Lonavala Tiger Point Death: लोणावळा टायगर पॉईंट येथे दरीत पडून मुंबईतील 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू

390 फूट खोल दरीत सापडला मृतदेह; शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या मदतीने शोधमोहीम यशस्वी
Tiger Point Death
Tiger Point DeathPudhari
Published on
Updated on

लोणावळा: लोणावळा येथील प्रसिद्ध टायगर पाइंट परिसरातील खोल दरीत पडून मुंबई येथील 19 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईहून ट्रेकिंगसाठी लोणावळ्याला आलेली श्रेया पाटी (वय 19) हिचा मृतदेह शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या मदतीने 390 फूट खोल दरीतून बाहेर काढण्यात आला.

Tiger Point Death
Pimple Gurav Traffic Issue: पिंपळे गुरवमधील राजमाता जिजाऊ उद्यान चौक वाहतूक व सुरक्षेचा हॉट स्पॉट

मिळालेल्या माहितीनुसार, 31 जानेवारी रोजी श्रेया पाटी ही मुंबईहून लोणावळ्याला ट्रेकिंगसाठी आली होती. ड्युक्स नोज परिसरात ट्रेक करण्यासाठी ती गेली होती. मात्र, संध्याकाळपर्यंत ती मुंबईला परतली नाही. रात्री उशिरापर्यंत वाट पाहूनही ती घरी न पोहोचल्याने नातेवाईक चिंतेत पडले. नातेवाईकांनी तातडीने लोणावळा गाठून ड्युक्स नोज परिसरात चौकशी केली असता, संबंधित तरुणी त्या ठिकाणी आली होती व परत गेली असल्याची माहिती मिळाली. रात्री रेस्क्यू टीमकडेही कोणती व्यक्ती हरवली आहे का याबाबत चौकशीसाठी फोन आला होता. दरम्यान, 1 फेबुवारी 2026 रोजी सकाळी नातेवाईकांनी लोणावळा ग््राामीण पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्याचवेळी टायगर पॉईंट परिसरात एक बॅग सापडल्याची माहिती मिळाली असून, ती बॅग श्रेया पाटी हिचीच असल्याचे निष्पन्न झाले.

Tiger Point Death
PCNTDA Land Survey: पीसीएनटीडीएच्या जागांचे सर्व्हेक्षण सुरू; अतिक्रमण हटविणार

सकाळी 11.30 वाजता लोणावळा ग््राामीण पोलिस स्टेशनकडून रेस्क्यू टीमला शोध मोहीम राबविण्याबाबत संपर्क करण्यात आला. त्यानुसार शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे दोन सदस्य तातडीने टायगर पॉईंट परिसरात दाखल झाले. परिस्थितीचा आढावा घेत साहित्याची तयारी करण्यात आली. दुपारी 1.30 वाजता रेस्क्यू टीम लोणावळ्याहून रवाना झाली व 2.30 वाजता शोध मोहीम सुरू करण्यात आली. बॅग सापडलेल्या परिसरात व आजूबाजूच्या दरीत सखोल शोध घेण्यात आला. डॉग स्क्वॉड व पोलिसांचा ड्रोनही या शोधात सहभागी झाला. मात्र प्रारंभी कोणताही ठोस पुरावा आढळून आला नाही. यानंतर पुण्याहून लाईटनिंग ड्रोन पथकातील इमान भाई व रियाज भाई हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या अनुभवाच्या आधारे एका ठराविक ठिकाणी शोध केंद्रित करण्यात आला. सायंकाळी 4.45 वाजता ड्रोन कॅमेऱ्यातून दरीत तरुणीचा मृतदेह आढळून आला. तत्काळ लोकेशन निश्चित करून बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली.

Tiger Point Death
Pune Pimpri Passport Applications: पुणे विभागात पासपोर्ट अर्जांचा विक्रमी वाढ; पाच लाखांहून अधिक अर्ज प्राप्त

रेस्क्यू टीमचे सदस्य योगेश उंबरे हे प्रथम दोरीच्या साहाय्याने खाली उतरले. त्यानंतर अनिल सुतार हे आवश्यक साहित्य व पाणी घेऊन खाली उतरले. सुमारे 390 फूट खोल दरीत मृतदेह आढळून आला. दोघांनी मिळून मृतदेह सुरक्षितरीत्या पॅकिंग करून वर खेचण्यासाठी आवश्यक सेटअप तयार केला. अनेक अडचणी, अंधार आणि दरीतील धोकादायक परिस्थिती असूनही टीमने समन्वय साधत मृतदेह वर आणण्यात यश मिळवले. रात्री 9.30 वाजता मृतदेह वर काढून पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

Tiger Point Death
Pimpri Chinchwad New Municipal Building: पिंपरी-चिंचवडचे नवे महापालिका भवन अंतिम टप्प्यात

ही शोध मोहीम पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप गील, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोन्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. दरम्यान, सदर मृत्यू आत्महत्या, अपघात की घातपात याबाबतचा तपास पोलिस यंत्रणा करीत असून याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या संपूर्ण मोहिमेत शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे महेश मसने, राजेंद्र कडू, प्रकाश रत्नाकर, आनंद गावडे, सचिन गायकवाड, अशोक उंबरे, गणेश गायकवाड, ओंकार पडवळ, प्रिन्स बैठा, वैष्णवी भांगरे, सचिन शिंदे, सागर कुंभार, सागर दळवी, आनंद शिर्के, एकनाथ मढवी, योगेश दळवी, कुणाल कडू, श्रेयस फाटक, पिंटू मानकर, सुनील गायकवाड आदी या मोहिमेत सहभागी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news