Pimpri Chinchwad LED Lights Theft: पिंपरी-चिंचवडच्या अर्बन स्ट्रीटवरील ५९ एलईडी दिव्यांची चोरी; १२.६० लाखांचे नुकसान

कोट्यवधींच्या सुशोभिकरणाला धक्का; पाच महिने उलटूनही पदपथ अंधारात, चोरांचा अद्याप शोध नाही
Pimpri Chinchwad LED Lights Theft
Pimpri Chinchwad LED Lights TheftPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील अनेक मुख्य मार्गावर अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार सुशोभिकरण करून, प्रशस्त पदपथ व सायकल ट्रॅक बनवले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या प्रशस्त पदपथावरील आकर्षक खांबांवरील शेकडो शोभिवंत एलईडी दिवे चोरीस गेले आहेत. चोरी होऊन पाच महिने उलटूनही दिवे न लावल्याने प्रशस्त पदपथ अंधारात आहेत.

Pimpri Chinchwad LED Lights Theft
Lonavala Highway Robbery: मुंबई-पुणे महामार्गावरील जबरी चोरीचा पर्दाफाश; रेकॉर्डवरील आरोपीला लोणावळ्यात अटक

महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून १८ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यावर अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार प्रशस्त पदपथ व सायकल ट्रॅक बनवले आहेत. दापोडी ते निगडी, थेरगाव, डांगे चौक, निगडी-प्राधिकरण, रावेत, आकुर्डी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, भोसरी, सांगवी फाटा ते किवळे, आळंदी रस्ता, पिंपरी, नेहरूनगर, उदयमनगर आदी ठिकाणी अर्बन स्ट्रीट डिजाईने पदपथ व सायकल ट्रॅक करून सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्यावर वेगवेगळ्या आकारात बाके, विद्युत दिव्यांचे खांब, झाडांभोवती कठडे, आकर्षक रचना आणि फुलझाडांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

या प्रशस्त व आकर्षक पदपथ व सायकल ट्रॅकला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जॉगिंग, वार्किंग तसेच, सायकलिंग करण्यासाठी नागरिक त्याचा वापर करत आहेत. तसेच, छायाचित्र व व्हिडिओ काढण्यासाठी पदपथाचा गर्दी होत आहे. त्याचे अनेक छायाचित्र, व्हिडिओ व रिल्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्याला सर्वत्र मोठी पसंती मिळत आहे.

Pimpri Chinchwad LED Lights Theft
Lonavala Flood: लोणावळ्यातील पुराला टाटा कंपनीचे धोरण जबाबदार?; नुकसानग्रस्तांना मदतीसाठी लोकप्रतिनिधी आक्रमक

मात्र, नव्याने तयार केलेल्या दापोडी ते निगडी मार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर लावलेल्या आकर्षक विद्युत दिव्यांच्या खाबांवरील एलईडी दिवे गायब झाले आहेत. त्यामुळे पदपथावर प्रकाश पडत नाही. परिणामी, पदपथ व सायकल ट्रॅक नितेज झाले आहेत. या संदर्भात महापालिकेच्या विद्युत विभागाकडे चौकशी केली असता, दिवे चोरीस झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

दापोडी येथील सीएमई गेटपासून दापोडी मेट्रो स्टेशनकडे जाताना सर्व्हिस रस्त्यावर एकूण ५२ खांब उभारण्यात आले होते. त्यापैकी २४ एलईडी आणि ४ पूर्ण फिटिंग ९ जानेवारीला रात्री चोरीला गेले आहेत. तर, त्याच मार्गावरील २ एलईडी आणि ८ पूर्ण फिटिंग २१ जानेवारीला चोरीस गेले आहेत. त्या मार्गावरील एकूण ३८ दिव्यांची चोरी झाली आहे.

Pimpri Chinchwad LED Lights Theft
Cyber Fraud Auto FIR System: सायबर फसवणुकीला लगाम! ५ लाखांवरील गुन्ह्यांना आता थेट ऑटो एफआयआर; तपासाला मिळणार वेग

दुसर्‍या घटनेत पुण्याचा दिशेने जाताना पिंपरी येथील इंडियन पेट्रोल पंप ते संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन मार्गावरील ११ पूर्ण फिटिंग २९ मे रोजी चोरीला गेले आहेत. युरो बॅक ते एचए कंपनी गेट मार्गावरील १० पूर्ण फिटिंग २१ जूनला चोरीला गेले आहेत. असे एकूण २१ फिटिंग गायब झाले आहेत. त्या प्रकरणी पिंपरीतील संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात विद्युत विभाग व संबंधित ठेकेदाराने तक्रार दिली आहे. अद्याप, चोराचा शोध लागलेला नाही.

रहदारीच्या पदपथावरील दिवे चोरीस गेल्याने आश्चर्य

सार्वजनिक रस्त्यांवरील तसेच, नेहमी वर्दळ असलेल्या रस्त्यांवरील पदपथांवरून शोभिवंत दिव्यांची चोरी झाल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्या भागांत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. असे असताना चोरीचा उलगडा झाला नसल्याने शंका उपस्थित केली जात आहे.

Pimpri Chinchwad LED Lights Theft
Moshi Garbage Depot Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेला ठेकेदार कंपनी जबाबदार?; 9 कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर महापालिकेची कठोर भूमिका

साडेबारा लाख रुपयांचे दिवे चोरीला

एक दिव्याची किंमत २१ हजार ३६८ रुपये आहे. असे एकूण ५९ दिवे चोरीला गेले आहेत. त्यामुळे १२ लाख ६० हजार ७१२ रुपयांचे नुकसान झाले आहे. अद्याप अर्बन स्ट्रीट डिजाईनचे काम पूर्ण झाले नसल्याने त्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर आहे. ठेकेदार त्या ठिकाणी नव्याने दिवे बसवून देणार आहे. या प्रकारे पुणे महापालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सुमारे १०० एलईडी दिवे चोरीला गेले आहेत. हा प्रकार गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात घडला होता.

आता, शोभिवंत दिवे वेल्डिंग करून फिट करणार

महापालिकेने अर्बन स्ट्रीट डिजाईनच्या पदपथ व सायकल ट्रॅकवर आकर्षक रचनेचे विद्युत दिव्यांचे खांब उभारण्यात आले आहेत. दापोडी ते निगडी मार्गावरील पिंपरी आणि दापोडी भागातील चार ठिकाणी शोभिवंत दिवे चोरीस गेले आहेत. त्यासंदर्भात संबंधित ठेकेदार व महापालिकेच्या अधिकार्‍यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. आता, शोभिवंत दिवे वेल्डिंग करून फिट केले जाणार आहे. ते साहित्य बीडचे आहे. पावसाळा थांबल्यानंतर सर्व दिवे लावण्यात येतील, असे महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब लांडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news