Leprosy Control Program: पिंपरी-चिंचवडमध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण घटले; जनजागृतीचे सकारात्मक परिणाम

महापालिकेच्या सर्वेक्षण व मोफत उपचारांमुळे शहरात कुष्ठरोग नियंत्रणात
Leprosy
LeprosyPudhari
Published on
Updated on

वर्षा कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवडमध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण आटोक्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांत केलेल्या सर्वेक्षणात कुष्ठरुग्णांचे प्रमाण कमी होत असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केलेली जनजागृती आणि विविध उपक्रमांमुळे शहरात कुष्ठरुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. गेल्या वर्षी शहरात 116 कुष्ठरोगी आढळले होते. गेल्या दहा वर्षांपूर्वी रुग्णसंख्या 146 इतकी होती.

Leprosy
Maval Zilla Parishad Election: प्रचार विरुद्ध भावनिक आवाहन, ‘पर्चेस व्होटिंग’ची चर्चा

2011 मध्ये 105 कुष्ठरुग्ण

2011 च्या सर्वेक्षणामध्ये 105 कुष्ठरुग्ण आढळले होते. तर, 2012 मध्ये रुग्णांची संख्या 178 झाली होती. 2013 मध्ये 200, 2014 मध्ये 258 इतकी वाढली होती. त्यानंतर तीच रुग्णसंख्या 2015 व 16 च्या सर्वेक्षणात 146 वर आली आहे. तसेच, ऍन्युअल न्यू केस डिटेक्शन रेट 2011 मध्ये 8.88, 2012 मध्ये15.05, 2013 मध्ये 11.4, 2014 मध्ये 14.70, 2015 मध्ये 8.08, 2016 मध्ये 7.96 इतका आहे. प्री - बॅलेन्स रेट म्हणजेच 10 हजार लोकसंख्येमागे 1 कुष्ठरुग्ण असणे म्हणजे त्या कार्यक्षेत्रातील कुष्ठरुग्णाांचे दुरीकरण झाले असे मानले जाते.

Leprosy
Lonavala Tiger Point Death: लोणावळा टायगर पॉईंट येथे दरीत पडून मुंबईतील 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू

औषधोपचाराने संसर्गाची साखळी खंडीत

महापालिकेतर्फे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचराव्दारे संसर्गाची साखळी खंडीत केली जाते. तसेच, होणारा प्रसार कमी केला जातो. नवीन कुष्ठरुग्णांमध्ये विकृतीचे प्रमाण दर दहा लाख लोकसंख्येमागे एकापेक्षा कमी करणे, समाजात कुष्टरोगाविषयी जनजागृती करणे, कुष्ठरोगी दुरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करणे, क्षयरोगाच्या निदानाअभावी अद्यापही वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना औषधोपचारावर आणणे हे काम सुरू आहे.

सर्वेक्षणासाठी महापालिकेतर्फे आरोग्य सेवकांची नियुक्ती

कुष्ठरुग्णांच्या सर्वेक्षणासाठी महापालिकेतर्फे आरोग्य सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याव्दारे दररोज तपासणी केली जाते. कुष्ठरोगाबद्दल झोपडपट्टीतील नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. या उपक्रमासाठी नियुक्त आरोग्यसेविका घरोघरी जाऊन तपासणी करतात. तसेच, नागरिकांना स्वत:हून पुढाकार घेऊन रोगनिदान करावे, यासाठी त्यांना प्रवृत्त केले जाते.

Leprosy
Pimple Gurav Traffic Issue: पिंपळे गुरवमधील राजमाता जिजाऊ उद्यान चौक वाहतूक व सुरक्षेचा हॉट स्पॉट

जनजागृती कार्यक्रम

शहरात प्रभातफेरी, प्रश्नमंजुषा, स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. तसेच, मजूरअड्डा, घरोघरी जाऊन, शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कुष्ठरोग हा आजार आनुवंशिक नसून उपचाराच्यादष्टीने त्यांचे सांसर्गिक व असांसर्गिक अशा दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते. बहुविध उपचार पद्धतीने कुष्ठरोग निश्चित बरा होतो. या उपचाराने कुष्ठरोगातील विकृती टाळता येते. बहुविध उपचार पद्धती सर्व आरोग्य संस्थेत उपलब्ध आहे. अपूर्ण व अर्धवट उपचार घेतल्यास हात, पाय लुळे पडणे, हातापायाची बोटे वाकडी होऊन विकृती येऊ शकते. कुष्ठरोगावर एमडीटी हेच प्रभावी औषध असून, सर्व शासकीय, निमशासकीय महापालिकेच्या सर्व दवाखान्यात दररोज मोफत उपलब्ध आहे. कुष्ठरुग्णास 1 ते 5 चट्टे असल्यास 6 महिने उपचार आणि 5 पेक्षा जास्त चट्टे किंवा 1 पेक्षा जास्त मज्जा बाधित असल्यास 12 महिने उपचार घ्यावा लागतो. प्राथमिक अवस्थेतीतील आजार हा 100 टक्के बरा होतो.

Leprosy
PCNTDA Land Survey: पीसीएनटीडीएच्या जागांचे सर्व्हेक्षण सुरू; अतिक्रमण हटविणार

कुष्ठरोगावर अजूनही लस नाही

आत्तापर्यंत केलेल्या संशोधनात कुष्ठरोगावर अजूनही लस यशस्वी होत नाही. कारण कुष्ठरुग्णांचा सर्वसाधारण अधियशन (म्हणजे शरीरात रोगजंतू शिरल्यापासून ते आजाराची पहिली लक्षणे दिसेपर्यंतचा मधला काळ) काळ काही महिने ते 40 वर्ष असतो. तर, सरासरी अधियशन काळ 2 ते 5 वर्षे असतो. कोणतीही लस रुग्णांना देण्यापूर्वी तिचा उंदीर या प्राण्यावर प्रयोग केला जातो आणि उंदराचे वय हे जेमतेम पाच वर्षांपर्यंत असल्यामुळे अजूनही कुष्ठरोगावर लसीकरण उपलब्ध झालेले नाही.

दैनंदिन सर्वेक्षणाबरोबरच लहान मुलांमधील कुष्ठरोग रोखण्यासाठी शाळांमध्ये कुष्ठरोगांची तपासणी केली जाते. व्यक्तीच्या अंगावर चट्टे आढळल्यास त्याची तज्ज्ञांकडून तपासणी केली जाते. प्रत्येक ओपीडीमध्येदेखील वेगळ्या रजिस्टरमध्ये त्यांची नोंद असते.

डॉ. अभयचंद्र दादेवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news