Pimpri Vegetable Prices: नवरात्रीमुळे भाजीपाल्याचे दर कडाडले; हिरवी मिरची १४० रुपये किलो

ऑक्टोबर हीटचा भाज्यांच्या आवकेला फटका; लिंबू २०० रुपये, गावरान गवार २०० रुपये किलो, रताळ्यांनाही मागणी
Green Chilli
Green ChilliPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. ११) नवरात्रीमुळे लाल भोपळा आणि भेंडीच्या दरात वाढ झाली, तर हिरव्या मिरचीची आवक कमी होत असल्याने १२०-१४० रुपये प्रतिकिलो दर होता. रताळे ८०-९० रुपये, तर भुईमूग शेंगा १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे. नवरात्रीमुळे हिरव्या देठांना मागणी असल्याने ३० रुपये जुडी होती. सध्या ऑक्टोबर हीटमुळे भाज्यांचे नुकसान आणि आवक मंदावल्याने सर्वच फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. भाजी मंडईमध्ये पालेभाज्यांचे देखील उन्हाच्या तडाख्यामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत १०-२० रुपयांची वाढ झाली आहे.

Green Chilli
YCM Hospital Ambulance Incident: वायसीएमच्या धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण स्ट्रेचरसह रस्त्यावर!

लसूण, आल्याचे आणि कांद्याचे दर तेजीतच आहेत. लिंबाची आवक कमी झाल्याने लिंबू २०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. आले १०० ते १५० रुपये किलो होते. कांदे ५०-६० रुपये, लसूण १८०-२०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. तर, दुधी भोपळा २५ रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. टोमॅटोचा दर ३० रुपये प्रतिकिलो असा आहे. मेथी ३० रुपये जुडी होती.

Green Chilli
Pimpri Chinchwad Navratri: पिंपरी-चिंचवडमध्ये दांडियावर पोलिसांची नजर; लेझर, बीमलाइटवर निर्बंध

गाजर ४० रुपये, बीट ४० रुपये, वाटाणा १०० - १५० रुपये, बीन्स ६० रुपये, राजमा ७० रुपये, वांगी ४० रुपये, गवार १०० - १५० रुपये, शेवगा ७० - ८० रुपये, दोडका ५० रुपये, फ्लॉवर ५० रुपये, कोबी ३० रुपये, काकडी ५० रुपये, टोमॅटो ३० रुपये, शिमला ५० रुपये, मिरची १०० रुपये, लसूण १८० - २०० रुपये, आले १५० - १८० रुपये, तोंडली ७० रुपये, बटाटा २५ ते ३० रुपये असे दर आहेत.

फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे

रविवारी बाजारात गवार ८० - १०० रुपये किलो, गावरान गवार २००, शेवगा ७०, वाटाणा १०० - १५० , टोमॅटो ३०, भेंडी ७०, फ्लॉवर ५०, कोबी ३०, मिरची १२० रुपये, गाजर ५०, शिमला ६०,लसूण १८० - २०० रुपये, आले १५० रुपये, वांगी ६०, काकडी ४०, कारले ६०, कांदे ५० - ६० रुपये किलो, बटाटा २५ - ३०, बिन्स ७०, पावटा ८०, लाल भोपळा ४० - ५०, घोसाळी ४०, दोडका ५० - ६०, तोंडली ६० रुपये, बीट ४० रुपये, दुधी २५, घेवडा ५० - ६० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे.

Green Chilli
Pimpri Chinchwad HCMTR Project: पिंपरी-चिंचवडचा ३३ वर्षांपासून रखडलेला रिंगरोड प्रकल्प अधांतरी; ई-आरटीएसचा नवा पर्याय

पिंपरी बाजारातील दर पालेभाज्यांचे दर (रु.) प्रतिजुडी

कोथिंबीर ३० रुपये, मेथी ३० रुपये, पालक २० रुपये, शेपू २० रुपये, राजगिरा १५, पुदीना १५ रुपये, मुळा १५ रुपये, चवळई १५, लाल माठ ३०, हिरवा माठ ३०, करडई १५, कांदापात १५ रुपये, करडई १५, आळू पाने २० रुपये जुडी, आंबट चुका २० रुपये, गवती चहा १०, लाल देठ ३० - ४० रुपये जुडी.

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)

शेवगा ८० रुपये, गावरान गवार २०० रुपये किलो, गवार १०० रुपये, पावटा ७०, तोंडली ७० रुपये, बीट ५० , दोडका ७०, कारली ८०, भरताची वांगी ५०, भेंडी ८० - ९० रुपये, मिरची १४०, फ्लॉवर ६०, कोबी ४०, वांगी ७०, घोसाळे ५०, पडवळ ५०, दुधी भोपळा ३० - ३५ , पापडी ९०, पावटा ८०, परवल ८०, सुरण ९० रुपये, मद्रास काकडी ४० रुपये, आरबी ८० रुपये किलो, सिमला ७० रुपये, राजमा ८०, बिन्स ८०, गाजर ५० रुपये किलो, आरवी ८०, रताळी ८० - ९० रुपये, टोमॅटो ३० रुपये .

Green Chilli
Pimpri Chinchwad Navratri Festival 2026: पिंपरी-चिंचवडमध्ये नवरात्रोत्सवाचा जल्लोष; ५० हून अधिक मैदानांवर दांडिया-गरबाची धूम

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)

कांदा ४०, बटाटा १५, लसूण १२०, आले ७५ , भेंडी ५०, गवार ८०, टोमॅटो २०, वाटाणा ९०, घेवडा ४५, दोडका ४५, हिरवी मिरची ८०, दुधी भोपळा २५, काकडी ३५, कारली ३५, गाजर २५, फ्लॉवर ३५, कोबी २५, ढोबळी ४०, वांगी ४०, शेवगा ७५, घोसाळी ३०, लिंबू १००, मका कणीस ८० रुपये प्रतिकिलो दर होते.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी ४३००, पालेभाजी ४४,७०० (गड्डी), फळे आवक ८१८. कांदा ३५०, बटाटा १११८, लसूण ४०, आले ५९, भेंडी १४०, गवार २४, टोमॅटो ६३७, वाटाणा १३, घेवडा ३९, दोडका ४८, हिरवी मिरची ३९, दुधी भोपळा ९६, काकडी २२४, कारली ६३, डांगर ९८, गाजर ९६, फ्लॉवर २८८, कोबी १९६, वांगी ६२, ढोबळी ३७, बीट १०, शेवगा १४, लिंबू २५, मका कणीस ७५, तोंडली ५, रताळी २९५ क्विंटल इतकी आवक झाली आहे.

logo
Pudhari News
pudhari.news