Karla Ekvira Devi Navratri: कार्ल्याच्या एकवीरा गडावर घटस्थापना; पहिल्याच दिवशी हजारो भाविकांची गर्दी

रविवारच्या सुटीमुळे पहाटेपासून दर्शनासाठी लांबच लांब रांगा; नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवासाठी देवस्थान ट्रस्ट आणि पोलिसांकडून विशेष नियोजन
Karla Ekvira Devi
Karla Ekvira DeviPudhari
Published on: 
Updated on: 

लोणावळा: महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि आराध्य दैवत असलेल्या आई एकवीरादेवीच्या कार्ला (वेहेरगाव) गडावर रविवारी सकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात देवीची घटस्थापना करण्यात आली. रविवारच्या सुटीचा दिवस आणि घटस्थापना यांचा योग आल्यामुळे पहाटेपासूनच गडावर भाविकांचा महापूर लोटला होता.

Karla Ekvira Devi
Pimpri Vegetable Prices: नवरात्रीमुळे भाजीपाल्याचे दर कडाडले; हिरवी मिरची १४० रुपये किलो

अभिषेक, आरतीने प्रारंभ

आज सकाळी पहाटे देवीचा अभिषेक व आरती झाल्यानंतर विधिवत घटस्थापनेस सुरुवात झाली. श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, सचिव नवनाथ देशमुख, उपाध्यक्ष सागर देवकर, सहखजिनदार विकास पडवळ, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि बांधकाम सभापती दीपाली दीपक हुलावळे आदी मान्यवरांच्या हस्ते आणि गुरव, पुजाऱ्यांच्या उपस्थितीत देवीचे घट बसवण्यात आले. गडावर सप्तशृंगीपाठाचे पठणदेखील आठ दिवस सुरू राहणार आहे. मंदिरात 9 दिवस भाविकांची गर्दी राहणार असल्यामुळे ट्रस्टच्यावतीने विशेष नियोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टने दिली आहे.

Karla Ekvira Devi
YCM Hospital Ambulance Incident: वायसीएमच्या धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण स्ट्रेचरसह रस्त्यावर!

गडावर लांबच लांब रांगा

रविवार असल्यामुळे कोकण आणि मुंबई भागातून आलेल्या भाविकांनी पहाटेपासूनच एकवीरा गडावर गर्दी केली होती. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मागील काही वर्षांच्या तुलनेत घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी झालेली ही अभूतपूर्व गर्दी लक्षवेधी ठरली. सकाळच्या सत्रात गडाचा संपूर्ण परिसर भाविकांच्या जयघोषाने आणि गर्दीने गजबजून गेला होता.

Karla Ekvira Devi
Pimpri Chinchwad Navratri: पिंपरी-चिंचवडमध्ये दांडियावर पोलिसांची नजर; लेझर, बीमलाइटवर निर्बंध

पोलिसांचे चोख नियोजन

भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी श्री एकवीरा देवस्थान विश्वस्त मंडळ आणि पोलिस प्रशासनाने नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून गडाकडे येणारी सर्व वाहने काही अंतरावरच थांबवण्यात आली असून, भाविकांना पायथ्यावरून पायी जाण्यासाठी रस्ते मोकळे ठेवण्यात आले होते.

Karla Ekvira Devi
Pimpri Chinchwad HCMTR Project: पिंपरी-चिंचवडचा ३३ वर्षांपासून रखडलेला रिंगरोड प्रकल्प अधांतरी; ई-आरटीएसचा नवा पर्याय

पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्यामुळे प्रशासनाची काहीशी तारांबळ उडाली. मात्र, पुढील नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्रोत्सवात भाविकांना सुरळीत व सुलभ दर्शन घेता यावे, यासाठी प्रशासनाकडून अधिक काटेकोर नियोजन करण्यात येत असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे व पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news