Pimpri Municipal Election Result: पिंपरी मतदारसंघात सत्ता समसमान, घराणेशाही चर्चेत

भाजप १२ जागांवर कायम, राष्ट्रवादी १४ वर पोहोचली; बनसोडे-गोरखे कुटुंबांचा प्रभाव स्पष्ट
Pimpri Municipal Election Result
Pimpri Municipal Election ResultPudhari
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी: पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला आणि शहराच्या राजकारणात सातत्याने केंद्रस्थानी राहिलेला मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघाचे सध्याचे प्रतिनिधी अण्णा बनसोडे हे सलग तिसऱ्यांदा आमदार असून, विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची राज्यपातळीवरही भूमिका महत्त्वाची आहे. दुसरीकडे, भाजपकडून या मतदारसंघात प्रभावी संघटन उभारणारे विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे हेही या राजकीय संघर्षाचे प्रमुख केंद्रबिंदू ठरले होते.

Pimpri Municipal Election Result
Pimpri Chinchwad BJP Victory: चिंचवड मतदारसंघात भाजपचा दबदबा कायम

या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातील राजकारणात ‌‘अनुभव विरुद्ध संघटन‌’ आणि ‌‘घराणेशाही विरुद्ध पक्षशिस्त‌’ अशा अनेक छटा स्पष्टपणे दिसून आल्या. मतदारसंघात प्रभाग क्रमांक 10, 14, 15, 20, 21 आणि 30 असे सहा प्रभाग असून, एकूण 24 नगरसेवक निवडून येतात. सुमारे 3 लाख 99 हजार 811 मतदार असलेल्या या मतदारसंघात झोपडपट्टीबहुल भाग, मध्यमवर्गीय वसाहती आणि उच्चभ्रू परिसर यांचे मिश्र स्वरूप आहे. त्यामुळे निवडणूक लढत ही केवळ एका सामाजिक घटकापुरती मर्यादित राहत नाही.

Pimpri Municipal Election Result
BJP PCMC Victory: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा धडाका, अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम

नुकत्याच जाहीर झालेल्या निकालांमध्ये भारतीय जनता पार्टीने 12 जागांवर विजय मिळवत आपली ताकद कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीतही भाजपने इतक्याच जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने मागील वेळेपेक्षा एक जागा अधिक मिळवत 14 नगरसेवक निवडून आणले आहेत. आकड्यांमध्ये फारसा फरक नसला, तरी राजकीय पातळीवर हा बदल महत्वाचा मानला जात आहे. या निकालातील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे दोन्ही प्रमुख नेत्यांच्या कुटुंबीयांचा विजय. आमदार अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांनी निवडणूक जिंकत स्थानिक राजकारणात यशस्वी प्रवेश केला आहे. दुसरीकडे, भाजपचे आमदार अमित गोरखे यांच्या मातोश्री आणि माजी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनीही विजय मिळवत गोरखे कुटुंबाची पकड अधोरेखित केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत ‌‘दोन घराण्यांचा प्रभाव‌’ हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आहे.

Pimpri Municipal Election Result
PCMC City President Defeat: पिंपरी-चिंचवडमध्ये तीन शहराध्यक्ष अपयशी

निवडणुकीपूर्व काळात दोन्ही पक्षांत मोठ्या प्रमाणावर फोडाफोड झाली. मावळ मतदार संघात खासदारकीला नशीब आजमवले संजोग वाघेरे यांना पक्षात घेऊन भाजपाने संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न केला, तर राष्ट्रवादीने संदीप वाघेरे यांना आपल्या गोटात घेत भाजपाच्या रणनीतीला छेद दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभांनी राष्ट्रवादीच्या प्रचाराला धार चढवली, तर भाजपने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आक्रमक प्रचार केल्याचे दिसून आले.

Pimpri Municipal Election Result
Pimpri Municipal Election Result Celebration: पिंपरीत निकालानंतर जल्लोष; शहरभर पोलिस बंदोबस्त

एकूण निकाल पाहता पिंपरी विधानसभा मतदारसंघावर कोणत्याही एका पक्षाचे निर्विवाद वर्चस्व निर्माण झालेले नाही. भाजपने आपली जागा टिकवली असली, तरी राष्ट्रवादीने संख्याबळ वाढवत आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर, सिद्धार्थ बनसोडे आणि अनुराधा गोरखे यांच्या विजयामुळे येत्या काळात या मतदारसंघातील राजकारण अधिक व्यक्तिकेंद्रित आणि तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी मतदारसंघातील ही नवी राजकीय मांडणी राज्याच्या राजकारणात महत्त्वाची ठरणार आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने 12 जागांवर विजय; मागील निवडणुकीतील कामगिरी कायम.

  • राष्ट्रवादीने 14 जागा जिंकत मागील वेळेपेक्षा एक जागेची वाढ नोंदवली.

  • भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांत निवडणुकीपूर्वी फोडाफोड; संख्याबळ वाढवण्याचे प्रयत्न.

  • संजोग वाघेरे भाजपमध्ये; राष्ट्रवादीकडून संदीप वाघेरे यांना घेऊन पलटवार.

  • अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांचा विजय; स्थानिक राजकारणात यशस्वी प्रवेश.

  • अमित गोरखे यांच्या मातोश्री अनुराधा गोरखे विजयी; गोरखे कुटुंबाची पकड कायम.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news