

मी निवडणुकीसाठी पहिल्यांदाच मतदान केले. मतदानाचा हक्क बजावल्यामुळे आपण भारताचे जबाबदार नागरिक असल्याची जाणीव होते. आपले एक मत उज्वल भविष्याकडे पाऊल टाकते. त्यामुळे माझ्या सारख्या प्रत्येकाने योग्य उमेदवाराला मत द्यावे.
श्रेया चौरटीया
मी माझा हक्क मतदान करुन बजावत आहे. तसेच प्रत्येक तरुणांनी मतदान करून आपला हक्क बजावणे गरजेचे आहे. पहिल्यांदाच मतदान करताना आपण लोकशाहीचा एक भाग आहोत आणि आपल्या मताला किंमत आहे, याची मला जाणीव झाली. मतदान करताना मला खूप आनंद झाला हा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. तसेच जो उमेदवार विद्यार्थ्याच्या उज्वल भाविष्याचा विचार करतो. अशा उमेदवाराला मी मतदान केले. माझ्यासारखे प्रत्येकाने आपले मत देताना योग्य उमेदवारास मतदान करणे गरजेचे आहे. आपले एक मत खूप मोलाचे आहे.
प्राची तांबे
मी पहिल्यांदाच मतदान केल्याने मतदानाचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय होता. मी सर्वसामान्य नागरिक आहे; परंतु लोकशाहीत माझे एक मत खूप मौल्यवान आहे. मतदान करताना मी पक्षाचा विचार न करता विकासाचा विचार करता शहराच्या विकासासाठी मतदान केले. मागील 9 वर्षात कोणत्या उमेदवारांनी चांगल्या पध्दतीने काम करुन आपल्या शहराचा विकास केला आहे. अशा उमेदवाराला मतदान केले
सिद्धी शिंदे
मी पहिल्यांदाच मतदान करताना मला खूप उत्सुकता आहे. माझ्या मतदानाचा हेतू कोणत्याही पक्षाचा विचार न करता योग्य उमेदवाराला मतदान करणे हा होता. जेणेकरुन योग्य पध्दतीने आपल्या पिंपरी चिंचवड औदयोगिक (स्मार्ट सिटी) चा विकास व्हावा.
श्वेता शिंदे
मतदानाचा आधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे, हे लक्षात ठेऊन मी मतदान केले. पहिल्यांदा मतदान करताना मला उत्सुकता होती. हल्लीच्या तरुणांनी जनतेसाठी काम करणाऱ्या योग्य उमेदवाराला मतदान करावे. शहरात विविध समस्या आहेत. पाण्याची समस्या, कचऱ्याची समस्या तसेच चोरीच्या वाढत्या घटना , वाहतूक कोंडीच्या समस्या या समस्याचे निराकरण करणाऱ्या उमेदवाराला मी मतदान केले.
मोक्षदा साबळे
मी मतदान करण्यासाठी नाशिकहून पुण्याला आले आहे. मी पहिल्यांदाच मतदान केले. त्यासाठी मी खूप उत्सूक होते. जनतेसाठी काम करणाऱ्या योग्य उमेदवाराला निवडून देण्यासाठी मी मतदान केले आहे. प्रभागातील समस्या तडमळीने मांडणारा योग्य उमेदवारास मी माझे मत दिले आहे.
संस्कृती सोनवणे
लोकशाही बळकट व्हावी, यासाठी मी आज पहिल्यांदा मतदान केले. पहिल्यांदा मतदान केल्याने मला खूप आनंद झाला. तब्बल नऊ वर्षात कोणत्या पक्षाने शहराचा विकास केला. याचा विचार करून मी मतदान केले. उमेदवाराचा विचार आणि त्यांच्या कामानुसारच मी मतदान केले.
अश्विनी साबळे
मी मतदान करतो आणि तो माझा हक्क आहे. कारण मी ह्या देशाचा नागरिक आहे. याचा मला आनंद आहे. नेत्यांनीदेखील विद्यार्थांच्या उज्वल भविष्याचा विचार करावा. आणि आमचा मताच सोन व्हावे ज्या हेतूने आम्ही मतदान करतो. त्याप्रमाणे आपला चांगल्या सुविधा मिळाव्यात.
रमेश पाटील