Pimpri Chinchwad Rain Update: पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाचा कहर; रस्त्यांची दैनावस्था, भुयारी मार्गात पाणी साचले

संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे व वाहतूककोंडी; पवना धरणातील पाणीसाठ्यात मात्र हळूहळू वाढ
Pimpri Chinchwad Rain
Pimpri Chinchwad RainPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य तसेच, अंतर्गत रस्ते उखडून खड्डे पडले आहेत. तसेच, अनेक रस्ते व भुयारी मार्गात पाणी साचल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे महापालिका प्रशासन मान्सूनपूर्व तयारी करण्यात नापास झाल्याचे दिसत आहे.

Pimpri Chinchwad Rain
Lonavala Bhushi Dam Overflow: लोणावळ्यात भुशी धरण ओव्हरफ्लो; पर्यटकांची गर्दी वाढली, पोलिसांकडून सुरक्षा सूचना

संततधार पावसामुळे शहरातील बहुतांश भागांतील रस्ते उखडले आहेत. रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडून पाणी साचून चिखल झाला आहे. तसेच, खडी रस्त्यावर पसरली आहे. तसेच, रस्त्यावर, भुयारी मार्ग व ग्रेडसेपरेटरमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांसह पादचार्‍यांची गैरसोय झाली.

Pimpri Chinchwad Rain
Tukaram Maharaj Palkhi: तुकाराम महाराज पालखीच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड सज्ज! आयुक्तांकडून मार्गाची पाहणी

महामेट्रो व्यवस्थापन, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनी, पालिकेच्या पाणीपुरवठा विभाग, शहर दळणवळण विभाग व इतर विभागांकडून रस्ते खोदकाम केल्याने रस्त्याची दैनावस्था झाली आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती काम न केल्याने रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पाणीपुरवठा व अर्बन स्ट्रीट डिजाईनचे कामे पावसाळा सुरू झाल्यानंतरी अपूर्ण असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ड्रेनेजलाईन व स्टॉम वॉटरलाईन अद्याप स्वच्छ झाले नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, पावसाचे पाणी वाहून जात असल्याने ते रस्त्यावर साचून राहत आहे.

Pimpri Chinchwad Rain
Pawna Closed Pipeline Project: पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावर आज निर्णायक बैठक! 15 वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम?

पवना धरणातील जलसाठ्यात वाढ

मावळ तालुक्यातील पवना धरण परिसर तसेच, पिंपरी-चिंचवड शहरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणात शुक्रवार (दि. ३) सायंकाळी पाचपर्यंत केवळ १८. १४ टक्के इतका जलसाठा झाला आहे. दरम्यान, तीन ते चार दिवसांपासून शहरासह मावळ तालुका परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. मात्र, पावसाचा जोर नसल्याने धरण क्षेत्रात पाणीसाठ्यामध्ये जलद वाढ होत नसल्याचे चित्र आहे.

Pimpri Chinchwad Rain
Pawna Dam Water Level: पाऊस सुरू... पण पवना धरण अजूनही कोरडेच! जलसाठा फक्त 16 टक्क्यांवर

गेल्या २४ तासांत धरण परिसरात ३९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. एक जूनपासून आत्तापर्यंत एकूण २९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पवना धरण परिसरात गुरुवार (दि. २) दुपारी चारपर्यंत १६.९६ टक्के पाणीसाठा होता. त्यात वाढ होऊन शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत पाणीसाठा १८. १४ टक्क्यांवर पोहचला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात ६६.४९ टक्के इतका जलसाठा होता. त्यामुळे मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहरात दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकर्‍यांसह शहरवासीयांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news