Pawna Closed Pipeline Project: पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावर आज निर्णायक बैठक! 15 वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत महत्त्वाची बैठक; प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाल्यास पिंपरी-चिंचवडला स्वच्छ व अतिरिक्त पाणी मिळण्याची शक्यता
Pipeline
PipelinePudhari
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासाठी महत्त्वाचा आणि गरजेचा असलेला पवना बंद जलवाहिनी प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 3) मुंबई येथे बैठक होणार आहे. बैठकीत या प्रकल्पास हिरवा कंदील मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गेल्या 15 वर्षांपासून ठप्प असलेला हा प्रकल्प मार्गी लागून, शहरात स्वच्छ व अतिरिक्त पाणी मिळू शकेल.

Pipeline
Pawna Dam Water Level: पाऊस सुरू... पण पवना धरण अजूनही कोरडेच! जलसाठा फक्त 16 टक्क्यांवर

झपाट्याने वाढत असलेला पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना बंद जलवाहिनी प्रकल्प आवश्यक आहे. गेल्या 15 वर्षांपासून हा प्रकल्प ठप्प असल्याने त्याचा खर्च 400 वरुन 1 हजार 200 कोटी रुपयांवर पोहचला आहे. त्यासाठी नव्याने सर्वेक्षण करून सुधारित डीपीआर तयार करण्यात आला आहे. कर्ज काढून तसेच, महापलिकेच्या बँकेतील ठेवी मोडून हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार महापालिकेच्या पदाधिकार्‍यांसह प्रशासनाने केला आहे.

Pipeline
School Certificate Camps: आता शाळेतच मिळणार जात, उत्पन्न व अधिवास दाखले; पालकांची धावपळ संपणार

पाण्याची निकड लक्षात घेऊन प्रकल्पाची निविदाप्रक्रिया काढण्यापर्यंत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तयारी करून ठेवली आहे. तर, दुसरीकडे मावळ तालुक्यातील विविध राजकीय पक्ष तसेच, संघटनांनी या प्रकल्पास विरोध कायम ठेवला आहे. बाराही महिने पवना नदीपात्रात पाणी असल्यास आमची शेती जगेल. जलवाहिनीमुळे शेतीला पाणी मिळणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

Pipeline
Pimpri Chinchwad Voter List Verification: पिंपरी-चिंचवडमध्ये मतदार यादी पडताळणीला सुरुवात! बीएलओ 29 जुलैपर्यंत घरोघरी पोहोचणार

या प्रकल्पाबाबत तोडगा काढण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी दुपारी तीन वाजता विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मुख्यमंत्री पवना जलवाहिनी प्रकल्पाचा काय फैसला करतात, याकडे सर्व शहरवासीयांसह मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांकडून प्रकल्पास हिरवा कंदील मिळेल, असा विश्वास पदाधिकार्‍यांकडून व्यक्त केला जाात आहे. तसा निर्णय झाल्यास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छ व अतिरिक्त पाणी मिळणार आहे. तसेच, 100 टक्के पाणी गळती रोखली जाणार आहे.

Pipeline
PCMC Property Tax Collection: पिंपरी-चिंचवड महापालिकेने पहिल्या तिमाहीत 526 कोटी मालमत्ता कर वसूल; 4.45 लाख नागरिकांचा सहभाग

महापालिका पदाधिकार्‍यांसह सर्व लोकप्रतिनिधींसमवेत बैठक

या महत्त्वपूर्ण बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार श्रीरंग बारणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप, महेश लांडगे, मावळचे आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे, अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्त, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता उपस्थित राहणार आहेत. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हेही उपस्थित राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news