Pimpri Chinchwad Stray Dogs Shelter: पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे; एका कुत्र्यामागे रोज १०८ रुपये खर्च

महापालिकेचा खासगी भागीदारीतून प्रकल्प; पाच वर्षांसाठी निविदा प्रसिद्ध, २६ नोव्हेंबरपर्यंत एजन्सींना संधी
stray dogs
stray dogspudhari photo
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील मोकाट व भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणास आणण्यासाठी महापालिकेकडून शहरभरात श्वानांसाठी निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे. महापालिका खासगी भागीदारीतून (डिजाईन, बिल्ट, ऑपरेट, ट्रान्सफर(डीबीओटी) तत्वावर हे केंद्र सुरू करणार आहे. एका कुत्र्यासाठी 108 रुपये खर्च दिला जाणार आहे.

stray dogs
Pimpri Chinchwad Free Household Items: पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्टीवासीय महिलांची दिवाळी होणार गोड; महापालिकेकडून संसारोपयोगी साहित्य मोफत

सर्वोच्च न्यायालयाने सर्व स्थानिक संस्थांना मोकाट व भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, महापालिका स्वत: शहरातील चार ठिकाणी निवारा केंद्र उभारणार होती. मात्र, ती बाब खूपच खर्चिक असल्याने महापालिकेने पीपीपी तत्त्वावर निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी जागेत कुत्र्यांसाठी निवारा केंद्र उभारण्याची अट ठेवण्यात आली आहे. श्वानांना नियमितपणे खाद्य घालणे, आवश्यक प्रमाणात डॉक्टर व कर्मचारी नेमणे, तेथील स्वच्छता, पाणी, वीज व इतर सर्व सेवा व सुविधा संबंधित एजन्सीला उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत.

stray dogs
Pimpri Chinchwad Water Wastage: पिंपरी-चिंचवडमध्ये १० टक्के पाणीकपात; तरीही पाइप लावून चारचाकींची धुलाई!

त्या बदल्यात महापालिका एका श्वानामागे दर दिवसाला 108 रुपये शुल्क एजन्सीला देणार आहे. हे केंद्र पाच वर्षे कालावधीसाठी असणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने नुकतीच निविदा प्रसिद्ध केली असून, 26 नोव्हेंबरपर्यंत इच्छुक एजन्सींकडून दर मागण्यात आले आहेत. एजन्सींचा प्रतिसाद पाहून कोणत्या भागांत निवारा केंद्र सुरू करायचे याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

stray dogs
Thokawadi Dam Water: धरणग्रस्तांचे प्रश्न आधी सोडवा, मगच ठोकळवाडीचे पाणी पिंपरी-चिंचवडकडे वळवा!

सार्वजनिक ठिकाणचे श्वान निवारा केंद्रात ठेवणार

शहरातील सार्वजनिक ठिकाणची मोकाट व भटकी कुत्री पकडून त्यात-त्या भागांतील निवारा केंद्रात ठेवली जाणार आहेत. सार्वजनिक उद्यान, दवाखाना, शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, मंडई, बसस्थानक, रेल्वे स्थानक, चौक, मैदान व क्रीडांगण, प्रार्थनास्थळ, मोकळ्या जागा आदी ठिकाणचे भटक्या श्वानांचा त्रास असतो. तेथील कुत्री पकडून निवारा केंद्रात त्यांचे संगोपन केले जाणार आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास तो राज्यातील पहिला प्रकल्प ठरणार आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

stray dogs
Pimpri Chinchwad Waste Processing Centres: पिंपरी-चिंचवडमध्ये १० कचरा प्रक्रिया केंद्रांचा प्रस्ताव; एनजीटीच्या परवानगीअभावी विलंबाची शक्यता

निवारा केंद्रांमुळे मोकाट श्वानांची संख्या नियंत्रणात

मोकाट व भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पीपीपी तत्त्वावर श्वान निवारा केंद्र उभारण्यात येणार आहेत. या केंद्रामुळे सार्वजनिक ठिकाणी होणारा श्वानांचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. निवारा केंद्रात सर्व श्वानांचे योग्य प्रकारे संगोपन केले जाणार आहे. श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया महापालिकेच्या नेहरूनगर येथील केंद्रात केली जाणार आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या चार जागांवर पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्याचे नियोजन आहे, असे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.