Pimpri Chinchwad Water Cut: पिंपरी-चिंचवडकरांना पाणीटंचाईची चिंता; १६ ऑक्टोबरपासून आणखी १० टक्के पाणीकपात

शहराला ७७० एमएलडीची गरज, प्रत्यक्षात ६६५ एमएलडी पुरवठा; जलसंपदा विभागाच्या निर्णयाने नागरिकांच्या अडचणी वाढणार
Water Supply
Water SupplyPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराला 770 एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना 665 एमएलडी पाणीपुरवठा होत असल्यामुळे विविध भागात कमी दाबाने आणि अपुर्‍या प्रमाणात पाणीपुरवठ्याच्या तक्रारी कायम आहेत; मात्र एल निनोच्या प्रभावामुळे राज्यभरातील पर्जन्यमानात मोठी घट झाल्याने पुढील वर्षभराचा विचार करता 16 ऑक्टोबरपासून शहरात आणखी दहा टक्के पाणीकपात लागू करण्याचे आदेश राज्याच्या जलसंपदा विभागाने दिले आहेत. आजच्या घडीला 105 एमएलडी पाण्याची तूट असताना आणखी पाणीकपात होणार असल्यामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळणार आहे.

Water Supply
Pune Pimpri Inner Ring Road: पुणे-पिंपरीच्या इनर रिंगरोडसाठी भूसंपादनाला वेग; बाधित शेतकऱ्यांशी थेट संवाद

शहराला सद्यस्थितीत पवना धरणातून 540 एमएलडी, आंद्रा धरणातून 95 एमएलडी आणि एमआयडीसीकडून 30 एमएलडी असा एकूण 665 एमएलडी पाणीपुरवठा दरररोज सुरू आहे. शहराला 25 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. या निर्णयाला पुढील महिन्यात सात वर्ष पूर्ण होतील. त्यानंतरही दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू आहे. राज्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने दुष्काळाचे चित्र अधिक गडद झाले आहे. राज्यातील आणि पुणे जिल्ह्यात काही तालुक्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. एल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागात पर्जन्यमानात मोठी घट झाली आहे. असे असले तरी पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना आणि आंद्रा धरण 100 टक्के भरले होते. मंगळवार (दि. 6) अखेर पवना धरणात 100 तर, आंद्रा धरणात 92 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Water Supply
Sangvi Dapodi Crematorium Water Problem: सांगवी-दापोडीतील स्मशानभूमींमध्ये पाण्याची गैरसोय; नळजोडणीअभावी नागरिक त्रस्त

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 16 ऑक्टोबरपासून दहा टक्के पाणीकपात करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आहे. या आदेशाची पिंपरी-चिंचवड शहरातही अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार, महापालिकेसाठी पवना आणि आंद्रा धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्यामध्ये कपात होणार आहे. सध्या शहराला 770 एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना 665 एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे सध्यस्थितीत शहरातील विविध भागातून कमी दाबाने, अपुर्‍या पाण्याच्या सातत्याने तक्रारी येत आहे.

Water Supply
Pimpri Chinchwad Modified Silencer: पिंपरी-चिंचवडमध्ये मॉडिफाइड सायलेन्सरवर दणका; ४१५ सायलेन्सर, ५९१ नंबर प्लेटवर कारवाई

वाकड परिसरातील 200 ते 500 सदनिका असलेल्या 34 हाऊसिंग सोसायट्यांना केवळ 50 टक्केच पाणीपुरवठा महापालिकेकडून केला जात आहे. अशा परिस्थितीत 16 ऑक्टोबरपासून आणखी 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचे आदेश राज्याच्या जलसंपदा विभागाने दिले आहेत. आधिच 105 एमएलडी पाण्याची तूट असताना आणखी पाणीकपात होणार असल्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून हाल होण्याची शक्यता आहे.

कपातीबाबत महापालिकेस पत्र देणार आहे

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 16 ऑक्टोबरपासून दहा टक्के पाणीकपात लागू करण्याबाबतचे राज्य सरकारचे निर्देश प्राप्त झाले आहेत. दोन दिवसांत पाणीकपातीबाबत पत्र पाणीपुरवठा विभागाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेस देण्यात येणार आहे, असे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले.

Water Supply
Navratri Fashion Shopping: नवरात्रोत्सवासाठी पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठा सजल्या; घागरा-चोली, केडियाला तरुणाईची पसंती

धरणातून जेवढे पाणी मिळेल, त्यानुसार शहरात पुरवठा करू

शहरात सध्यस्थितीत मागणीच्या तुलनेत कमी पाणीपुरवठा होत आहे. तसेच, 16 ऑक्टोबरपासून धरणातून जेवढे पाणी मिळेल, त्यानुसार शहरात पाण्याचे वाटप व्यवस्थापन केले जाईल. जलसंपदा विभागाचा आदेश आल्यानंतर पाणीपुरवठ्याबाबत नियोजन केले जाईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडला होणारा पाणीपुरवठा

  • पवना धरण - 540 एमएलडी

  • आंद्रा धरण - 95 एमएलडी

  • एमआयडीसी - 30 एमएलडी

  • एकूण - 665 एमएलडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news