Lonavala Highway Robbery: मुंबई-पुणे महामार्गावरील जबरी चोरीचा पर्दाफाश; रेकॉर्डवरील आरोपीला लोणावळ्यात अटक

चाकूचा धाक दाखवून टेम्पोचालकाची लूट; मोबाईलसह ९ हजार ७०० रुपयांची रोकड पोलिसांनी केली जप्त
Lonavala Highway Robbery
Lonavala Highway RobberyPudhari
Published on
Updated on

लोणावळा: मुंबई-पुणे महामार्गावर वाहनचालकांना लक्ष्य करून जबरी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीणच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Lonavala Highway Robbery
Lonavala Flood: लोणावळ्यातील पुराला टाटा कंपनीचे धोरण जबाबदार?; नुकसानग्रस्तांना मदतीसाठी लोकप्रतिनिधी आक्रमक

लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजे औंढे गावाजवळील पुलानजीक 15 जुलै 2026 रोजी पहाटे सुमारे 4.20 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी आपल्या ताब्यातील टेम्पोने पुण्याकडून मुंबईकडे जात असताना लघुशंकेसाठी एक्स्प्रेसवेच्या कडेला थांबला. त्या वेळी चार अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीकडील सुमारे 25 हजार रुपयांचा ऐवज जबरीने लुटून पोबारा केला.

Lonavala Highway Robbery
Cyber Fraud Auto FIR System: सायबर फसवणुकीला लगाम! ५ लाखांवरील गुन्ह्यांना आता थेट ऑटो एफआयआर; तपासाला मिळणार वेग

या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान हा गुन्हा संदेश अंकुश हिलम (वय 23, रा. विनेगाव, बावदेववाडी, ता. खालापूर, जि. रायगड) याने केल्याचे निष्पन्न झाले.

Lonavala Highway Robbery
Moshi Garbage Depot Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेला ठेकेदार कंपनी जबाबदार?; 9 कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर महापालिकेची कठोर भूमिका

त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यातील व्हिवो कंपनीचा मोबाईल फोन तसेच 9 हजार 700 रुपये रोख रक्कम असा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तपासादरम्यान आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचेही उघड झाले असून, त्याच्याविरुद्ध खालापूर पोलिस ठाणे, जिल्हा रायगड येथे दरोडा आणि जबरी चोरीचे दोन गुन्हे यापूर्वीच दाखल आहेत.

Lonavala Highway Robbery
Pimpri Dapodi BRT Route Issue: पिंपरी-दापोडी बीआरटी मार्ग धोक्यात; तुटलेल्या बॅरिकेड्समुळे पीएमपी प्रवास असुरक्षित

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलिस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोमपे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक अभिजित सावंत, पोलिस हवालदार संतोष शेळके, अंजर मोमीन, सागर नामदास, गणेश होळकर, सिद्धेश पाटील तसेच पोलिस शिपाई भारत मोहोळ यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news