Pimpri Chinchwad Gauri Festival: गौराईच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठा सजल्या; मुखवटे, दागिने अन् पूजासाहित्याची खरेदी

आज गौराईंचे आगमन; आवाहन, पूजन आणि विसर्जनाच्या तीन दिवसांच्या उत्सवासाठी महिलांची लगबग
Gauri
GauriPudhari
Published on
Updated on

पिंपरी: गणरायाच्या आगमनानंतर आता घरोघरी गौराईंच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. सुखसमृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून गौराईंची स्थापना व पूजा करण्याची परंपरा असल्याने त्यांच्या आगमनाची महिलांकडून तयारी केली जात आहे. गुरुवार (दि. १७) गौराईंचे आगमन होणार असल्याने पूर्वसंध्येला पिंपरी-चिंचवडमधील बाजारपेठांमध्ये गौराईंचे मुखवटे, दागिने, वस्त्रे, पूजासाहित्य आणि सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी महिलांची लगबग दिसून आली. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या या उत्सवात गौराई तीन दिवसांसाठी आपल्या माहेरी येतात. या तीन दिवसांत आवाहन, पूजन आणि विसर्जन असे विधी परंपरेनुसार पार पाडले जातात.

Gauri
PCMC Employees Promotions: पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठ्या प्रमाणावर पदोन्नत्या; अधिकाऱ्यांच्या बदल्यांनाही आयुक्तांची मंजुरी

गौरी आवाहन

पहिल्या दिवशी गौराईचे घरात उत्साहात स्वागत केले जाते. घराच्या उंबऱ्यापासून ते स्थापना करण्याच्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत मुखवटे किंवा प्रतीकात्मक मूर्ती आणल्या जातात. काही ठिकाणी तेरड्याची रोपे, तर काही ठिकाणी मातीचे किंवा धातूचे मुखवटे वापरून गौरी सजवल्या जातात. या दिवशी प्रामुख्याने भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो.

गौरी पूजन

हा या उत्सवाचा मुख्य दिवस असतो. या दिवशी गौराईला भरजरी साडी आणि सोन्या-चांदीच्या दागिने घातले जातात. सुवासिनींना हळदी-कुंकवासाठी आमंत्रित केले जाते.

गौरी विसर्जन

तिसऱ्या दिवशी गौराईची मनोभावे उत्तरपूजा आणि आरती करून तिला निरोप दिला जातो. पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडे घालत मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते.

Gauri
Moshi Waste Depot Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेचा अंतिम अहवाल रखडला; ९ कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला ७० दिवस पूर्ण

सजावट

गौराईची स्थापना करताना तिच्यापुढे आकर्षक आरास केली जाते. पूजेच्या साहित्यामध्ये परातीत गहू, गणपतीची मूर्ती किंवा सुपारी, पानांचे विडे, दोन्ही गौराईसाठी (जेष्ठा आणि कनिष्ठा) एकसारख्या साड्या, मंगळसूत्र, बांगड्या, टिकली आणि सुवासिक फुलांचे गजरे वापरून हुबेहूब जिवंत रूप दिले जाते.

नैवेद्य आवाहनाचा दिवस

पहिल्या दिवशी शेपूची भाजी (किंवा उपलब्ध पालेभाजी) आणि ज्वारी/बाजरीची भाकरी यांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे.

Gauri
Dapodi Ganesh Visarjan Pond: दापोडीत विसर्जन हौदाला तडे; पाणी दहा मिनिटांत गळून जात असल्याने गणेशभक्तांची गैरसोय

पूजनाचा दिवस

मुख्य पूजेच्या दिवशी गौराईला पूरणपोळी, मोदक, खीर, १६ भाज्यांची मिळून केलेली विशेष भाजी, आणि पंचपक्वान्नांचा नैवेद्य अर्पण केला जातो.

सजावटीसाठी दागिने

गौराईंच्या सजावटीसाठी हार, मोत्यांच्या माळा, गजरे, बांगड्या, दागिने, वस्त्रे आणि फेटे बाजारात आले आहेत. गौराईंच्या पूजेसाठी दिवे, कलश, सोनपावले, गौराईंच्या नैवेद्याच्या मांडणीसाठी ताट, वाट्या, कागदी व प्लास्टिकचे विविध रंगी हार, फुले, तोरण, सजावटीचे पडदे आणि रुखवताचे साहित्य उपलब्ध आहे.

Gauri
Talegaon Dabhade Ganesh Visarjan Police Security: तळेगाव दाभाडेच्या गणेश विसर्जन मार्गाची पोलिसांकडून पाहणी

पूजा साहित्य

गौराईंच्या पुजेसाठी लागणारे हळदी-कुंकू, नारळ, सुपारी, खारीक, बदाम,खोबर्‍याची वाटी, दोरे, कापसाचे वस्त्रे, नवीन साडी, विविध प्रकारचे फराळ साहित्य, पाने- फुले, पत्री हार खरेदी करण्यास बाजारपेठांत गर्दी दिसून आली.

विसर्जनाचा दिवस

काही ठिकाणी विसर्जनापूर्वी दही-भाताचा किंवा शेपूच्या भाजीचा शिदोरी म्हणून नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news