Pimpri Chinchwad Police Transfers: पिंपरी-चिंचवड पोलिस दलात मोठा फेरबदल; १० निरीक्षकांच्या महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्त्या

गुन्हे शाखा, वाहतूक व विशेष शाखेसह हिंजवडी, पिंपरी, निगडी, चाकण पोलिस ठाण्यांची जबाबदारी
Police
PolicePudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात प्रशासकीय फेरबदल करण्यात आले आहेत. बदलीवर नव्याने हजर झालेल्या १० पोलिस निरीक्षकांना विविध ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखा, वाहतूक शाखा आणि विशेष शाखेसह महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांची जबाबदारी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे.

Police
Pimpri Chinchwad Stray Dogs: पिंपरी-चिंचवडमध्ये मोकाट श्वानांचा बंदोबस्त; नसबंदी, लसीकरणासह चार वाहनांतून पकडमोहीम

नव्या नियुक्त्यांमुळे शहरातील गुन्हेगारीला आळा घालणे, वाहतूक व्यवस्था सुधारणे आणि कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर राहणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Police
Pimpri Chinchwad Stray Cattle: संत तुकारामनगरमध्ये मोकाट जनावरांचा धुमाकूळ; अपघाताचा धोका वाढला, महापालिकेचे दुर्लक्ष

शहराचा वाढता विस्तार आणि त्यासोबत निर्माण होणारी गुन्हेगारी, वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेची आव्हाने पाहता या नियुक्त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. नव्या अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा प्रशासनाला फायदा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आगामी काळात गुन्हेगारीविरोधातील कारवाई आणि वाहतूक नियमनाला अधिक वेग येण्याची शक्यता आहे.

Police
Livestock Insurance Scheme: पशुधन विम्याला शासनाचे मोठे अर्थबळ; ८५ टक्के हप्ता सरकार भरणार, पशुपालकांचा वाटा केवळ १५ टक्के

नियुक्त झालेले अधिकारी

अमोल चंद्रकांत गवळी (गुन्हे शाखा), देवेंद्र परशराम चव्हाण (पोलिस आयुक्तांचे वाचक), हेमंत पोपटराव कदम (विशेष शाखा), राजेन्द्र जयवंत निकाळजे (वाहतूक शाखा), सिद्धराम महादेव म्हेत्रे (हिंजवडी पोलिस ठाणे), गीताराम लक्ष्मण शेवाळे (नियंत्रण कक्ष), विजयकुमार गोरख शिंदे (पिंपरी पोलिस ठाणे), प्रशांत ज्ञानोबा आरदवाड (चाकण उत्तर पोलिस ठाणे), सुरेखा शरद घार्गे (गुन्हे शाखा), चंद्रकांत विनायक जाधव (निगडी पोलिस ठाणे).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news