Ajit Pawar BJP Corruption Allegations: पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाचा भ्रष्टाचार; अजित पवारांचा घणाघात

सत्ता आल्यास सर्व गैरव्यवहारांची चौकशी; शहरवासीयांना मतदानाचे आवाहन
Corruption Allegations
Corruption AllegationsPudhari
Published on
Updated on

पिंपरी: भय ना भ्रष्टाचार, म्हणत 9 वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या सत्ताधारी भाजपाने आशिया खंडातील श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिका कर्जाच्या खाईत लोटली आहे. पिंपरी-चिंचवड शहराचे वाटोळे करणाऱ्या लुटारू टोळीचा आणि भ्रष्टाचारी राक्षसाचा माज उतरुन, त्या राक्षसाचे दहन या निवडणुकीत करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार शहरवासीयांना केले. भाजपाच्या महापालिकेतील भ्रष्टाचाराचा पाढा त्यांनी वाचला. स्वत:च्या परिवाराला मोठे करणारी ही राक्षसी भूक आता बघवत नाही. माझा जीव तुटतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Corruption Allegations
Makar Sankranti Halva Jewellery: मकर संक्रांतीपूर्वी हलव्याच्या दागिन्यांची वाढती क्रेझ

खराळवाडी, पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष योगेश बहल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी आमदार विलास लांडे, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते. अजित पवार म्हणाले की, शहराचे दोन तुकडे करून श्रीमंत महापालिकेची अक्षरश: लूट सुरू आहे. महापालिकेच्या ठेवी कमी झाल्या आहेत. खर्चिक कामांसाठी कर्ज व बॉण्ड काढले आहे. महापालिकेला 4 हजार कोटी रुपयांची बिले देणे बाकी आहे. दादागिरी करून निविदेत रिंग केली जाते. दर फुगवून, नातेवाईक व मर्जीतील ठेकेदारांना काम दिले जात आहे. कमी दरातील कामे अवाच्या-सवा वाढवून केली जात आहे. फायबर केबल डक्टच्या कामात कमी अंतर खोदाई करून केबल टाकल्याने त्या तुटल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Corruption Allegations
Maharashtra Scholarship Exam Fee Hike: शिष्यवृत्ती परीक्षेच्या शुल्कात मोठी वाढ; तरीही विद्यार्थ्यांची संख्या वाढली

मोशी डेपोतील कचरा, रस्ते सफाई, मोकाट कुत्र्यांची नसबंदी अशा कामांतही त्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत. झाडे सुकत आहेत. प्रदूषण वाढत आहे. नदीत राडारोडा टाकला जात आहे. त्याकडे लक्ष न देता त्यांनी दिवसाढवळ्या लूट चालवली आहे. या- ना- त्या माध्यमातून महापालिकेची अक्षरश: धुलाई सुरू आहे. त्यामुळेच त्यांची प्रॉपर्टी वाढली आहे, असा घणाघात पवार यांनी केला. विकासाचा दृष्टिकोन असल्याने मी भोसरी उड्डाणपूल दोन पदरीऐवजी चारपदरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सध्याच्या लोकप्रतिनिधींना दूरदृष्टी नाही. पदपथावर टपऱ्या मांडल्या असून, त्यांचे बगलबच्चे हप्त गोळा करतात. पवासाचे पाणी रस्त्यावर साचते. पार्किंगची सुविधा नाही. बीआरटी कॉरिडारमधील खासगी पार्किंग खाऊन टाकले. शहराचा नुसता खेळखंडोबा केला आहे. भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे की, भाजपाच्या स्थायी समिती सभापतीला लाचखोरीप्रकरणी अटक झाली होती. हे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा घडले, असे पवार म्हणाले.

Corruption Allegations
Rakshak Chowk Traffic Congestion: रक्षक चौक–हिंजवडी मार्गावर हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडी

आरोप करणारे आता माझ्यासोबत

आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलगा सिद्धार्थ बनसोडेंवर अनेक गुन्हे दाखल असल्याचे आरोप होत असल्याबद्दल अजित पवार म्हणाले की, आरोप केले जातात. मात्र, ते सिद्ध झालेले नाहीत. माझ्यावरही 70 हजार कोटींच्या गैरव्यवहाराचे आरोप झाले होते. तो सिद्ध झालेला नाही. आरोप करणारेच आता माझ्यासोबत बसतात, असे अजित पवार यांनी सांगिले.

सत्तेत आल्यानंतर सर्व कामांची चौकशी लावू

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यास भाजपाच्या सत्ताकाळातील सर्व गैरव्यवहारांची चौकशी केली जाईल. मोठी व खर्चिक कामे झाली आहेत. त्या सर्वांची आम्ही चौकशी लावू, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

भंगार, लॅण्ड माफियानंतर आता रस्ते खोदाई माफिया

खासगी नेटवर्किंग कंपन्यांसाठी महापालिकेची परवानगी न घेता शहरभर खोदकाम सुरू आहे. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे. खोदलेले रस्ते पुन्हा दुरूस्त करण्यासाठी काम काढते जाते. ते कामही तेच करतात. भंगार माफिया, लॅण्ड माफिया यांच्यानंतर आता शहरात रस्ते खोदाई माफिया निर्माण झाले आहे. ते महापालिकेची लूट करत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदार असल्याने अधिकारी कचखाऊ भूमिका घेतात, असा आरोप अजित पवारांनी केला.

Corruption Allegations
Vallabhnagar Road Pothole: वल्लभनगर भुयारी मार्गावर मोठा खड्डा; वाहनचालक त्रस्त

पवना बंद जलवाहिनी प्रकल्प पूर्ण करणार

गेल्या पाच वर्षांपासून शहरात दोन दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. पवना बंद जलवाहिनी प्रकल्प गेल्या 14 वर्षांपासून ठप्प आहे, त्यावर अजित पवार म्हणाले की, झपाट्याने वाढत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला पाण्याची गरज असल्याने पवना बंद जलवाहिनी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केला जाईल. शहराला स्वच्छ पाणी दिले जाईल. आमदार सुनील शेळकेंशी मी बोललो आहे, असे पवार यांनी सांगितले.

शहराला आता ट्रॅफिंग जामचा फटका

पूर्वी शहरातून दापोडी ते निगडीपर्यंत थेट वेगात ये-जा करता येत होती. मात्र, अर्बन स्ट्रीट डिजाईन व हरित सेतू या अनावश्यक प्रकल्पांमुळे रस्ते अरुंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकले आहे. बीआरटी मार्ग तोडले जात आहेत. पार्किंग झोन नसल्याने कोठेही वाहने लावली जातात. आमच्या काळातील बेस्ट सिटी आता बकाल होत चालली आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

गोरगरिबांवर अन्याय करणारा डीपी रद्द करणार

महापालिकेने मोशीत कत्तलखान्याचे आरक्षण टाकले आहे. पिंपरीत येथील भारतरत्न डॉ. आंबेडकर पुतळासमोरील जागेत पोलिस ठाण्याचे आरक्षण टाकले आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा हा डाव आहे. डीपीत ग्रीन झोन कमी करण्यात आला आहे. काही भागात पूररेषा बदलली आहे. कुदळवाडी, चिखली 850 एकर जागेवर कमर्शिअल कॉम्प्लेक्स व सेंटरचे आरक्षण टाकले आहेत. हा घाट कोणासाठी घातला आहे. गोरगरिबांच्या घरांवरून रस्त्यांचे आरक्षण प्रस्तावित केले आहे. खासगी बांधकाम परवानगी दिलेल्या चिंचवड येथील जागेत क्रांतिवीर चापेकर स्मारक विस्ताराचे आरक्षण टाकले आहे. तो अन्यायकारक डीपी आम्ही रद्द करू, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

Corruption Allegations
Online Nylon Manja Sale: संक्रांतीत जीवघेणा नायलॉन मांजा; ऑनलाइन विक्रीमुळे धोका वाढला

दादागिरीमुळे उमेदवारी अर्ज भरण्यास कार्यकर्ते घाबरत आहेत

शहरात इतकी दहशत व दादागिरी वाढली आहे की, कार्यकर्ते उमेदवारी अर्ज भरण्यास कचरत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारालाच गाडीत टाकून जबरदस्तीने नेले जात आहे. या दादागिरीमुळे आम्हांला शहरात 128 उमेदवार मिळाले नाहीत, आमची सत्ता आल्यानंतर दादागिरी करणाऱ्यांना सुतासारखे सरळ करतो, असा इशारा अजित पवार यांनी दिला. हे करू, ते करू, कामे देऊ, ईव्हीएम मशिन सेट केले आहे, अशी प्रलोभने देत आमची लोक त्यांनी फोडली; मात्र ईव्हीएममध्ये अफरातफर करता येत नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आमदारकी लढविल्याने अजित गव्हाणे निवडणुकीत नाहीत

माजी आमदार विलास लांडे, अजित गव्हाणे निवडणूक मैदानातून माघार घेतली का, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, माजी आमदार लांडे यांचा मुलगा माजी नगरसेवक विक्रात लांडे म्हणाले की, मला तिकीट नको. माझ्या भावाला द्या. त्यानुसार उमेदवारी दिली आहे. तर, अजित गव्हाणे यांनी भोसरी विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यामुळे त्यांनी महापालिका निवडणुकीस उभे राहण्यास नकार दिला आहे. ते विधानसभा निवडणुकीची प्रतिक्षा करीत आहेत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

विठ्ठलमूर्ती घोटाळा झाला म्हणणाऱ्या भाजपाने त्याच महापौराला उमेदवारी दिली

मागील निवडणुकीच्या वेळेस महापालिकेत विठ्ठलमूर्ती खरेदीमध्ये घोटाळा झाला म्हणून भाजपाने मोठा आरडाओरडा केला. आमच्या पक्षाच्या तत्कालीन महापौर शकुंतला धराडे यांना भाजपाने आपल्या पक्षाची उमेदवारी दिली आहे. त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले. आता तेच त्यांचे उमेदवार आहेत. त्यामुळे तो आरोप कितीपत खरा होता, असा प्रश्न उपस्थित होतो, अशी टीका अजित पवारांनी केली.

Corruption Allegations
Winter Demand Tea Eggs Jowar Bajra: पिंपरीत थंडीमुळे चहा, अंडी, ज्वारी-बाजरीची मागणी वाढली

पवारांनी भाजपावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप

  • अर्बन स्ट्रीट डिजाईनने रस्ते सुशोभीकरण

  • हरित सेतू

  • दर वाढवून पंतप्रधान आवास योजनेचे काम

  • फायबर केबल डक्टचे काम निकृष्ट

  • शाळेतील ई लर्निग प्रकल्प दर्जाहीन

  • दीड लाखाऐवजी 55 हजार रुपये किमतीचे एलईडी टीव्ही खरेदी

  • मोशी कचरा डेपोतील बायोमायनिंग

  • भटक्या कुत्र्यांची कागदोपत्री नसबंदी

  • रस्ते खोदकाम व दुरुस्ती

  • वृक्षलागवड व संवर्धन

  • बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचे काम

  • टेल्को रस्त्यावरील सव्वा मीटर रस्त्यासाठी 81 कोटींचा खर्च

  • डीपी विशिष्ट लोकांसाठी

  • स्मार्ट पार्किंग विकसित केले नाही

  • पब्लिक बायसिकल शेअरींग

  • बेकायदा पार्किंग झोन

  • आभा आसखेड पाणी योजना जॅकवेल

  • रस्ते कामे 30 ते 35 टक्के जास्त वाढीव दराने

  • स्मार्ट सिटी प्रकल्प

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news