Pimpri Chinchwad Property Tax: पिंपरी-चिंचवडमध्ये थकबाकीदारांच्या मालमत्ता होणार सील; जप्तीच्या कारवाईची तयारी

मालमत्ताकर वसुलीचे १,३०० कोटींचे उद्दिष्ट; २ लाख ५६ हजार ८०० मालमत्ताधारकांकडे थकबाकी, मोठ्या थकबाकीदारांवर प्रथम कारवाई
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे चालू आर्थिक वर्षात 1 हजार 300 कोटी रुपये मालमत्ताकर वसुलीचे उद्दिष्ट असून, ते पूर्ण करण्यासाठी शहरातील थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी करसंकलन विभागीय कार्यालयाची स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली असून, बिगरनिवासी व औद्योगिक मालमत्तांवर पहिल्या टप्प्यात कारवाई केली जाणार आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad RTO Action: पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा, दुचाकींचा मालवाहतुकीसाठी वापर; १८ वाहनांवर कारवाई

ज्या मालमत्ताधारकांना मालमत्ताकराची बिले दिली आहेत. मात्र, अद्याप मालमत्ताकराचा भरणा करण्यात आलेला नाही, अशा मालमत्तांची स्वतंत्रपणे नोंद करण्यात आली आहे. संबंधित मालमत्ताधारकांशी संपर्क साधून कर भरण्यास सांगितले जात आहे. थकबाकी वसुलीसाठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र, मोकळ्या जागा तसेच, इतर मालमत्ताधारकांची यादी तयार करण्यात आली आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Akurdi Chinchwad Railway Station: आकुर्डी, चिंचवड रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाला संथ गती; अडीच वर्षांनंतरही कामे अपूर्ण

ज्या मालमत्ताधारकांकडे मालमत्ताकराची थकबाकी आहे, त्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. आता प्रत्यक्ष मालमत्ता कारवाईस सुरुवात केली जाणार आहे. करसंकलन विभागाची शहरात 18 विभागीय करसंकलन कार्यालये आहेत. त्याची स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. थकबाकीदारांची मालमत्ता सील करून जप्त केल्या जाणार आहे. त्यासाठी एमएसएफ जवानांचा बंदोबस्तही घेण्यात येणार आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Karla Ekvira Devi Navratri: कार्ल्याच्या एकवीरा गडावर घटस्थापना; पहिल्याच दिवशी हजारो भाविकांची गर्दी

अद्याप २ लाख ५६ हजार ८०० मालमत्ताधारकांनी भरला नाही कर

शहरातील एकूण 7 लाख 66 हजार मालमत्ताधारकांची नोंद महापालिकेकडे आहे. त्यापैकी 5 लाख 9 हजार 200 जणांनी मालमत्ताकराचे बिल भरले आहे. सहा महिन्यांत एकूण 610 कोटी 44 लाख रुपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. बिल न भरणार्‍या तसेच, थकबाकीदारांवर करसंकलन विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Vegetable Prices: नवरात्रीमुळे भाजीपाल्याचे दर कडाडले; हिरवी मिरची १४० रुपये किलो

मोठ्या थकबाकीदारांवर कारवाईस प्राधान्य

शहरातील मोठ्या थकबाकीदारांवर प्राधान्याने कारवाई केली जाणार आहे. विभागीय कार्यालयाच्या पथकांकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यासंदर्भातील सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे, असे करसंकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news