

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत अनेक दिग्गज व अनुभवी माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना पराभव स्वीकारला लागला. प्रभागात काम नसल्याने किंवा निवडणुकीच्या वेळेत दर्शन देण्याच्या पद्धतीमुळे मतदारांनी त्यांना साफ नाकारले. परिणामी त्यांना नागरिकांनी घरी बसवले आहे. काही नगरसेवकांचा निसटता पराभव झाला आहे.
महापालिकेची निवडणूक तब्बल 9 वर्षांनंतर झाली. त्यात एक नवीन पिढी तयार झाली. उमेदवारीसाठी प्रचंड स्पर्धा निर्माण झाली. अनेकांनी पक्षांतर करीत तिकीट मिळवले. हे प्रमाण निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात घडले. नगरसेवक होण्याची स्पर्धा तीव झाल्याने अनेक प्रभागात लढती अटीतटीच्या झाल्या. परिणामी, महापालिकेत नगरसेवक व पदाधिकारी म्हणून काम केलेल्यांचा पराभव झाला आहे. बहुतांश माजी नगरसेवकांनी अटीतटीची लढत दिली आहे. काहींचा निसटता पराभव झाला आहे.
भाजपच्या माजी महापौर उषा ढोरे यांचा पराभव झाला. भाजपचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संतोष लोंढे व विलास मडिगेरी, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी नगरसेवक चंद्रकात नखाते, सिद्धेश्वर बारणे, जालिंदर शिंदे, सुरेश म्हेत्रे, सद्गगुरू कदम, शांताराम भालेकर, प्रसाद शेट्टी व स्वीकृत माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका जयश्री गावडे, सुजाता पालांडे, उषा वाघेरे, अनुराधा गोफणे, मीनल यादव, उषा मुंढे यांचा पराभव झाला आहे. भाजपा-आरपीआयच्या माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. असे भाजपाच्या तब्बल 22 माजी नगरसेवकांना मतदारांनी नाकारले आहे. त्यात माजी नगरसेवक राजेंद्र गावडे व माजी नगरसेविका शारदा सोनवणे या दोन बंडखोर उमेदवारांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग््रेासचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, रोहित काटे, वसंत बोराटे, लक्ष्मण सस्ते, काळूराम पवार, राजेंद्र जगताप, राजू लोखंडे, धनंजय काळभोर, नारायण बहिरवाडे, तानाजी खाडे, सचिन भोसले यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, माजी नगरसेविका शीतल काटे, अश्विनी जाधव, प्रियांका बारसे, उषा काळे, रेखा दर्शले, अश्विनी चिंचवडे यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. राष्ट्रवादीच्या 22 माजी नगरसेवकांना पराभव झाला आहे. त्यात बंडखोर उमेदवार माजी नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांचाही समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक तुषार कामठे व माजी नगरसेविका सुलक्षणा धर हे पराभूत झाले आहेत. मनसेचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक सचिन चिखले, त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका अश्विनी चिखले व माजी नगरसेवक शशिकिरण गवळी हे पराभूत झाले आहेत. शिवसनेचे माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांचा पराभव झाला आहे. तसेच, माजी नगरसेविका वैशाली जवळकर यांचाही पराभव झाला आहे.
महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपचे सर्वांधिक 22 माजी नगरसेवकांचा पराभव झाला आहे. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाच्याही 22 माजी नगरसेवकांना पराभव स्वीकारावा लागला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 3 माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाचे 2, शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाचा पराभव झाला आहे.