

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत अनेक प्रभागात भाजपा विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रमुख थेट सामना पाहावयास मिळत आहे. शहरात अनेक प्रभागात या दोन पक्षांच्या उमेदवारांमध्येच सामना रंगणार असे चिन्ह आहे. कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे.
शहरातील 126 जागांवर भाजपा, अजित पवारांची राष्ट्रवाद काँग्रेस, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, मनसे, आप आणि इतर पक्षांचे उमेदवार आहेत. शहराचे प्रमुख लढतीकडे लक्ष लागले आहे. भाजपा विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा सामना पाहावयाला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेत भाजपा सत्ताधाऱ्यांनी केलेल्या भष्टाचाराचे आरोप करीत तोफ डागत आहेत. त्याला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण तापत आहे. हा जोर दिवसेंदिवस वाढत जाणार आहे.
राहुल कलाटे (भाजपा) विरुद्ध मयूर कलाटे (राष्ट्रवादी काँग्रेस) (25 ड)
तुषार कामठे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) विरुद्ध संदीप कस्पटे (भाजपा) (26 ड)
प्रशांत शितोळे (भाजपा) विरुद्ध अतुल शितोळे (राष्ट्रवादी काँग्रेस) (32 ड)
राहुल जाधव (भाजपा) विरुद्ध विशाल आहेर (राष्ट्रवादी काँग्रेस) (2 क)
नामदेव ढाके (भाजपा) विरुद्ध भाऊसाहेब भोईर (राष्ट्रवादी काँग्रेस) (17 ब)
राहुल भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध सद्गगुरू कदम (भाजपा) (9 ड)
पंकज भालेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध शांताराम भालेकर (भाजपा) (12 ड)
विलास मडिगेरी (भाजपा) विरुद्ध तुषार सहाणे (राष्ट्रवादी काँग्रेस) (8 ड)
प्रमोद कुटे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध प्रसाद शेट्टी (भाजपा) (14 ड)
राजू मिसाळ (भाजपा) विरुद्ध धनंजय काळभोर (राष्ट्रवादी काँग्रेस) (15 अ)
वैशाली काळभोर (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध मीनल यादव (शिवसेना) (14 ब)
रोहित काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध संजय काटे (भाजपा) (30 ड)
राजू बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध चंद्रकांता सोनकांबळे (आरपीआय-भाजपा) (30 अ)
विश्वजित श्रीरंग बारणे (शिवसेना) विरुद्ध सिद्धेश्वर बारणे (भाजपा) विरुद्ध संतोष बारणे (राष्ट्रवादी काँग्रेस) (24अ)
सिद्धार्थ अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध कमलेश वाळके (भाजपा) (9 अ)
अनुराधा गोरखे (भाजपा) विरुद्ध नीलिमा पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) (10 अ)
यश साने (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध गणेश मळेकर (भाजपा) (1 ड)
कुशाग्र कदम (भाजपा) विरुद्ध संदीप चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस) (10 क)
अपर्णा डोके (भाजपा) विरुद्ध पूजा आगज्ञान (राष्ट्रवादी काँग्रेस) (18 अ)
जालिंदर शिंदे (भाजपा) विरुद्ध राहुल गवळी (राष्ट्रवादी काँग्रेस) (5 ड)
भीमाबाई फुगे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध अनुराधा गोफणे (भाजपा) (5 अ)
सुलभा उबाळे (शिवसेना) विरुद्ध अश्विनी चिखले (मनसे) विरुद्ध मनीषा कुलकर्णी (भाजपा)(13 क)
मोरेश्वर भोंडवे (राष्ट्रवादी ) विरुद्ध दीपक भोंडवे (भाजपा) (16 ड)
विनोद नढे (भाजपा) विरुद्ध मच्छिंद्र तापकीर (राष्ट्रवादी काँग्रेस) (22 क)
श्रृती राम वाकडकर (भाजपा) विरुद्ध चित्रा संदीप पवार (राष्ट्रवादी काँग्रेस (25 क)
नवनाथ जगताप (भाजपा) विरुद्ध अरुण पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) (31 ड)
सीमा सावळे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध डॉ. सुहास कांबळे (भाजपा) (8 अ)
मोरेश्वर शेडगे (भाजपा) विरुद्ध अनंत कोऱ्हाळे (राष्ट्रवादी काँग्रेस) (18 क)
सुलक्षणा धर (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) विरुद्ध जितेंद्र ननावरे (राष्ट्रवादी काँग्रेस) (20 अ)