Pimpri Chinchwad RTO Action: पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा, दुचाकींचा मालवाहतुकीसाठी वापर; १८ वाहनांवर कारवाई

आरटीओकडून २ लाख १५ हजारांचा दंड वसूल; चार ऑनलाइन कंपन्यांना नोटिसा
Pimpri Chinchwad RTO
Pimpri Chinchwad RTOPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना रिक्षा आणि दुचाकींचा वापर मालवाहतुकीसाठी करणाऱ्या वाहनचालकांना पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दणका दिला आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून सुरू असलेल्या या अनधिकृत वाहतुकीविरोधात आरटीओने विशेष तपासणी मोहीम राबविली.

Pimpri Chinchwad RTO
Akurdi Chinchwad Railway Station: आकुर्डी, चिंचवड रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाला संथ गती; अडीच वर्षांनंतरही कामे अपूर्ण

यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १८ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २ लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या प्रकरणी संबंधित ऑनलाइन सेवा पुरवठादार कंपन्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शहरात ऑनलाइनच्या माध्यमातून मालाची घरपोच वाहतूक करण्याचे प्रमाण वाढत आहे.

Pimpri Chinchwad RTO
Karla Ekvira Devi Navratri: कार्ल्याच्या एकवीरा गडावर घटस्थापना; पहिल्याच दिवशी हजारो भाविकांची गर्दी

यासाठी काही ठिकाणी प्रवासी रिक्षा आणि दुचाकींचा वापर केला जात असल्याचे आरटीओच्या निदर्शनास आले. ऑनलाईन कंपन्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची वाहतूक होत असल्याची बाब समोर आल्यानंतर परिवहन विभागाने तपासणीचा निर्णय घेतला. आरटीओच्या पथकाने शहरातील विविध भागांत तपासणी मोहीम राबविली.

Pimpri Chinchwad RTO
Pimpri Vegetable Prices: नवरात्रीमुळे भाजीपाल्याचे दर कडाडले; हिरवी मिरची १४० रुपये किलो

या वेळी वाहनांचे परवाने आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर यांची पडताळणी करण्यात आली. प्रवासी वाहतुकीसाठी नोंदणी असलेल्या वाहनांचा मालवाहतुकीसाठी वापर होत असल्याचे आढळलेल्या १८ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण २ लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Pimpri Chinchwad RTO
YCM Hospital Ambulance Incident: वायसीएमच्या धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण स्ट्रेचरसह रस्त्यावर!

चार ऑनलाइन कंपन्यांना नोटिसा या प्रकरणात आरटीओने केवळ वाहनचालकांपुरती कारवाई मर्यादित ठेवलेली नाही. मालवाहतुकीसाठी प्रवासी वाहनांचा वापर होत असल्याचा पार्श्वभूमीवर चारही ऑनलाइन कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित कंपन्यांकडून लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news