Pimpri Chinchwad Stray Cattle: संत तुकारामनगरमध्ये मोकाट जनावरांचा धुमाकूळ; अपघाताचा धोका वाढला, महापालिकेचे दुर्लक्ष

रस्त्याच्या मधोमध ठिय्या, अचानक वाहनांसमोर येण्याने वाहनचालक त्रस्त; विशेष पथकाद्वारे कारवाईचे आश्वासन
Stray Cattle
Stray CattlePudhari
Published on
Updated on

खराळवाडी: संत तुकारामनगर परिसरात स्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने वाहनचालक, स्‍थानिक नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे. रस्त्याच्या मधोमध तसेच चौकात मोकाट जनावरे ठिय्या मांडत असल्याने वाहनचालकांना त्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एखाद्या वेळेस मोकाट जनावरे वाहनांच्‍या मागे धावतात अथवा अचानक आडवी येत असल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. परंतु, याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. या मोकाट जनावरांचा बंदोबस्‍त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Stray Cattle
Livestock Insurance Scheme: पशुधन विम्याला शासनाचे मोठे अर्थबळ; ८५ टक्के हप्ता सरकार भरणार, पशुपालकांचा वाटा केवळ १५ टक्के

दुचाकीस्वारांना मोकाट जनावरांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अचानक जनावरे रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना ब्रेक लावावे लागत असून, वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर पुरेसा प्रकाश नसलेल्या ठिकाणी हा धोका आणखी वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Stray Cattle
Lonavala Traffic Jam: लोणावळ्यात वीकेंडची वाहतूक कोंडी ठरली कायमची डोकेदुखी; अंतर्गत रस्तेही जाम

मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, महापालिका प्रशासनाने तातडीने पाहणी करून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संत तुकारामनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे. तसेच जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या संबंधित पशुपालकांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

मोकाट जनावरांचा प्रश्न हा केवळ वाहतुकीपुरता मर्यादित नसून नागरिकांची सुरक्षितता, स्वच्छता आणि सार्वजनिक रस्त्यांचा वापर यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने नियमित पाहणी करून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. मोकाट जनावरांना पकडण्यासाठी नियमित मोहीम राबवावी आणि जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या पशुपालकांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Stray Cattle
MSRTC NCMC Card: एसटीच्या एनसीएमसी कार्डधारकांना तिकीट नाकारणे महागात पडणार; वाहकांवर कारवाईचा इशारा

मोकाट जनावरांमुळे रहदारीला अडथळा

जनावरे रस्त्याच्या मधोमध बसल्याने वाहतूक मंदावते आणि कोंडी निर्माण होते. अचानक जनावरे वाहनांसमोर आल्याने दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता असते. मोठी जनावरे रस्त्यावर किंवा पदपथावर आल्याने पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालणे कठीण होते. कचऱ्याच्या ठिकाणी जनावरे फिरत असल्याने कचरा रस्त्यावर पसरतो आणि परिसरात अस्वच्छता निर्माण होते. अंधारात रस्त्यावर बसलेली जनावरे वाहनचालकांना उशिरा दिसतात. त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढतो. काही जनावरे आक्रमक झाल्यास लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. जनावरांपासून वाचताना वाहनचालक अचानक वळण घेत असल्याने वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता असते.

Stray Cattle
Pimpri Chinchwad EV: पिंपरी-चिंचवडकरांचा ईव्हीकडे वाढता कल; वर्षभरात ३१,७२७ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी

शहरातील विविध भागांत रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांबाबत या तक्रारींची दखल घेऊन संबंधित भागात पाहणी करण्यात येत आहे. मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी लवकरच विशेष पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल. जनावरांना ताब्यात घेऊन नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. जनावरांच्या मालकांनी आपली जनावरे रस्त्यावर मोकाट सोडू नयेत.

डाॅ. अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news