Tukaram Maharaj Palkhi: तुकाराम महाराज पालखीच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड सज्ज! आयुक्तांकडून मार्गाची पाहणी

पालखी आगमनापूर्वी मार्ग, मुक्कामस्थळ आणि विसावा ठिकाणांची तयारी वेगात; रस्ते दुरुस्ती, स्वच्छता व भाविकांच्या सुविधांवर भर
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: जगद्गगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बुधवारी (दि. 8) पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून पालखी मार्ग आणि आकुर्डी येथील मुक्कामाच्या ठिकाणची तयारी करण्यात येत आहे. पालखी मार्ग व मुक्कामाच्या परिसराची पाहणी करून आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pawna Closed Pipeline Project: पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावर आज निर्णायक बैठक! 15 वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम?

जगद्गगुरू संत तुकाराम महाराज आषाढी पालखी सोहळ्याचे देहू गावातून मंगळवारी (दि. 7) प्रस्थान होणार आहे. पालखीचे पिंपरी-चिंचवड शहरात निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक येथे बुधवारी सायंकाळी आमगन होणार आहे. तेथे महापालिकेकडून स्वागत केले जाते. त्या दिवशी आकुर्डी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे पालखीचा मुक्काम असतो. दुसर्‍या दिवशी गुरुवारी (दि. 9) सकाळी पालखी आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, खराळवाडी, संत तुकारामनगर, कासारवाडी, फुगेवाडी मार्गे दापोडी येथून पुणे शहरात प्रवेश करते.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pawna Dam Water Level: पाऊस सुरू... पण पवना धरण अजूनही कोरडेच! जलसाठा फक्त 16 टक्क्यांवर

पालखी मार्ग, मुक्काम ठिकाण तसेच, विविध विसावा ठिकाणांची आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी (दि. 2) पाहणी केली. या वेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, निवेदिता घार्गे, कार्यकारी अभियंता विजय भोजने, उमेश मोने, शिवाजी चौरे, वैशाली ननावरे व अधिकारी उपस्थित होते.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
School Certificate Camps: आता शाळेतच मिळणार जात, उत्पन्न व अधिवास दाखले; पालकांची धावपळ संपणार

रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना

पालखी मार्गावरील टपर्‍या, अतिक्रमण आणि रस्त्यांवर येणार्‍या लहान व्यावसायिकांमुळे भाविकांना अडथळा निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकार्‍यांनी दिले. सर्व्हिस रस्त्यावर मेट्रो कामाचे लावलेले बॅरिकेड्स हटवण्यासोबतच प्रकाश व्यवस्था व वैद्यकीय सुविधा चोख ठेवावी. पावसाळ्याचा विचार करता चिखल होऊ नये, म्हणून तात्काळ खडी टाकण्याचे आणि शुद्ध पाणीपुरवठा करावा. मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांमुळे पालखीला अडथळा होऊ नये. रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करावी, झाडांच्या फांद्या छाटणे आदी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news