

पिंपरी: पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.15) झालेल्या मतदानासाठी शुक्रवारी (दि.16) मतमोजणी सुरु झाली आहे.
शहरातील आठ ठिकाणी सकाळी दहापासून प्रत्यक्ष मोजणीस सुरुवात केली जाणार आहे. दुपारी बाराला पहिला निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. सर्व 126 जागांचे निकाल दुपारी दोनपर्यंत पूर्ण हाती लागतील, असा अंदाज आहे. मतमोजणी केंद्रांच्या परिसरात वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था तसेच, प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला आहे. निकाल जाहीर करताना अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.
प्रत्येक निकाल ध्वनिक्षेपकावर घोषित केला जाणार आहे. त्यामुळे केंद्रांच्या बाहेर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना निकाल समजणार आहे. मतमोजणी कक्षाची तयारी पूर्ण झाली आहे. तेथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
उमेदवार
भाजपा-120
आरपीआय-5
राष्ट्रवादी काँग््रेास-121
राष्ट्रवादी काँग््रेास शरचंद्र पवार पक्ष-13
शिवसेना (एकनाथ शिंदे)-57
काँग््रेास-55
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष-48
महाराष्ट्र नवनिर्माण सेना-12
वंचित बहुजन आघाडी-34
आम आदमी पार्टी-18
ओळखपत्राशिवाय मतमोजणी केंद्रांत प्रवेश नाही
मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाने ज्या व्यक्तीला ओळखपत्र दिले आहे. अशा पात्र व्यक्तींनाच मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे. इतरांना तेथे प्रवेश दिला जाणार नाही, असे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
हेडगेवार भवनात मोजणीसाठी 18 फेऱ्या
प्रभाग क्रमांक 10, 14, 15 आणि 19 येथील मतमोजणी प्राधिकरण, निगडी येथील हेडगेवार भवन येथे होणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 10 साठी मतमोजणीच्या 17 फेऱ्या, प्रभाग क्रमांक 14 व 19 साठी प्रत्येकी 18 फेऱ्या आणि प्रभाग क्रमांक 15 साठी मतमोजणीच्या 15 फेऱ्या होणार आहेत.
ऑटो क्लस्टर केंद्रात मोजणीचे 14 व 16 फेऱ्या
प्रभाग क्रमांक 16, 17, 18 आणि 22 येथील मतमोजणी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे होणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 16 व 22 साठी मतमोजणीच्या प्रत्येकी 14 फेऱ्या होणार आहेत. प्रभाग क्रमांक 17 व 18 साठी प्रत्येकी 16 फेऱ्या होणार आहेत.
संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल केंद्रात मोजणीच्या 17 ते 21 फेऱ्या
प्रभाग क्रमांक 2, 6, 8 आणि 9 येथील मतमोजणी इंद्रायणीगर, भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे होणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 2 साठी मतमोजणीच्या 21 फेऱ्या, प्रभाग क्रमांक 6 साठी मतमोजणीच्या 17, प्रभाग क्रमांक 8 साठी 20 फेऱ्या आणि प्रभाग क्रमांक 9 साठी मतमोजणीच्या 18 फेऱ्या होणार आहेत.
ड क्षेत्रीय कार्यालय केंद्रात मोजणीसाठी 20 व 21 फेऱ्या
प्रभाग क्रमांक 25, 26, 28 आणि 29 येथील मतमोजणी रहाटणी येथील ड क्षेत्रीय कार्यालय येथे होणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 25 व 29 साठी मतमोजणीच्या प्रत्येकी 20 फेऱ्या, प्रभाग क्रमांक 26 व 28 साठी प्रत्येकी 21 फेऱ्या होणार आहेत.
कबड्डी संकुल केंद्रात मोजणीच्या 16 व 18 फेऱ्या
प्रभाग क्रमांक 3, 4, 5 आणि 7 येथील मतमोजणी भोसरीती अंकुशराव लांडगे नाट्यगृहामाील कबड्डी प्रशिक्षण संकुल येथे होणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 3 साठी मतमोजणीच्या 18 फेऱ्या होणार आहेत. प्रभाग क्रमांक 4, 5 व 7 साठी प्रत्येकी 16 फेऱ्या होणार आहेत.
घरकुल टाऊन हॉल केंद्रात मोजणीकरिता 14 ते 17 फेऱ्या
प्रभाग क्रमांक 1, 11, 12 आणि 13 येथील मतमोजणी चिखलीतील घरकुलामागील टाऊन हॉल येथे होणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 1 साठी मतमोजणीच्या 17 फेऱ्या होणार आहेत. प्रभाग क्रमांक 11 साठी मतमोजणीच्या 16 फेऱ्या आहेत. प्रभाग क्रमांक 12 साठी मतमोजणीच्या 14 फेऱ्या आणि प्रभाग क्रमांक 13 साठी मतमोजणीच्या 15 फेऱ्या होणार आहेत.
थेरगाव कामगार भवनात मोजणीच्या 10 ते 17 फेऱ्या
प्रभाग क्रमांक 21, 23, 24 आणि 27 येथील मतमोजणी थेरगाव येथील शंकर गावडे स्मृती कामगार भवन येथे होणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 21 साठी मतमोजणीच्या 17 फेऱ्या, प्रभाग क्रमांक 23 साठी मतमोजणीच्या 10 फेऱ्या, प्रभाग क्रमांक 24 साठी 14 फेऱ्या आणि प्रभाग क्रमांक 27 साठी मतमोजणीच्या 16 फेऱ्या होणार आहेत.
कासारवाडी केंद्रात मोजणीसाठी 16 ते 20 फेऱ्या
प्रभाग क्रमांक 20, 30, 31 आणि 32 येथील मतमोजणी कासारवाडीतील भाजी मंडई येथे होणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 20 साठी मतमोजणीच्या 20 फेऱ्या, प्रभाग क्रमांक 30 साठी मतमोजणीच्या 16 फेऱ्या, प्रभाग क्रमांक 31 साठी 19 फेऱ्या आणि प्रभाग क्रमांक 32 साठी मतमोजणीच्या 17 फेऱ्या होणार आहेत.