत गेल्या ५० वर्षांहून जुनी असून, येथे येणाऱ्या रुग्णांसाठी सुविधांची वानवा दिसून येत आहे. रुग्णालयात स्वच्छतागृहाची दुरवस्था, पाणी, लिफ्टची गैरसोय, टेरेसवर मोठ्या प्रमाणात भंगार सामान टाकण्यात आले आहे. तर, काही शौचालयाचा वापर अडगळीचे सामान टाकण्यासाठी केला जात आहे. व्हरांड्यातील सिमेंटच्या जाळ्यांवर गुटखा आणि तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारलेल्यामुळे रुग्णालयाची दैनावस्था झाल्याचे दिसून येत आहे.

Pimpri District Hospital
Pimpri Ganesh Decoration: गणरायाच्या सजावटीला ‘पुन्हा वापरा’चा ट्रेंड; कापडी, प्लास्टिकच्या फुले-पानांना पसंती

स्त्रीरोग, प्रसूती विभाग, पुरुष विभाग, आयसीयू, एनआयसीयू, लहान मुलांचा विभाग मिळून एकत्र ३०० बेड्सचे रुग्णालय आहे. मात्र, तिसरा मजला महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक यांना दिला असल्याने रुग्णालयास जागा अपुरी पडत आहेत. त्यामुळे रुग्णालयास फक्त दोनच मजले वापरता येतात. रुग्णालयाची दररोजची ३०० रुग्णांची ओपीडी आहे. आंतररुग्ण विभागामध्येदेखील दाखल रुग्ण मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे जागा अपुरी पडत आहे.

Pimpri District Hospital
Pimpri Chinchwad Dahi Handi: दहीहंडीच्या उत्सवात डॉल्बीचा दणदणाट भोवला; पिंपरी-चिंचवडमध्ये १६ मंडळांवर गुन्हे

स्वच्छतागृहाची दुरवस्था

रुग्णालयात सर्वच वॉर्डमधील स्वच्छतागृहात अस्वच्छता दिसून येते. महिला विभागातील बाथरूममध्ये मोठ्या प्रमाणात खरकटे साचलेले आढळते. भांडी धुण्यासाठी वॉशबेसीनचा अभाव असल्याने रुग्णांचे नातेवाईक बाथरूममध्येच खरकटे भांडी धुतात. काही मजल्यावर स्वच्छतागृहे बंद असल्याने याठिकाणी अडगळीचे सामान ठेवले आहे. सफाई कर्मचारी कमी असल्याने स्वच्छतेचा अभाव असल्याचे सांगितले जाते.

लिफ्ट नादुरुस्त

रुग्णालयात तीन लिफ्ट आहेत. तीनपैकी एक लिफ्ट १५ वर्षे जुनी असल्याने पूर्ण बदलण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या दोनच लिफ्ट सुरू आहेत. गर्दीच्या वेळी ये-जा करताना लिफ्टवर ताण येत आहे.

Pimpri District Hospital
Pimpri Chinchwad Reserved Land: पिंपरी-चिंचवडमध्ये कोट्यवधींच्या आरक्षित जागा धूळ खात; अतिक्रमणासह खासगी उद्योगांचा सुळसुळाट

रुग्णालयाचे २०२१ नंतर फायर सेफ्टी ऑडिट नाही

गेल्या दीड वर्षात तब्बल तीन वेळा आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातील दोन घटना नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्या (एसएनसीयू) परिसरात, तर एक घटना जुन्या अतिदक्षता विभागाच्या (आयसीयू) बॅकअप युनिटमध्ये घडली. सुदैवाने या घटनांमध्ये मोठी जीवितहानी टळली. या वेळी जिल्हा रुग्णालयाचे २०२१ नंतर फायर सेफ्टी ऑडिट नसल्याची माहिती समोर आली आहे.

ऑडिटमध्ये काय तपासले जाते?

अग्निशामक यंत्रणा, फायर अलार्म, हायड्रंट व स्प्रिंकलर, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, फायर डोअर, आपत्कालीन प्रकाशयोजना, विद्युत व्यवस्था, फायर पंप, पाण्याची उपलब्धता, ऑक्सिजन व वैद्यकीय वायूंची सुरक्षितता, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि फायर ड्रिल आदी बाबींची तपासणी केली जाते.

Pimpri District Hospital
Hinjewadi IT Employees Protest: हिंजवडी आयटी कर्मचाऱ्यांचा मूक मोर्चा; रस्ते, पाणी, वाहतूककोंडी अन् मेट्रोच्या प्रश्नांवर संताप

मी माझ्या मित्राला आयसीयूमध्ये भेटायला गेलो होतो. त्या वेळी येथील स्वच्छतागृहामध्ये पाणी तुंबले होते. मी तेथील एका कर्मचाऱ्याला सांगितले, तर ते आमचे काम नाही असे सांगितले. निदान तक्रारीची दखल घेण्याची अपेक्षा होती. याठिकाणी दरवाजावर बदलेले बेडशीट तसेच टाकले होते. काही बेडशीट बाथरुममध्ये तसेच पडले होते. रुग्णालयात सर्वत्र स्वच्छतेचा अभाव आढळून येत आहे. रुग्णालयाने रुग्णांसाठी चांगल्या सुविधा देणे गरजेचे आहे.

मंगेश बोधक, सामाजिक कार्यकर्ते

जिल्हा रुग्णालयाची इमारत ६२ वर्षे जुनी असून, त्यामध्ये सध्या सुरू असलेली अग्निशमक यंत्रणा सक्षम आहे. रुग्णालयाच्या मागील बाजूला अग्निशमन बंब फिरण्यासाठी ६ मीटरचा रस्ता तयार केला जाणार नाही. तसेच, एका जिन्याचे काम पुर्ण करून फायर एनओसीसाठी आवश्यक बाबी पूर्ण करून पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाकडून फायर सेफ्टी ऑडिट केले जाणार आहे.

डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news