Eco friendly Diwali: पुनर्वापरातून उजळली सामाजिक जबाबदारीची दिवाळी; 31 टन वस्तू जमा होऊन गरजूंच्या घरातही पेटला आनंदाचा दिवा

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरआरआर केंद्रांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
पुनर्वापरातून उजळली सामाजिक जबाबदारीची दिवाळी
पुनर्वापरातून उजळली सामाजिक जबाबदारीची दिवाळीPudhari
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू केलेल्या (रिड्यूस, रियुज, रिसायकल) आरआरआर केंद्रांनी यंदाची दिवाळी सामाजिक जबाबदारीची दिवाळी म्हणून उजळवली आहे. जुनी वस्तू, नवा उपयोग या संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप देत अनेकांनी यात सहभाग नोंदवला.(Latest Pimpri chinchwad News)

पुनर्वापरातून उजळली सामाजिक जबाबदारीची दिवाळी
Pimpri Vegetable Market: अवकाळी पावसाचा फटका; पिंपरीत पालेभाज्यांचे दर वाढले

मोठ्या प्रमाणात वस्तू दान

आठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत एकूण 32 प्रभागनिहाय सुरू असलेल्या आरआरआर केंद्रांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, वापरात नसलेल्या पण सुस्थितीत असलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणात दान केल्या आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने जुने कपडे, खेळणी, भांडी, पुस्तके, इलेक्ट्रॉनिक वस्तू केंद्रात जमा करण्याचे आवाहन केले होते. नागरिकांनीही हे आवाहन मनापासून स्वीकारत दानात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. या वस्तूंचे वर्गीकरण करून त्या गरजू कुटुंबांना वितरित केल्या जात आहेत, ज्यामुळे त्यांच्या घरातही आनंदाचा दिवा प्रज्वलित झाला आहे.

महापालिकेकडून नागरिकांमध्ये जनजागृती

या उपक्रमाला अधिक गती देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून जनजागृतीबरोबरच विविध सोसायट्यांमध्ये घरोघरी जाऊन विशेष वस्तू संकलन मोहीम राबविण्यात आली होती. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. महापालिकेच्या सर्व आरआरआर केंद्रांवर मिळून तब्बल 31 टन पुनर्वापरा योग्य वस्तू जमा झाल्या आहेत. या माध्यमातून पुनर्वापरातून पर्यावरण संवर्धन या संकल्पनेला नागरिकांच्या सहकार्याने बळ मिळाले आहे. आरोग्य विभागाकडून उपक्रमासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत असून, स्वच्छता, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धन या तिन्ही मूल्यांचा संगम साधणाऱ्या या अभियानात नागरिकांनी अधिकाधिक सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

पुनर्वापरातून उजळली सामाजिक जबाबदारीची दिवाळी
Pimpri Chinchwad Police Action: ट्रिपल सीटवर पोलिसांचा बडगा! पिंपरी-चिंचवडमध्ये नऊ महिन्यांत 55 हजार वाहनचालकांवर कारवाई

येथे आहे केंद्र

अ क्षेत्रीय कार्यालय : कापसे उद्यान मोरवाडी, आकुर्डी भाजी मंडई, संत तुकाराम महाराज गार्डन, श्रीधरनगर गार्डन

ब क्षेत्रीय कार्यालय : एसकेएफ कंपनी शेजारी थेरगाव, हेगडेवार पूल, दर्शननगरी, धर्मराज चौक, रावेत, ज्योतिबा उद्यान, काळेवाडी

क क्षेत्रीय कार्यालय : हेगडेवार क्रीडा संकुल अजमेरा, धावडेवस्ती भोसरी, संत सावता महाराज उद्यान, मोशी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर

ड क्षेत्रीय कार्यालय : लिनियर गार्डन कोकणे चौक, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान पिंपळे निलख, तानाजी कलाटे उद्यान वाकड

इ क्षेत्रीय कार्यालय : मोशी चौक, दिघी जकात नाका, राजमाता जिजाऊ उड्डाण पूल, भोसरी

फ क्षेत्रीय कार्यालय : वृंदावन, चिखली, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान, रूपीनगर पोलिस चौकी, शनी मंदिर सेक्टर 21

ग क्षेत्रीय कार्यालय : थेरगाव हॉस्पिटल शेजारी जगतापनगर, मोरू बारणे उद्यान, थेरगाव, पिंपरीगाव बसस्टॉप, आरोग्य कोठी, रहाटणी गावठाण

ह क्षेत्रीय कार्यालय : छत्रपती शिवाजी महाराज गोल मंडई, संत तुकारामनगर, सितांगण गार्डन, कै. काळुराम जगताप तलाव, जुनी सांगवी भाजी मंडई

पुनर्वापरातून उजळली सामाजिक जबाबदारीची दिवाळी
Unauthorized Cable Network: रस्त्यातील अनधिकृत केबलमुळे अपघाताचा धोका; महापालिकेचे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त

या केंद्रांच्या माध्यमातून या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. स्वतःचा आनंद इतरांशी वाटून सामाजिक जबाबदारीचे सुंदर उदाहरण निर्माण केले आहे. जुनी वस्तू, नवा उपयोग या संकल्पनेतून नागरिकांनी पर्यावरण संवर्धन आणि माणुसकी या दोन्ही मूल्यांची जपणूक केली आहे.

विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

पुनर्वापरातून पर्यावरण संवर्धन साध्य झाले असून, गरजूंच्या घरातही आनंदाचा प्रकाश पसरला आहे. हा उपक्रम वर्षभर सुरू असून अधिकाधिक नागरिकांनी आपल्या घरातील वापरता नसलेल्या परंतु सुस्थितीत असणाऱ्या वस्तू महापालिकेच्या या केंद्रात जमा कराव्यात.

डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news