Pimpri Chinchwad Dahi Handi: दहीहंडीच्या उत्सवात डॉल्बीचा दणदणाट भोवला; पिंपरी-चिंचवडमध्ये १६ मंडळांवर गुन्हे

ध्वनिमर्यादा ओलांडणाऱ्या साउंड सिस्टिमवर पोलिसांची कारवाई; डॉल्बी स्पीकर, ॲम्प्लिफायर, मिक्सर जप्त
DJ Police Action
DJ Police ActionPudhari
Published on
Updated on

पिंपरी: दहीहंडीच्या उत्सवात कानठळ्या बसविणाऱ्या डॉल्बीचा दणदणाट करणाऱ्यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चांगलाच दणका दिला. निर्धारित ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या १६ मंडळांवर गुन्हे दाखल करत पोलिसांनी साउंड सिस्टीम जप्त केली आहेत. या कारवाईमुळे सार्वजनिक मंडळांमध्ये खळबळ उडाली आहे.

DJ Police Action
Pimpri Chinchwad Reserved Land: पिंपरी-चिंचवडमध्ये कोट्यवधींच्या आरक्षित जागा धूळ खात; अतिक्रमणासह खासगी उद्योगांचा सुळसुळाट

सार्वजनिक दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राहावी, यासाठी ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड आणि अपर पोलिस आयुक्त, प्रादेशिक विभाग बसवराज तेली यांनी सर्व पोलिस ठाण्यांना याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या.

DJ Police Action
Hinjewadi IT Employees Protest: हिंजवडी आयटी कर्मचाऱ्यांचा मूक मोर्चा; रस्ते, पाणी, वाहतूककोंडी अन् मेट्रोच्या प्रश्नांवर संताप

त्यानुसार, ५ सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत विशेष मोहीम राबविण्यात आली. निगडी, पिंपरी, संत तुकारामनगर, दापोडी, हिंजवडी, बावधन, वाकड, काळेवाडी, भोसरी, दिघी आणि चाकण दक्षिण पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या साउंड सिस्टिमची तपासणी करण्यात आली.

DJ Police Action
Pimpri Chinchwad Water Supply: बिजलीनगर सबस्टेशनच्या स्फोटाचा पाणीपुरवठ्यालाही फटका; पिंपरी-चिंचवडकरांची दुहेरी कोंडी

दहीहंडी कार्यक्रम सुरू असताना काही ठिकाणी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डॉल्बी सिस्टीम वाजविण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी तातडीने कारवाई करून साउंड सिस्टीमचे साहित्य ताब्यात घेतले. या मोहिमेत एकूण १६ डॉल्बी स्पीकर, ॲम्प्लिफायर, मिक्सर तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले. उत्सवाच्या नावाखाली ध्वनिमर्यादा मोडणाऱ्यांची यापुढेही गय केली जाणार नसल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

DJ Police Action
Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी भाजी मंडईत लसूण-आल्याचे दर कडाडले; चायना लसूण २८० रुपये किलो

सार्वजनिक उत्सव साजरे करताना नागरिकांनी ध्वनिविषयक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक शांतता आणि पर्यावरणाचे संरक्षण लक्षात घेऊन ध्वनिवर्धक यंत्रणेचा मर्यादित आणि नियमबद्ध वापर करावा. निर्धारित मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कायदेशीर कारवाई केली जाईल.

धीरज पाटील, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news